एक ऐतिहासिक बावडी (विहीर) घोडेबाव –
घोडेबाव सिंधुदुर्गातील कुडाळ शहरातील एक ऐतिहासिक विहीर(मालवणीत बावडी)…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुडाळ-सावंतवाडी हा कोकणपट्टा तळ कोकण म्हणून ओळखला जात असे हा तळ कोकण इतका दुर्गम होता, की तिथे पाण्यासाठी ३० ते ४० किलोमिटर लांब जावे लागत आसे.. हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाणी अडवा पाणी जिरवा प्रमाणे योजना राबवली, जागोजागी विहिरी काढल्या आणि बांधून घेतल्या, घोडेबाव ही विहीर त्यातलीच एक.. तिचे महत्व मोठे आहे.. मुघलांनी तळ कोकणात आक्रमण केले तेव्हा महाराज जमतील तेवढे मावळे हाताशी घेउन सज्ज झाले.. त्या वेळी दमलेल्या घोडे आणि सैन्य यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणुन ही विहीर बांधण्यात आली..
तळ-कोकणपट्टयात ही एकच घोडेबांव आहे. अत्यंत सुंदर आणि कल्पक्तेने बांधलेली अशी विहीर शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा अदभूत अविष्कार आहे. घोडेबाव विहीर म्हणजे कुडाळ शहराचे शिवकाळाशी असलेला संबंध दर्शवणारे मुख्य स्थान आहे. जुन्या कुडाळ डेपोच्या बाजूला ही विहीर आहे . अशा या पुरातन वास्तूंचे जतन करूयात आणि आपली घोडदौड अशीच पुढे नेऊया..
माहिती : माझा कोकण..
फोटोग्राफी : Prathamesh Shankar Ghone