महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,21,908

मोजमापांचा शब्दकोष

By Discover Maharashtra Views: 246 5 Min Read

मोजमापांचा शब्दकोष –

लांबी, रुंदी, ऊंची दर्शविणारे साधन म्हणजे मोजमाप. कापड,सूत,चालणे, बांधकाम ई साठी मोजमाप वापरतात या मोजमापांचा शब्दकोष –

* अरत्नी- कोपरापासून करंगुळीच्या टोकांपर्यंतचे माप
* आंगुळ- आठ यव रुंदीचे माप, बोटाच्या रुंदीचे माप
* कांडे- बोटाचे पेर, एक माप
* किष्कु- एक प्राचीन मापणाचे मोजमाप
* कोंडो- जमीन मोजण्याचे माप
* कोस- दोन मैल
* गज- 24 तसुंचे माप
* गांव- 4 कोस ते 9 मैलांचे अंतर
* गिरा- दीड तसुंचे माप
* गिरे- तिन अंगुलांची लांबी
* गुंठा- एक चाळि – सांश एकर, 121 चौरस यार्ड, 33 फुट लांब व रुंद जमीन
* गोकोश- गायींच्या हंबरन्याचा टप्पा, जमीन मोजन्याचे परिमाण
* गोचर्म- गाईचे कातडे पसरले असता ते व्यापनारी जमीन
* गोस- तीन वितींचे माप
* घाँटाँ- पांच हात लांबीचे एक जुने माप
* धोड कोस- तिन मैलांचा एक कोस
* चाहुर- 120 बिघे
* चाळिसा- चाळीस हात कापड
* चेन- मोजण्याची लोखंडी सांखळी, 66 फुट
* चोंगा-गी-: चार बोट रुंदीचे माप
* चौगा- चार अंगुले
* चोखंड- पाव, चौथा हिस्सा, एक चतुर्थांस, चतकोर
* चोंघा- एक हात व हाताची वळलेली मुठ मिळून होनाऱ्या लांबीचे माप, मुंढा हात
* चोतकार- चतकोर
* चोथवा- चतुर्थांश
* चौत- चतकोर
* जव- यव, सातू, या धान्यांच्या लांबीचे माप
* टका- चौरस बिघे जमिनीचे एक माप
* टीच- अंगठा अग्र ते तर्जनी अग्र यामधील अंतर
* तसू-सूं-: गजाच्या एक विसांश किंवा एक चौविसांश अंश्याइतक्या लांबीचे परिमाण, द्वयंगुळ
* तुळ- जमीनीच्या मोजनीचे लांबीचे परिमाण
* दांड- 24 हात लांबीचा बांध एक परिमाण
* दांडा- चार हात लांबीचे एक परिमाण
* दाणा- मोजण्याचे मुठीचे माप
* दोरी- जमीन मोजनी परिमाण, 20 परतन 80 किंवा 120 बिघे
* धनू- चार हातांचे परिमाण
* धनुष्य- चार हात लांबीचे एक परिमाण
* धूर- जमीन मोजण्याचे एक परिमाण
* नाळवा- 400 हात लांबीचे वजन
* निवर्तन- गुजराथ येथील चार बिघे जमिनीचे परिमाण, दहा हात लांबीच्या वीस काठ्यांचे माप, औरस चौरस 4000 हात
* नेतन- एकर, बिघा इत्यादि सारखे जमीन मोजण्याचे एक परिमाण
* पंचक्रोशि- पांच कोसांच्या आतील गावे, पांच कोस जमीन
* पंचागुळ- पांच बोटे मापाचा
* पराड- 100 यार्डाचे अंतर
* पाइंड- 1/4 इंच प्रमाणाचे लांबीचे एक परिमाण
* पाईण- पांच परतन किंवा तिस चौरस बिघ्याइतका जमिनिचे परिमाण
* पांड- जमीन मोजण्याचे एक परिमाण
* पाडथळ बिघा, पाडथळी बिघा- पंधरा पांडांचा बिघा
* पाव- तिस चौरस बिघ्यांचे जमीन मोजण्याचे परिमाण
* पेंडस- दोन हात लांब
* पोले- एक चौरस काठीचे अथवा बिघ्याच्या एक चारश्यांश हिस्याचे जमीनीचे माप
* फरा- खडी, मुरूम माती वगैरे मापन्याचे 25 घनफुटांचे माप
* बरास- 100 चौरस फुट अथवा 100 घनफुट अथवा 25 घनहात
* बारागणी- जमीन मोजन्याचे 60 बिघ्यांचे एक माप
* बिघा- विस पाड किंवा चारशे चौरस काठ्या जमीन
* बोट- बोटाच्या रुंदी, जाडी, लांबी इतके परिमाण
*मण- जमिनीचे सहा बिघ्यांचे एक परिमाण
* मत्तर- जमीन मोजण्याचे एक परिमाण
* मुंढा- ढा-: मुंढा हात, पाउन हात
* योजन- रस्त्याची लांबी अगर अंतर मोजण्याचे माप, चार कोस, नऊ मैल
* रुटका- बिघ्याहुन लहान असे जमीन मोजण्याचे परिमाण
* रुमालीगज- कापड मोजण्याचा 14 तसुंचा गज
* रूटक्का- बिघ्यापेक्षा लहान जमीन मोजनीचे परिमाण
* रेशमीगज- जमीन मापन्याचा गज
* रेषापरिमाण- लांबी मोजण्याचे माप
* लठ- कापड मोजण्याचा गज
* लेवणा-णु-: तिन चतुर्थांस, पाउन
* वर्के- 30 हात लांब व 7|| हात रुंद किंवा 50 फुट लांब व 12|| फुट रुंद असा जमिनीचा तुकडा
* वसा- एक माप, प्रमाण, वीसा
* वार- गज, यार्ड, तिन फुट लांबीचे प्रमाण
* वाव- दोन्ही हात पसरुन होनारे माप
* वीत- अंगठा अग्र ते करंगळी अग्र यामधील अंतर
* व्यंगुल-ली-: अंगुलाचा साठावा अंश, एक माप
* व्याम- सहा फुट लांबीचे माप, वावभर माप
* शरायणी गज- जमीन मोजन्याचा गज
* सजगणी, सजगाणी- जमिनिचे एक प्रमाण
* सळे, सळा- मापाची पट्टी
* साखळी- जमिनिचि मोजनी करण्याचे एक माप
* सापिका- दीड रूक्याचे जमिनीचे माप
* इलाहीगज- अकबराने सुरु केलेली जमीन मोजनिचि प्रमानित काठी. हा गज 41 अंगुलांचा असे. इंग्रजी अमलात इलाही गजाची लांबी 33 इंच ठरवन्यात आली.

संकलन- श्री आप्पा परब
पुस्तक- हुजूरबाजार

Leave a Comment