महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,27,160

गोडबोले वाडा, बुधवार पेठ, पुणे

By Discover Maharashtra Views: 1713 3 Min Read

गोडबोले वाडा, बुधवार पेठ, पुणे –

पेशवाई अस्तास गेली होती व इंग्रजी अंमल सुरु झाला होता. त्याजआधी म्हणजेच १८९० साली हे तब्बल ४० माणसांचे गोडबोले कुटूंब पुण्यात आले होते. शनिवारवाड्यापुढे दोन गाळे घेऊन तंबूत राहून हस्तलिखित पोथ्या,तक्ते, चित्रे, वेववेगळे पट, कुंकू, जावनी, शाई, पुजेचे सामान विकणे हा व्यवयाय त्यानी सुरु केला. ब्रिटिश प्रशासन सुरु झाल्यावर शिळा प्रेस (दौलमुद्रित) निर्माण झाली. बॉम्बे नेटिव बुक ही संस्था निर्माण झाली. (१८२२) १८५१ साली विश्रामबाग पाठशाळेत पुस्तके छापण्यास सुरवाच झाली. अप्पाजींचा मुलगा नारो (नारायण) याने पुस्तक दोलामुद्रित करण्याचा विचार केला. व पुढे वृत्तमोद’ नावाचे वृत्तपत्र सुरु केले. त्याचे संपादक होते गजानन चिंतामणी देव, किंमत होती १ आणा व एक शिवराई. त्यातून नारो अप्पाजी यांनी लेखन केले.गोडबोले वाडा.

१८५० च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर त्यांनी सदाशिव पेठेतील स्वतःच्या घरात शिळाप्रेस चालू केली व १८५८ मधे स्वतःचा वृत्तप्रसारक नावाचा छापखाना चालू केला. येथून  ‘वृत्तमोद’ व १८५८ मचे स्वतःचा वृत्तप्रसारक नावाचा छापखाना चालू केला. येथून वृत्तमोद’ छापले जाऊ लागले. नारायणजी जावजी दादाजी नावाच्या एका व्यक्तीशी मैत्री झाली. शाई चमकदार होण्यासाठी त्यावेळी चरबीचा वापर केला जात असे. पण ही गोष्ट त्या वेळी समाजमान्य नव्हती. नारायणने गाईच्या तुपात शाई केली व त्यातून ‘गुरुचरित्र हा ग्रंथ छापला, नारायणरावांची तिन्ही मुले लक्ष्मण, भास्कर व विष्णू ही त्याच्या कामात मदत करु लागली. नारायणाचे १८६० मध्ये निधन झाले व तिन्ही मुलांनी एकत्रितपणे धंदा चालू ठेवला. विष्णू नारायण यांनी पंढरपूरला स्वतःचा व्यवसाय चालू केला.

१९०० ते १९९० पर्यंत लक्ष्मण व भास्कर यांनी भागीदारीने वडिलांचा दा चालवला. भास्कर वारल्यावर लक्ष्मण यांनी १९११ मध्ये लक्ष्मी रोडवर ल.ना. गोडबोले नावाने प्रकाशन व पुस्तक विक्रीचा धंदा सुरू केला. दाते पंचांग त्यांनीच वितरण केले आणि नावारुपास आणले. धार्मिक पुस्तके, सांडूची औषधे, त्यांनीय वितरण केले आणि नावारुपास आणले. धार्मिक पुस्तके, सांडूची औषधे, स्लेट पाट्याची विक्री आणि त्याचबरोबर सावकारीपण चालू केले. अनेक संस्था आणि टर्फ क्लबशी त्यांचे संबंध प्रस्थापिल झाले. इंग्रजी भाषेचा लघुकोश त्यांनी तयार केला. आचार्य अत्रे पांना एकदा ते २००० रुपये देऊन जामीन राहिले होते. १९३४ साली त्रिकालवृत्तपत्रात त्याच्यावर पुण्याचे भूषण या नावाने लेख प्रसिद्ध झाला. या वस्तू ला, गोडबोले वावरले. त्यांच्या वस्तू भेटण्यास येणारी मंडळी होती- लोकमान्य टिळक, इतिहासाचार्य राजवाडे, अण्णासाहेब पटवर्धन, ज्ञानकोशकार केतकर, आचार्य अत्रे, अनेक युरोपियन आणि पारशी माळी…

धोंडो केशव कर्वे हे त्याचे मित्र, महाराष्ट्रातील सर्व शाळात पुस्तके व शैक्षणिक साहित्य पुरवण्याचे काम ‘गोडबोले बुक डेपो’ या लक्ष्मीरोडवरील दुकानाने जवळजवळ ५० वर्षे केले. १९४१ मध्ये ल.ना, गोडबोले वारले. त्या वेळी ‘महाराष्ट्राचा बुकसेलर’ हरवला, अशी प्रतिक्रिया अनेक वृत्तपत्रांनी नोंदवली. ग्रंथाच्या विक्रीच्या इतिहासात अजरामर झालेला ल.ना. गोडबोल्यांचा गोडबोले बुक डेपो आज इतिहासजमा झाला आहे. त्यांचा टोलेजंग वाडा मात्र आजही डौलात त्यांची स्मृती जागवत आहे.

वाड्याचे मालक अंध असल्याने परवानगी घ्यावी लागते तरीही परवानगी मिळत नसल्याने वाडा पाहण्याला आलेल्या व्यक्तींचा हिरमोड होतो.

संदर्भ- महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे

(गोडबोले वाडा -बुधवार पेठ, लक्ष्मी रोड पुणे)

© विकास चौधरी

Leave a Comment