महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,68,332

वसंतगडविषयी कृतज्ञता

By Discover Maharashtra Views: 3683 3 Min Read

वसंतगडविषयी कृतज्ञता…

जवळपास चार वर्ष झाली पुरा महाराष्ट्र टीम वसंतगड संवर्धनाने दणदणून सोडलाय.इथल्या प्रत्येक तटाबुरजांना न्याय देण्यासाठी हि टीम अहोरात्र धडपडत आहे..खरतर हा वसंतगड म्हणजे थेट रामायणाशी नात सांगणारा गड होय.इथल्या पश्चिम द्वारावर उभ राहिल कि गोंगावणारा वारा आपल्याशी हितगुज करू पाहतो..
अनेक चेहरे पुढे ठाकतात , ती राम-लक्ष्मण शृपनखा , चंद्रसेन , हे चेहरे रामायनातील तो प्रसंगच उभा करतात…
वा-याची गती वाढली कि शिवकाळ पुढे येतो..महाराजांच्या पराक्रमाची मोहर उमटलेला हा दुर्ग पुढे मोठ्या जिज्ञासेने लढला , मोघलांनी याच्या धार्मिक अवयवावर घाव घातला तेव्हा याला कमी यातना झाल्या असतील काय..? हा पडला जरूर पण तो रडला नाही.पुन्हा हा उभा राहिला जिंकण्यासाठी पुढे तो विजयश्री मिळवूणच विसावला..
तस माझ वसंतगडशी फार जवळच नात , का कोणास ठाऊक पण माझ्या चढत्या-पडत्या काळात मी याच्याशी अनेकदा हितगुज केलय..सुखात अनेकदा याने प्रेरणा दिली हे खर असल तरी दुखात मला कुळस्वामीप्रमाणे पाठीराखा सुद्धा झाला हे अमान्य करू शकत नाही.याच्या पश्चिमेच्या द्वारावर अनेकदा मी रमून गेलोय.तिथला चुनाघाणा जेव्हा मी पाहतो तेव्हा मात्र मी त्याला विचारतो कशा असतील रे पुर्वीच्या इमारती.त्या कृष्णा-कोयना तलावाच्या पाण्यावर आजवर कितीतरी जीव जगत आले असतील.
त्या भग्न अवस्थेतील तट बुरूजांतून मला अनेकदा आवाज ऐकू येतात.इथल्या लेकराबाळांची अब्रु ज्याने ढाल बनून अनेकदा वाचवली त्याला एवढ का उपेक्षिल होत रे..
पुर्न जन्म या कन्सेप्ट वर माझा मुळात कधीच विश्वास बसत नसला तरी सुद्धा हि टीम वसंतगड आणि महाराष्ट्रातील दुर्ग प्रेमी ज्यावेळी मी पाहतो तेव्हा हलकासा विचार मनात येऊन जातो.गडसंवर्धन करण्यासाठी कदाचित महाराजांचे हेच मावळे पुर्नजन्म घेऊन तर आले नसतील ना ? नाहीतर बाजीप्रभू – तानाजी मालुसरे – प्रतापराव – हंबीरराव मामा यांच्या
इतकी निष्ठा आताच्या युगात कुठून आली, आणि हि जेव्हा दृष्टीस पडते तेव्हा मात्र मी विज्ञानयुग विसरतो..

सुरूवातीला कणभर माणसांनी वसंतगड संवर्धनाची सुरवात केली आता हाच समुह ओसांडून वाहतोय..एक काळ होता इकडे येणारी पावले दुर्मीळ होती पण आज याच्या पुर्नबांधनीसाठी एक नाही अनेकांचे हात झटत आहेत.पुढे हाच आकडा हजारोंच्या संख्येने होईल याची वाट आजही वसंतगड पाहतोय..

किती नगारे वाजले असतील त्या ताराराणींच्या आगमनाने , केवढा मोठा जीव झाला असेल रे तुझा वसंतगडा जेव्हा भोसले कुटुंब तुझ्या साक्षिने खलबत करत असेल. हे खर असल तरी मोघलांच्या अघोरी वृत्तीने काय कमी मरणयातना झाल्या असतील काय ?

किती जय पराजयाच्या वार्ता ऐकल्या असशील रे तु ..
खरच रे तु अजोड आहेस , म्हणूनच तुझं कौतुक करण्याइतपत मी मोठा नाही पण तुझा अभिमान वाटण्याइतका नक्कीच लहान आहे..

पण आज तु दिग्गजांच्या यादीत बसला आहेस यात मुळीच शंका नाही.योग्य वेळी तुझ्याविषयी खूप बोलायच आहे..

हा लेख टीम वसंतगडला कृतज्ञतापूर्वक अर्पण..

#प्रदीप_पाटील
#
टीम_वसंतगड

९५६१४१९४६१

Leave a Comment