महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,770

गुपचूप गणपती, पुणे

Views: 1490
2 Min Read

गुपचूप गणपती, पुणे –

पुणे आणि पुण्यातील मंदिरांची नावं ह्यावर एक विशेष लेख होऊ शकेल. पुणेकर म्हणण्याऱ्या किती लोकांना ही नावं आणि त्यांच्या जागा कितपत ठाऊक आहेत हे एक कोडच आहे. ही नावं फारच unique आहेत आणि हे आता जगजाहीर आहे. त्यातीलच हे एक मंदिर गुपचूप गणपती. १०६ शनिवार पेठ इथे असलेले श्री वरद विनायक मंदिर म्हणजेच गुपचूप गणपती. ‘गुपचूप गणपती’ हे नाव अनेकांना चकीत करते. रामचंद्र गुपचूप या शिष्याने आपल्या गुरूंना म्हणजेच मोरेश्वर शास्त्री आणि रावजी शास्त्री दिक्षित यांना हे मंदिर अर्पण केले. तेव्हापासून हा गणपती गुपचूप गणपती म्हणून प्रसिद्धीस आला.

मोरेश्वर शास्त्री हे उत्तम मूर्तिकार होते.  शेंदूर आणि जवसाचे तेल उकळून त्याचे लुंकन तयार करून ते गणेशाच्या मूर्ती साकारत आणि त्यातीलच ही एक मूर्ती आहे. गणरायाची मूळ मूर्ती ही काळ्या पाषाणातील असून शेंदुरच्या लेपाने तिला आकार दिला आहे. ही मूर्ती चतुर्भुज, डाव्या सोंडेची असून तीन फूट उंचीची आहे. गणरायाला गुळाचा खडा नैवेद्य म्हणून ठेऊन आपली इच्छा बोलायची अशी प्रथा इथे आहे. लोकमान्य टिळक, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन या मंदिराला भेटी देत असत. १२ जुलै १९६१ मधील पानशेत च्या पुरामध्ये मंदिराची दुर्दशा झाली परंतु गणरायाच्या कृपेने देऊळ शाबुत राहिले. मंदिरात राजा रविवर्मा यांच्या फोटोफ्रेम तसेच सुंदर असे झुंबर आहेत जे मंदिराच्या सुंदरतेत आणखीनच भर टाकतात.

माघ शुद्ध त्रयोदशीला मंदिराच्या स्थापनेचा दिवस साजरा केला जातो. या मंदिराला गायन आणि किर्तन यांची देखील परंपरा आहे. प्रसिध्द कीर्तनकार कऱ्हाडकर बुवा, कोपरकर बुवा, औरंगाबादकर बुवा, भिडे बुवा अशा कित्यकांची किर्तन कारकीर्द या मंदिरातून सुरू झाली. आश्चर्याची एक गोष्ट म्हणजे त्या काळी पं. अब्दुल करीम खाँसाहेब हे प्रसिध्द मुस्लिम गायक यांनी सुद्धा या मंदिरात गायन करून सर्वधर्म समभाव ऐक्याचं प्रतीक म्हणून या मंदिराचे नाव वाढवले.

या गणरायाला स्थापनेपासूनच एक आगळी वेगळी परंपरा आहे. ती जाणून घेण्यासाठी ह्या मंदिराला नक्की भेट द्या.

संदर्भ :  मुठेकाठचे पुणे – श्री. प्र. के. घाणेकर.

पत्ता : https://goo.gl/maps/V9UovmFpAFLx3ESx7

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment