महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,201

श्री गुप्तेश्वर मंदिर, धारासुर, ता गंगाखेड

By Discover Maharashtra Views: 1391 2 Min Read

श्री गुप्तेश्वर मंदिर, धारासुर, ता गंगाखेड –

चालुक्य शैलीतील उत्कृष्ट व अप्रतिम शिल्पकलेने नटलेले मंदिर. वर्तमान काळात शासन दरबार आणि पुरातत्व विभाग द्वारा जिर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत असलेले मंदिर. श्री गुप्तेश्वर मंदिर, धारासुर.

गंगाखेड परभणी रोडवर रोड पासून आत ५ ते ६ किलोमीटर अंतरावर हे धारासुर चे गुप्तेश्वर मंदिर आहे. मंदिर साधारण १००० वर्षा पुर्वी चे असावे.  हे मंदिर गोदावरी नदीच्या तीरावर आहे.  मंदिर  हे भूमिज शैलीचे असून  जमिनी पासून साधारण १० फूट उंचीवर आहे.  मुख मंडप, अर्ध मंडप, व गर्भगृह अशा रचनेचे  सुंदर मंदिर असून  शिखराचे बांधकाम भाजलेल्या विटांनी केलेले असून आता जीर्ण झाले आहे . मंदिराच्या चोहो बाजुंने सुंदर असे कोरीव नक्षीदार काम आहे.  मंदिराच्या बाह्य भिंतीवर अनेक सुरसुंदरीचे अप्रतिम शिल्प कोरलेले आहेत. या सुर सुंदरी शिल्पात वादक, विना वादीका , बासरी वादक, पत्र लेखा, पुत्र वल्लभा , शुकसारिका ,  चामर धारिनी , भैरवी , विषकन्या, शत्रू मर्दिनी , दर्पणा असे अनेक मंत्र मुग्ध करणारी शिल्प आहेत.

आज जरी मंदिरातील मुख्य देवता गुप्तेश्वर महादेव म्हणजेच शिवलिंग असले तरी कधीकाळी हे मंदिर नक्कीच विष्णू  देवतेचे असावे. याचे कारण म्हणजे मंदिराच्या बाह्य भिंतीवरील बहुतेक सर्व शिल्पे विष्णूची आहेत. याचा  पुरावा म्हणजे या मंदिराच्या जवळच   एका जून्या मंदिरात एक अप्रतीम विष्णूची मूर्ती ठेवलेली आहे. कधी काळी ही विष्णू मुर्ती मुघल किंवा बहामनी आक्रमणापासून वाचवीण्या साठी मुळ मंदिरातुन उचलून इथे आनुन ठेवली आसावी‌.   या विष्णु मूर्तीच्या बाजूलाच एक अप्रतिम महिषासुर मर्दिनी ची सुंदर मुर्ती आहे.

मंदिराच्या बाह्य भिंती वरील देवकोष्ठतील बैठ्या विष्णूची  सुंदर प्रतिमा आहे. असीच एक  विष्णू मुर्ती रस्त्याच्या कडेला भंगलेल्या अवस्थेत ठेवलेली आहे. मंदिर बरेच जीर्ण झाले असून उत्तरेकडील बराच भाग ढासळला आहे. शासनाने व पुरातत्व विभागाने या मंदिराचा जिर्णोद्धार करायला हवा. नाहीतर हे अप्रतिम मंदिर इतिहास जमा होईल.

Jeevan Kawade

Leave a Comment