महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,995

गुप्ती

Views: 1436
2 Min Read

गुप्ती –

गुप्ती हे गुप्त शस्त्र आहे. ज्या ठिकाणी शस्त्र नेण्यास बंदी आहे पण स्वताच्या सुरक्षतीतेसाठी एखाद शस्त्र जवळ असणे अावश्यक आहे त्यावेळी जे गुप्त शस्त्र नेले जाते ते शस्त्र म्हणजे गुप्ती. गुप्ती ही एक प्रकारची तलवारच असून काठी सारखी म्यान असल्याने ती पटकन लक्षात येत नाही. हातात काठी घेउन चालत निघालो तरी तिच्या मुठीमूळे आत बारीक पोलादाच शस्त्र आहे समजत नाही. वेळप्रसंगी या काठीने प्रहार करता येतो. काही कमी प्रसंगात गुप्ती वापरली जाते. ही तलवार काठीत लपवली असल्याने हिला स्वॉर्डस्टिक (Swordstick) ही म्ह्मणतात.

(The narrow blade fits in to a painted wooden sheath, thus disguising it as a walking stick }

संपुर्ण जगात काही शस्त्र असे आहेत की ज्यांच मुळ भारतात आहे. हे भारताच पारंपारीक शस्त्र आहे. पात हे पुढे टोकदार व दुधारी असते तर काठी वर सुंदर नक्षीकाम केल असत. मुठ ही दिसायला डोलदार असते .प्राण्यांचे चेह-याच्या आकारात या दिसतात. काठीने चालताना पकडायला सोपी असते.

फकीर बैरागी साधु लोक धर्म प्रसारासाठी यात्रे साठी संपूर्ण भारत फिरत असतात.यांना शस्त्र   धारण करण्याची अनुमती नसते. त्यांच्यावर होणारे हल्ले लक्षात घेता या लोकांनी सुरक्षितीते साठी आपल्या वैशाखीत ( झोळीत )एक शस्त्र ठेवत असत हेच गुप्त शस्त्र पुढे गुप्तीत (swordstick) रुपांतर झाल.

संत रामदास स्वामी जेव्हा भारत परिक्रमेला गेले तेव्हा त्यांच्या सोबत कुबडी असयाची. या कुबडीवर बगल ठेउन जप करत.

पण या कुबडीच्या आत एक लहान तलवार होती. कुबडीचा दांडा बाहेर काढला की त्या दांड्याला तलवार होती. शिवकाळात मोघली अक्रमणांपासून व धर्मप्रचारासाठी या कुबडीचा उपयोग झाला. हि गुप्ती कुबडी सज्जनगडावर पाहायला मिळते.

गुरु गोविंदसिंग यांच जे पंचकला शस्त्र आहे त्या पाच शस्त्रात गुप्ती हे एक आहे. हे पंचकला शस्त्र #शस्त्रप्रतापगार बडोदा संग्राहालयात मी पाहील आहे. या गुप्तीची  लांबी मुठीसह १२” आहे.

१८व्य‍ा शतकाच्या उत्तरार्धात राजे लोक व श्रीमंत लोक या #स्वार्डस्टीक चा वापर जास्त करू लागले .यात स्त्रियाही होत्या. जगात आनेक शस्त्रांच्या व्यापारावर बंदी आहेत .त्यात roman dolon , जपानी shikomizue व भारतीय गुप्ती आहे. बेलजिअम, फ्रान्स, न्युझीलंड  व भारतात हे शस्त्र सहाव्या श्रेणीत प्रतिबंधक आहे.

संतोष चंदने, चिंचवड, पुणे.

Leave a Comment