महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,837

अपरिचित असे बाळप्पामठ | गुरु मंदिर, अक्कलकोट

Views: 2955
2 Min Read

अपरिचित असे बाळप्पामठ, गुरु मंदिर, अक्कलकोट –

श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे अक्कलकोटचे श्रध्द‍ास्थान. आनेक भक्त येथे स्वामींच्या दर्शनाला येथे येत असतात. स्वामींच्या आनेक भक्तांमधील विशेष असे दोन भक्त होते. एक चोळप्पा महाराज तर दुसरे बाळप्पा महाराज. स्वामींच्या अवतार कार्याचा काळ समाप्त होण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी बाळप्पाला जवळ बोलवून सांगीतलेकी माझा अंतिम समय जवळ आलाय तेव्हा मी तुला माझा उत्तराधिकारी नेमणार असून असे सांगून स्वामींनी आपल्या जवळची रुद्राक्षमाळ , दंड ,छाटी व चिन्मय पादुका त्यांना दिल्या . स्वामींनी त्याला आज्ञाकेली की एक स्वतंत्र बाळप्पामठ | गुरु मंदिर बांधून त्यात अन्नदान कर व या मठात गुरुसेवा अखंड चालू राहूदे.

स्वामींच्या आज्ञेने बाळप्पा महाराजांनी येथे एक मोठा मठ बांधला तो म्हणजे बाळप्पा महाराज मठ. या मठास गुरू मंदिर किवा चिन्मय पादुका मंदिर असेही संबोधतात.

स्वामींनंतर पुढे या गादीवर बाळप्पा महाराज आले. त्यानंतर श्री गंगाधर महाराज व नंतर गजानन महाराज गादीवर आले.

या गुरु मंदिरात बाळप्पा महाराज व गंगाधर महाराजांची समाधी असून गजानन महाराजांची समाधी जवळच शिवपूरी येथे आहे. ( शिवपूरी येथे अग्निहोत्रावर फार मोठे काम चालते ) असे हे अक्कलकोट मधील गुरू मंदिर फारसे कोणाला माहीत नाही.

जवळ जवळ १२० वर्ष झाले या मठाला. हा मठ म्हणजे एक भव्य वाडाच असून भव्य प्रवेशद्वार वर नगारखाना आहे. द्वारावर गणपती तर खाली किर्तीमुख कोरले आहे. सभामंडप ,गाभारा भव्य असून आत मध्ये बाळप्पा महाराज व गंगाधर महाराज यांच्या समाधी आहेत. या मठात खूपच प्रसन्न वातावरण असल्याने स्वामींबद्दल भक्तांमध्ये प्रेम निर्माण होते.

अक्कलकोट मधील ह्या गुरु मंदिरात अवश्य दर्शनाला जा.

संतोष मु चंदने. चिंचवड, पुणे

Leave a Comment