जुन्नर तालुक्याचा ताजमहाल म्हणजेच हापूसबागचा हबशी घुमट
नारायणगाव ते जुन्नर हायवेने जुन्नरला आलात कि याच रस्त्यावर विशाल दगडी वेस जुन्या एस.टी स्टॅन्ड जवळ बांधण्यात आली आहे. याच वेशीच्या पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले की एक आमरापुरकडे जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. याच रस्त्याने सरळ पूर्वेकडे साधारणतः सव्वा कि.मी गेलात की आपणास डावीकडे या विशाल वास्तूचे दर्शन घडते.
असे म्हटले जाते की हा सतराव्या शतकातील निजामशाही राजवटीत मुघलकालीन स्थापत्य शैलीचा एक अनोखा देखावा आहे.
निजामशाहाचा वजीर मलिकांबर यांच्याशी संबंधीत ही वास्तू आहे. जो की आफ्रिकेतील हाबसन प्रांतातून आलेल्या जुन्नर येथील हबशीबाग येथे तो वास्तव्यास होता. आज याच हबशीबागचा उल्लेख हापुसबाग असा करण्यात येत आहे.
ऊंचच ऊंच 55 फुट रुंद व 60 फुट लांब कोरीव शिळेतील चौरसाकृती ही वास्तू लक्ष वेधून घेतल्या शिवाय राहत नाही.
साधारण 50 फुट ऊंचीच्या नक्षीदार भिंतीवरील कमानीवर 30 फुट उंच असलेला वरील घुमट अलगद तोलुन धरल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण पहावयास मिळते.
आतील भागात नऊ समाध्या असुन. येथे आपण जोरात आवाज दिलात तर त्या ध्वनिचे नऊ पडसाद पुन्हा पुन्हा त्याच वेळी ऐकू येतात.व याच आतील भिंतीवर कुराणातील आयने कोरल्याचे निदर्शनास येते.
या वास्तूचा मलिकांबरशी संबंधीत कोण्या मोठ्या असामीचे हे स्मारक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुरातत्व विभागाने आता या वास्तूचे मजबुतीकरण करूण संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेतले असून ते अंतिम टप्प्यात पुर्ण होत आले आहे.
लेखक /छायाचित्र – खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
(माजी सैनिक खोडद)
माहिती साभार :- निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज