महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,26,621

शिखर शिंगणापूर आणि भोसले घराणे

By Discover Maharashtra Views: 3954 4 Min Read

शिखर शिंगणापूर आणि भोसले घराणे…

मोठा महादेव म्हणजे शिखर शिंगणापूरचा महादेव होय .हे शिखर शिंगणापूर सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात येते , दहिवडीतून अवघ्या 20 km वर तर नातेपुते ह्या गावातून 15 km वर असलेले शंभू महादेव मंदिर हे सातारा सांगली सोलापूर आशा तीन जिल्ह्यांच्या सीमा भागावर वसले आहे . (शिखर शिंगणापूर आणि भोसले घराणे)

शिखर शिंगणापूर हे महादेव मंदिर महादेव डोंगर रांगेतच असून शिवकाळात ह्या डोंगर रांगेचा गनिमी कावा युद्धा साठी वापर केला जात होता . शिखर शिंगणापूर महादेव मंदिर हे हेमाडपंथी असून हे मंदिर राजा सिंगणदेव यादव यांनी बांधले होते इस्लामी राजवटीत ही अनेक शाह्यांचे आक्रमणे झेलून हे मंदिर कसेबसे उभे होते .  हा शंभू महादेव उत्तरेतील सिसोदे घराण्याचा कुल दैवत मानला जातो दक्षिणेत आलेल्या सिसोदे घराणे भोसले आडनाव धारण केल्यापासून शंभू महादेव यांची निष्ठतने भक्ती करीत असावे .

स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती यांचे आजोबा निजामशाहीतील तैलदार वजीर यांनी शंभू महादेवावर असीम निष्ठा आणि भक्ती असल्याने शंभू महादेवास येणाऱ्या भाविकांची पाण्यावाचून गैर सोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी शिखर शिंगणापूर येथे खूप मोठा तलाव खोदण्याचे काम सुरू केले आणि ह्या पराक्रमी पुरुषाला इंदापूर येथे शत्रूंचे बंडावे मोडत मोडत वीरमरण आले .

शहजीराजे लहान असल्याने निजामशाहीच्या वतीने कारभाराची सूत्रे विठोजीराजे मार्फत चालू राहिली आणि पुढे शहाजीराजे एक बलवान दूरदृष्टीचे  राजे बनले .  शहाजीराजे यांच्या पराक्रमाच्या जोरावर निजाम ही हतबल झाला शहाजीराजेंचे प्रत्येक लढाईत गनिमी काव्याचे वेगळेच दर्शन घडत असे निजामशहचा वजीर देखील शहाजीचा द्वेष करायला लागला होता असे बलशाही , महाबाहु , दक्षिणाधिश , महाराज शहाजीराजे भोसले यांनी आपल्या वडिलांनी हाती घेतलेल्या पिण्याच्या पाण्याचे तलाव साधू संतांसाठी मठ वगैरे बांधून घेतले .

चौरस पसरलेल्या राजवटीत ह्या शिंगणदेवाच्या महादेव मंदिराच्या गावास हैबतपुर म्हणून ओळखू लागले होते , महाराज शहाजीराजेंनी हैबतपुरचे ” शिंगणापूर ” हे नाव ठेवून यथार्थच सिंगणदेवाच्या नावाने हे गाव पुन्हा व्यवस्थित वसवले . शिंगणापूर येथील पाटीलकी सिंगडे नामक व्यक्तीकडे होती शहाजीराजेंनी  1630 साली साडे तीनशे होणास विकत घेऊन शहाजीराजे विजापुरास रुजू झाले .

विजापूरच्या बादशाही कारकिर्दीत शहाजीराजे दक्षिणेत नेमले गेले शहाजीराजेंनी तेथील सर्व हिंदू पाळेगारांना एकत्र करून बेगरुळात शहाजीराजे स्वतंत्र कारभार करू लागले संपुर्ण दक्षिणेत शहाजीराजेंनी वचक बसली होती . पुण्यातून शिवजीराजेंनी मावळात देशमुख एकत्र करून स्वराज्य उभे केले होते शहाजीराजेंनी स्वराज्याचा पाया रचून स्वराज्य भक्कम करून अखेर 1664 साली होदगिरी येथे शिकरिस गेल्यावर घोड्याचा पाय घसरून शहाजीराजे सोडून गेले . शहाजीराजेंची समाधी व्यंकोजीराजेंनी बांधून घेतली आणि शिवाजी महाराजांनी समाधीवर छत्री बांधून घेतली होती .

शंभू महादेव डोंगरावर दक्षिण बाजूस मंदिरापासून अवघ्या 100 मी .इतक्या अंतरावर राजा शिवछत्रपती यांनी महाराज शहाजीराजेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक सुंदर अशी डौलदार समाधी छत्री बांधून घेतली होती . शिखर शिंगणापूर येथे शहाजीराजे यांची पहिली छत्री बांधून ती राजा शिवछत्रपती यांनी , छत्रीची बांधकाम शैली सुंदर असून आतमध्ये एक चौरस सीवलिंग ठेवलेले असून त्या शिवलिंगास चहूबाजूने प्रदक्षिणा घालता याही असेच छोटा भु  कोठार मार्ग आहे .

पुढे शिवछत्रपती यांच्या कारकिर्दी नंतर जेष्ठ पुत्र संभजीराजे छत्रपती झाले आणि आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत मोगलांना लढा देत वीरमरण आले , पुढे राजाराम महाराज , ताराराणी साहेब यांनी देखील मोगलांना प्रखर कडवी झुंज दिली आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शंभूपुत्र शाहू महाराज यांची सुटका झाली . शाहू महाराज गादीवर विराजमान झाल्यापासून स्वराज्याचे रूपांतरण साम्राज्यात झाले आणि 1735 साली शिंगणापूर येथील महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिरासमोर बिरुबाईसाहेबांनी मंडप उभा केला .

शाहू महाराज यांनी आपली भूमी मोगलांपासून मुक्त करून आपल्या आजोबांची समाधी छत्री आपल्या परमप्रतापी शंभू छत्रपती यांची समाधी छत्री स्मृतिप्रीत्यर्थ , पणजोबा शहाजीराजेंच्या समाधी छत्री शेजारी उभ्या केल्या आणि त्यास चहू बाजूने छोटी तटबंदी घालून ठेवली . या शंभू महादेवा प्रमाणेच भोसले घराण्याची देखील कीर्ती अजरामर झाली .

– गडप्रेमी बाळासाहेब पवार

(शिखर शिंगणापूर आणि भोसले घराणे)

Leave a Comment