महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,87,527

इतिहासकर्ते मराठे

Views: 3657
2 Min Read

इतिहासकर्ते मराठे…

मराठे उत्तरेत मैदान मारत होते या दरम्यान दक्षिणेत काही प्रमाणात मराठ्यांचे लक्ष थोडे कमी झाले होते म्हणून हैदर अलीसारख्यांना दक्षिणेत पाय रोवणे सोपे झाले चिक्ककृष्णराज आणि त्याच्या प्रधानांना कैद करून त्यांची सत्ता बळकावली. मराठ्यांच्या ताब्यात असलेले शिरा, हासकोट हे भागही तत्यानं बळकावले तेव्हा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रातून मराठ्यांना येणे भाग पडले.इतिहासकर्ते मराठे.

त्यावेळी दक्षिणेत आपले पाय रोवून खंबीरपणे आपले संस्थान चालवणारे मुरारराव घोरपडे यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्रातून खाली कर्नाटकात उतरलेल्या सैन्याने हैदरच्या मुसक्या आवळायला सुरवात केल्या. नुकतेच गमावलेललं शिरा हे ठानं दहा दिवसात परत घेण्यात आलं जवळचाचा मदगिरीचा पहाडीदुर्गही मराठ्यांनी जिंकला. यानंतर मोठ्या जोश्यात असणाऱ्या मराठा सैन्याने आपला मोर्चा आता गुर्रमकोंड्याकडे वळविला

ऐन पावसाळ्यात मराठ्यांनी गुर्रमकोंड्याला वेढा घातला. यावेळी हैदरअली चा एक सरदार मीर रेझा याचा भाऊ सैदू मिया यावेळी किल्ल्यावर होता. एककाळ होता जेव्हा हा सैदू मिया मराठ्यांची चाकरी करत होता; पण आता तो हैदरच्या बाजूने उभा होता. एकाबाजूने त्र्यंबकराव पेठेयांनी मोर्चापार खंदकाला नेऊन भिडवला. व तीन – चार ठिकाणी सुरुंग पेरण्यासाठी भुयारंहि खणली. तुटपुंज्या साधन-सामुग्रीमुळे किल्ल्यावरील सैन्याचासुद्धा धीर खचत चालला होता. साठा संपल्यानं घोडा आणि गाय मारून लोक खाऊ लागले होते.

२ ऑक्टोबर १७७० रोजी मराठ्यांनी पेरलेला एक सुरुंग उडवण्यात आला, तटाला मोठे भगदाड पडले. त्याबरोबर मराठी फौज त्या भगदाडातून आत घुसली. इतरही सुरुंग उडाले आणि लोकं टेकिस आले आणि त्यांनी शस्त्रे खाली टाकून तहाची बोलणी सुरु केली. १९ ऑक्टोबरला गुर्र्मकोंड्याच्या किल्ल्यावर मराठा निशाण फडफडू लागले. गुर्र्मकोंडा मराठ्यांच्या हाती लागल्यानं हैदर पुरता हादरून गेला होता

(१८०२ साली मद्रास इंजिनीय सर्वेक्षक थोमस फ्रासेर यांनी शाईनं काढलेला हा गुर्र्मकोंड्याचा नकाशा)

माहिती साभार  – Abhishek Kumbhar

Leave a Comment