ऐतिहासिक पारे गाव –
सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक गावांची महिती घेत असताना पारे या गावी भेट दिली. पारे हे गाव विटा पासून 7 किलोमीटर आग्नेय दिशेला आहे. सभोवताली 4 बाजूस डोंगर व मधोमध गाव असून गावास नैसर्गिक संरक्षण कवच लाभलेले आहे. गावाशेजारून ओढा जातोय. एका दृष्टीने सूजलाम सूफलाम असेच गाव आहे.
गावामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. गावातील मारुती मंदिर जवळ वीरगळ एकत्रित ठेवलेला दिसून येतात. त्यातील एका वीराला पालखी चा मान आहे.त्याला लागूनच तीन चौपाळी चा संच आहे. ह्या कदाचित समाध्याच असाव्यात. गावात चक्रेश्वराचे जुने दगडी बांधकाम असलेले मंदिर असून सध्या त्याची मोठी वाताहत झाली आहे. गावात अनेक वाडे असून गावचे ग्रामदैवत दर्गोबा आहे. गावात एक प्रचंड मोठा घुमट असून सध्या त्याची दुरावस्था गावातील लोकांनी केली आहे. बांधकाम अतिशय मजबूत आहे.
सरंजामी मरहट्टे संतोष पिंगळे लिखित पुस्तकात पारे गावच्या अनुषंगाने काही ऐतिहासिक पत्रे प्रकाशित केली असून हे गाव सोलंकर मंडळीचे परंपरागत वतनाच गाव आहे. छ शाहू महाराज यांनी सरदार गिरजोजी सोलंकर यांना दिलेल्या वतनपत्रात पारे या गावचा उल्लेख येतो. सोलंकर अथवा सोनवलकर किंवा सोनलकर ही एकच मंडळी असून फलटण तालुक्यातील सात गावचे वतनदार म्हणून हे घराणे प्रसिद्ध आहे. हटकरराव हीरोजी सोनवलकर यांचे विषयक अनेक ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित आहेत. ह्याच घराण्याची एक शाखा पारे या ठिकाणी स्थायिक झाली आहे. सोलंकर यांची एक शाखा हितुन पुन्हा बाहेर पडली असून त्यांना सध्या पारेकर या नावाने संबोधले जाते.हटकरराव हीरोजी सोनवलकर यांचे विषयक अनेक ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित आहेत. ह्याच घराण्याची एक शाखा पारे या ठिकाणी स्थायिक झाली आहे. सोलंकर यांची एक शाखा हितुन पुन्हा बाहेर पडली असून त्यांना सध्या पारेकर या नावाने संबोधले जाते.
सोलंकर यांची मुख्य कुळी वाघमोडे असून वाघमोडे सोलंकर पारेकर हे कुळीचे भाऊ आहेत. या मंडळीचा कुळस्वामी फलटणचा शिंदे घराण्यातील धूळोबा आहे. तर वाघमोडे घराण्यातील मिताबाई ही धुळोबाची पत्नी आहे. अगदी ह्याच धर्तीवर पारे गावात दर्गोबा मंदिर असून त्यात त्यांची पत्नी म्हणून मिताबाई आहे. माझ्या वैयक्तिक मतानुसार हा दर्गोबा म्हणजे सोलंकर पारेकर वाघमोडे यांचा कुलस्वामी धुळोबाच असावा. आणि सोलंकर मंडळीनी पारे गावी स्थापित केला असावा. मात्र ह्यावर आणखी संशोधन होणे गरजेचे आहे.
धन्यवाद
मधुकर हाक्के व पृथ्वीराज सरगर
मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ
दर्गोबा हे दर्लिंग देवाचे उपभ्रवंश होवून तयार झालेले नाव आहे. दर्लिंग देवाचे मूळ ठाणे कर्नाटकातील मुचंडी हे आहे. मुचडी हे देवस्थान प्रसिद्ध असून ते दरीअप्पा/ दर्याप्पा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. दर्लिंग देवाची तीन मंदिरे पंढपूर तालुक्यातील चळे, आंबे आणि तारापूर या ठिकाणी आहेत. चैत्र पोर्णिमेला याची मोठी यात्रा भरते. दर्लिगाची पत्नी मिताबाई आहे.