महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,43,143

डुबल घराण्यातील स्त्रियांचे ऐतिहासिक योगदान

By Discover Maharashtra Views: 4151 3 Min Read

डुबल घराण्यातील स्त्रियांचे ऐतिहासिक योगदान

स्वराज्याच्या उदयकाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात अनेक नामांकित लढाऊ घराणी उदयास आली. साळोखे डूबल हे त्यापैकीच एक कराड हे या घराण्याचे वास्तव्याचे मूळ ठिकाण गुजरातमधिल चालुक्य राजघराण्याचे हे वंशज. शिवपुर्वकालात या घराण्याची एक शाखा कराड मध्ये आली.तेथे कराड पेठच्या महाजनकिचे वतन आणि कराड प्रातांच्या देशचाैगुले चे वतन मिळाले.

राजाराम महाराजांच्या काळात या घराण्यातील वीरांचा स्वराज्याच्या लष्करात समावेश झाला.ओरंगजेबाच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा कारभार साताराच्या छत्रपती शाहुंकडे आला. छ.शाहुंच्या काळात. बाळोजी साळोखे डुबल यांनी स्वराज्य रक्षणासाठी खुप प्रयत्न केले.त्यांच्या पत्नी राणुबाई शिर्के घराण्यातील होत्या. त्या छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी सकवारबाई यांच्या बहिण होत.छत्रपती शाहू महाराजांनी १७३९ साली मिरजेचा किल्ला आणि प्रांत मोगलांकडुन जिंकून घेतल्यानंतर या प्रांताचा कारभार त्यांनी आपले आप्त बाळोजी साळोखे – डुबल यांच्याकडे दिला.बाळोजींचा भाऊ सिदोजी.,मुलगा शिवाजी आणि अग्णोजी, शिवाजीचा मुलगा नाथाजी ,नाथाजींचा मुलगा कृष्णराव. असे ऐकापेक्षा एक पराक्रमी पुरूष या घराण्यात निपजलेल्या.सिदोजी आणि शिवाजी हे लढाई मध्ये मारले गेले. नाथाजीनी कर्नाटकात टिपुविरोधातील लढायात पराक्रम गाजवला.

अशा या पराक्रमी घराण्यातील महिलांही हिकमती होत्या.त्यांनी डुबल घराण्याचा कारभार नेटाने चालवला. त्यासंदर्भातील अडीचशे वर्षापुर्विची काही ऐतिहासिक कागदपत्रे उजेडात आली आहेत.बाळोजी साळोखेंच्या पत्नी राणुबाई या घराण्यात मोठ्या असल्याने त्यांना आदराचे स्थान होते.बाळोजी हे नेहमी स्वारीवर असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत राणुबाईनी डुबल घराण्याला मिळालेल्या देशचाैगुलकी या वतनासह अन्य सरंजामाचा कारभार पाहात.बाळोजींच्या निधनानंतर काहि काळ त्या हयात होत्या. शिवाजी साळोखे हे हुमणाबादच्या स्वारीवर गेले असता त्यांना स्वारी खर्चासाठी पैसे पाठवून दिले होते.राणुबाई ह्या घोडेस्वारीत पटाईत होत्या.त्यांची’ मैना’ नावाची घोडी होती.राणुबाईंची समाधी कराडच्या कृष्णानदीकाठावर आहे.

धुळगाव शाळेचे मुळ पुरूष सरदार अग्नोजी साळोखे -डुबल यांच्या पत्नी धाकट्या ताराबाई या धैर्यवान होत्या.सन १७५६-५७ च्या सुमारास अग्नोजींची मिरजेचे तत्कालीन किल्लेदार शिवाजी बल्लाळ जोशी ( माधवराव पेशव्यांचे सासरे) यांनी कपटाने हत्या केली.त्यानंतर ताराबाई या मिरजेत सती गेल्या.मिरजेच्या दक्षिणेस त्यांचे सतीमंदीर आजही पहावयास मिळते.
सरदार शिवाजी साळोखे यांच्या पत्नी कृष्णाबाई होत.त्यांचे पुत्र नाथाजी यांना दोन पत्नी होत्या. थोरल्या कोयनाबाई अाणि धाकट्या जोगाबाई उर्फ भागाबाई शिवाजी साळोखे – डुबल यांचा मृत्यू कर्णाटक स्वारीत तुंगभद्रेनजीक झाला.त्यावेळी त्यांचे पुत्र नाथाजी लहान होते.त्यामुळे शिवाजीच्यां दोघा पत्नींनीच सरंजामाचा कारभार पाहिला.या दोन्ही महिलांची अनेक पत्रे उपलब्ध आहेत.पतीच्या स्वारीत कराड आणि गुंडेवाडीहुन कोयनाबाईनी हत्ती पाठविल्याच्या नोंदी या पत्रात आहेत.कराड आणि गुंडेवाडी येथील सरंजामाच्या वसुलीचा कारभार त्यांनी मोठ्या हिकमतीने केला.
डुबल घराण्यातील या स्त्रियांचे ऐतिहासिक योगदान आजवर दुर्लक्षीतच राहिले आहे.

त्यांच्यासंदर्भात ऐतिहासिक कागदपत्रे उजेडात आणण्याचे काम मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांनी केले आहे.त्यांना डुबल घराण्यातील वंशजांचे याकामी सहकार्य लाभले आहे.

माहिती साभार – History of Maratha Sardar Family

Adv Vishal Barge Inamdar

Leave a Comment