महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,277

सिंहगड वरील ऐतिहासिक स्मारक उजेडात

By Discover Maharashtra Views: 4219 2 Min Read

सिंहगड वरील ऐतिहासिक स्मारक उजेडात

शिवाधीन दुर्गसवंर्धन संस्थेचा उपक्रम

?शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने 21 व 22 एप्रिल 2018 रोजी सिंहगड स्मारक संवर्धन मोहीम आयोजित कारण्यात आली होती ?

सिंहगडाच्या इतिहासात घेरा सिंहगड आणि तेथील मेटं यांचे फार मोठे योगदान आहे. यापैकीच एक मेट म्हणजे आम्रीबुवाचे किंवा अम्रुतेश्वराचे मेट. जेथुन तानाजी मालुसरेंनी ,घेरेसरनाईक खंडोजी कोळी यांना विश्वासात घेऊन , अम्रुतेश्वराचा गोंधळ करुन आपल्या बलिदानाने सिंहगड स्वराज्यात परत आणला. खर तर काही महिन्यांपूर्वी भटकंतीची मोहीम करत असताना आम्हाला कोळीवाड्यावर जाण्याचा योग आला.कोळीवाड्याच्या बाजूच्या परिसराची भटकंती करताना सिंहगडाचे रक्षण करताना लढाइमधे विरमरन आलेल्या अनेक विरांची स्मारके आमच्या नजरेस पडली.ही स्मारके त्या ठिकाणी उपेक्षित पने मातिमधे पूर्ण गाडून पडली होती.दाट काटेरि झाडे स्मारकावर वाढलेले गावत व शेवाळ तसेच भोवतालि जमा झालेला मातीचा ढिगारा यान मुळे ही स्मारक मातिमोल होऊन चार दोन वर्षात नामशेष झाली असती.याच स्मारकांचे संवर्धन करण्यासाठी इतिहासाचे अभ्यासक नंदकिशोर मते सर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने या मोहिमेचे आयोजन केले होते.

शिवाधीन दुर्गसवंर्धन संस्थेचा उपक्रम

मोहिमे दरम्यान आम्ही स्मारकांच्या बाजूची वाढलेली काटेरि झुडपे तोडून भोवतालचा परिसर स्वछ केला.पावसाच्या पाण्यामुळे वाहून आलेल्या मातिमधे काही स्मारके तिन ते चार फुट गाडली गेली होती.तो मातीचा ढिगारा बाजूला करुण सर्व स्मारके मोकळी केली.पुन्हा माती जमा होउ नए म्हणून चार फुट उंच दगडाची संरक्षक भिंत स्मारकांच्या भोवती उभी करण्यात आली.स्मारकांवर आलेले शेवाळ व गावत ब्रश च्या सहाय्याने काढून स्वच्छ करण्यात आले.

आपल्या पूर्वजांचा इतिहास संवर्धन करुण तो जतन करण्याचा प्रयत्न शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून व इतिहास अभ्यासक मते सर यांच्या मार्गदर्शना खाली आम्ही केला.या पुढे जर अशी ऐतिहासीक विरांची स्मारके आपणास निदर्शनास आली तर आम्हास संपर्क करा.आम्ही ती जतन करण्याचा प्रयत्न करू.

संपर्क
नंदकिशोर मते-9850422224
आशुतोष देशमुख-7387242789
दत्तात्रय जाधव-8180057773
महेश रेनुसे-8208066984
दत्ता जोरकर-7972322885
चेतन शिर्के-9130237903
?या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शिवभक्तांचे मनापासून आभार?
?शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्थ आपला गड आपला श्वास?

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमचे Discover Maharashtra (शोध महाराष्ट्राचा) हे पेज लाईक करा

 

(कोलीवाड्याच्या इतिहासाबद्दल कोणाला माहिती असेल तर ती नक्की द्या.)

Leave a Comment