हिंदू मूर्तीपूजेचा इतिहास –
वैदिक धर्मामध्ये ‘बाबरी’ नावाचा एक प्रकांड पंडित इ.स. ६०० ते ८०० या दरम्यान होऊन गेला. तो मोठा विद्वान असून त्याचा शिष्य संप्रदाय भरपूर होता. त्याच्या मते ‘स्वर्ग’ ही एक कल्पना आहे. म्हणून भक्ती मार्गाचा अवलंब करताना आणि आपली श्रद्धा निश्चित करण्यासाठी परमेश्वराच्या प्रतीकांची आवश्यकता आहे! या गरजेमधूनच प्रतीक पूजनाचा म्हणजेच मूर्तीपूजनाचा प्रघात पडला. त्यामुळे मूर्तीपूजेची कल्पना समाजामध्ये लोकप्रिय झाली.(हिंदू मूर्तीपूजेचा इतिहास)
निराकार भक्तीपेक्षा मूर्तिपूजा लोकांना साधी, सोपी व सुटसुटीत वाटू लागली. शिव आणि विष्णू यांच्या मूर्ती प्रत्येक घरामध्ये दिसू लागल्या. प्रथमतः सदरच्या मूर्ती ओबड-धोबड दगडाच्या प्रतीक या स्वरूपात होत्या परंतु कालांतराने ओबड-धोबड मूर्तीऐवजी मनुष्याकृती देवता प्रत्येकाच्या घरामध्ये दिसू लागल्या. मूर्तीपुजेमुळे लोकांच्या धार्मिक जीवनामध्ये अमुलाग्र बदल होत जाऊन यज्ञ किंवा होम हवन यांचे महत्त्व कमी होऊन ते क्वचित प्रसंगी घडू लागले. सत्कर्म म्हणजे ब्राम्हणास किंवा गरीबास दान देणे, तीर्थयात्रा करणे, तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करणे, मुर्तीरुप देवतेची पूजा करणे, असे समजले जाऊ लागले.
मूर्तीपूजेच्या लोकप्रियतेमुळे समाजातील सर्व वर्ग एका पातळीवर आले.
संदर्भ – मराठे व प्राचीन महाराष्ट्र
आदित्य अरुण गरुड-देशमुख