सैह्याद्रीच्या कुशीत रडतोय शिवबांचा इतिहास.
खुप काही लीहावस वाटतेय, या सैह्याद्रीच्या कुशीत रडत असलेला शिवरायांचा इतिहास पाहुन. काळजी तुटतय पण करनार काय ? मेलेल्या मड्या सारखा नीपचीत पठलाय सैह्याद्रीच्या कुशीत उपाजलेला माझा मराठा.”विसरला आहे मुरारबाजी, तानाजी, यसाजी, बाजी पासलकर, हंबीरराव मोहिते कान्होजी, नेताजी, संताजी धनाजी यांच्या सौर्याला.” त्यांनी घातलेल्या स्वताच्या रक्ताच्या अभिषेकास. इतका पैश्याच्या पाठी लागला की तो मराठे शाहीचा गौरव शाली इतिहास विसरला. हे पाहुन रडतोय सैह्याद्री, टाहु फोडतोय, हंबरटा फोडतोय सैह्याद्रीच्या कुशीत शिवबांचा इतिहास. अरे ऊठ सैह्याद्रीच्या लेकरा जागा हो डोळ्यावरील झापडे उघडुदेत तुझ्या. आज हा सैह्याद्री साद घालतोय तुला, शिवबाचा इतिहास त्याने त्याच्या उराशी कवटाळुनी ठेवीलेला घे तु तुझ्या हाती. आणि दाखव या हरामजाद फितुरांना ज्यांनी बाजार मांडला आहे मावळ्यांच्या बलीदानाचा, त्यांच्या शौर्याचा. बघ वाट पाहतोय तो रायगड तुझ्या आगमनाची, त्यांचे डोळे वाट पाहुण थकलेत रे तुझी. तरीही सैह्याद्रीच्या लेकरा कसली रे ही काळ झोप आली आहे तुला. गनीम तुझ्या उरावर बसाय लागला तरीही तुझी काळ झोप उघडत नाही.
सैह्याद्रीच्या कुशीत रडतोय शिवबांचा इतिहास.
अजिंक्यतारा वरती चालु असलेले प्रेमी युगलांचा व दारूडे यांनी चालवलेला बाजार पाहुन रडतोय सैह्याद्रीच्या कुशीत शिवबाचा इतिहास. कृष्णा वेन्ना संगमातिरी अखंड हिंदुस्थान छञपती शाहु महाराज, छञपती ताराराणि यांच्या समादीची दुरवस्था पाहुन. किल्ले गडकोट यांच्या वरती होणार्या दारू पार्ट्या नंगा नाच करनारी तरून पीढी, हे पाहुनी सैह्याद्रीच्या कुशीत रडतोय शिवबाचा इतिहास. गनीमांच्या तोफांच्या गोळ्यां समोर छाती कोट करून पुढे करून ठाम पणे न डगमगता उभे राहुन रयत पोसली हिंदवी स्वरांज्य घठवल तोच सैह्याद्री, तेच किल्ले गडकोट यांच्या कडे पाहुन रडतोय सैह्याद्रीच्या कुशीत शिवबांचा इतिहास. अरे बायकोच्या, कुशीत दारूच्या अंड्डयावर, शिगारेट ची थोटक वडत बसलेल्या, पैश्याच्या पाठी पळत असलेल्या छञपती शिवरायांच्या शौर्याला विसरलेल्या, हीजड्या सारखा शांत बसलेल्या सैह्याद्रीच्या लेकरा उठ आता, तुझ्या धमन्यांमधील रक्त ऊसळुदे सोडुनी सारा मोह, दे साद तुझ्या सख्या सवंगड्या सैह्याद्रीला. आणि शिवबांचा इतिहास पुन्हा एकदा त्याच स्फूर्तीने मांड जगा समोर. दाखव त्या बाजार बुंडग्याना खरा इतिहास. कळुदेत जगाला काय चीच आहे हा सैह्याद्री, काय आहेत छञपती, काय आहेत मावळे. *विसरून जाऊ नकोस तु प्रतापगडा चा रनसंग्राम. 32 दादांचा बोकड शिवबांनी इथेच उभा आडवा फाठला होता. विसरू नकोस या जावळी च्या राणातील वाघ आहेस तु. विसरू नकोस लालमहालात स्याहीस्त्या ची तोडलेली बोट आणि बुडाला पाय लाऊन पळालेला औरंग्याचा मामा. विसरू नकोस आपल्या पोराच लगीन सोडुन कोंढाणा घ्यायला गेलेल्या तानाजी ला. विसरू नकोस पुरंदर घेत असताना पडलेल्या मुरारबाजी ला, विसरू नकोस शिवरायांना सैह्याद्रीची ओळख व मैत्री करून देनार्या व हिंदवी स्वराज्यास खर्ची पडलेल्या बाजी पासलकर यांना. विसरू नकोस शिवराय पन्हाळ्यावर अडकले असताना शञुच्या छावनीत शिवराय बनुण गेलेल्या जिवाजींना, घोडखींडीत शञुच्या सैन्याचा कर्दनकाळ बनुन उभे असलेल्या बाजीप्रभु देशपांडे यांना. विसरू नकोस स्वराज्यांच्या दुसर्या छञपती शंभुराजे यांच्या बलीदानाला. विसरू नकोस छञपती ताराराणि यांच्या शौर्याला. विसरू नकोस शंभुराजे यांच्या खुनाचा बदला घेनार्या अन औरंग्याच्या तंबुचे कळस कापनार्या संताजी घोरपडे यांना. विसरू नकोस धनाजी जाधव यांच्या स्वामी निष्ठेला.
सैह्याद्रीच्या कुशीत रडतोय शिवबांचा इतिहास.
बघ जरा रडतोय सैह्याद्रीच्या कुशीत शिवबांचा इतिहास साद खालतोय तुला आज गरज आहे, तुझी तयास.
जा धाऊनी तयाच्या हाकेला. पुन्हा एकदा यमुनेचे पाणि पाज तुझ्या घोड्याला.
अन यमुना पार होऊन दाखव तुझ्या शौर्याची.
सैह्याद्रीच्या कुशीत रडत असलेल्या शिवबांच्या इतिहासाची शौर्य गाथा.
पाहतो वाट तुझीया साथीची सैह्याद्री !!
तुझीया विना टाहु फोडुनी शिवबांचा इतिहासाची शौर्य गाथा जगा पर्यंत पुन्हा एकदा पोहचवीण्याची !!
सैह्याद्रीच्या लेकरा ऐसी कैसी काळ झोप आली तुझीया !!
शिवबांचा इतिहास कैसा दिसेना तुझीया डोळ्यास !!
माजला आहे कलयुगी हिंदुधर्म विरीधी राक्षस !!
आस आहे मज तुझीया भवानी तलवारीच्या चमकनार्या विचे परी शौर्याची !!
माजले झुरळ सारे पाहुनी तुझीया ऐश्या काळ नीद्रेस !!
सोड ती नीद्रा अन ठेच सारी झुरळ या सैह्याद्रीच्या दगड गोठ्यानी !!
सैह्याद्रीच्या कुशीत रडतोय शिवबांचा इतिहास. रडतोय शिवबांचा इतिहास, रडतोय शिवबांचा इतिहास.