सरदार थोरात घराण्याचा इतिहास भाग १
सरदार थोरात घराण्याचा इतिहास – अतिप्राचीन काळापासून हट्टी लोकांमध्ये सूर्यवंशी (सुर्य- उपासक) यांची परंपरा आहे. थोरात घराणे हे सूर्यवंशी असून गृह्यक/गुहिलोत या अतिप्राचीन टोळीसंघ/कुळातील आहे. थोरात या शब्दाची व्युत्पत्ती थोर+ हाते अशी असावी, कारण आजही काही मंडळी स्वतःची आडनावे थोरहात, थोरहाते अशीच लावतात. थोर म्हणजे ‘महान’ आणि ‘हाते’ म्हणजे ‘हस्त’ त्यामुळे महान कार्य करणाऱ्या कुळाचे लोक असा अर्थ असावा. त्या काळानुसार ‘महान कार्य’ म्हणजे नक्की काय हे सांगता येणार नाही.
प्रस्तुत माहिती हि श्री. संतोषराव पिंगळे यांच्याकडून प्राप्त झालेली आहे.
* थोरात घराण्याच्या माहितीसाठी पुरालेखागार, पुणे येथील अस्सल कागदपञ उदा. संरजामपञ, वतनपञ, सनदा, आज्ञापञ, राजपञ इत्यादी. छञपती सातारा व पेशवे दफ्तरातील अस्सल कागदपञांचा आधार घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि अनेक पराक्रमी व वीर पुरुषांच्या कर्तबगारीला वाव मिळून अनेक नवीन सरदार घराणी नावारूपाला आली. अनेक जुनी सरदार घराणी ज्यांचा पराक्रम आणि शौर्य यांच्या जोरावर बहामनी सुलतानशाहीची पाळेमुळे जेथे घट्ट झाली होती. तेथेच शिवाजीराजांच्या स्वराज्याच्या उद्दात्त हेतूने भारावलेली काही घराणी स्वराज्याच्या सेवेला दाखल झाली. त्या घराण्यापैकीच एक पुणे जिल्यातील हवेली तालुका हिंगणगावच्या थोरात पाटलांचं हट्टी- धनगर घराणं हि तीच कल्पना मनात साठवून स्वराज्याच्या सेवेला दाखल झालं.
* सरदार थोरात यांचे मूळ गाव मौजे हिंगणगाव ता सांडस प्रांत पाटस हल्ली पुणे जिल्हा हवेली तालुका. याच घराण्यातील एक वीर पुरुष येसाजीराव थोरात हे शिवाजी राज्यांच्या काळात स्वपराक्रमाने नावारूपाला आले. त्याबदलात महाराजांनी त्याला सरदारकी देऊन त्याचा गौरव केला. थोरात घराण्यात होऊन गेलेल्या वीर व पराक्रमी सरदारांची नावे सरदार येसाजी थोरात, देवजी, तावजी, संताजी, दमाजी रूस्तूमराव, चंद्रभान, खंडोजी रूस्तूमराव. मराठ्यांच्या इतिहासात जो बऱ्यापैकी स्मरणात राहिला.. त्याच्या बंडखोर वृत्तीमुळे.. त्या शूर सरदाराच नाव होतं..
‘दमाजी थोरात रुस्तुमराव’.. (रुस्तुमराव) या नावाने त्याने मराठ्यांच्या इतिहासात ओळख निर्माण केली ती कायमचीच…
* दमाजींचा उदयकाळ- काही अस्सल शिवकालीन पत्रांमध्ये दमाजींचा उल्लेख येतो. त्यावरून ते शिवाजी राजांच्या काळातच नावारूपाला आला होतं हे स्पष्ट होत. शिवाजी राजांच्या शेवटच्या काही मोहिमांमध्ये ते सहभागी झाले असावे. असाही एक तर्क निघतो. पण खऱ्या अर्थाने दमाजींचा उदयकाळ हा मराठ्यांचा २७ वर्षे चाललेला स्वतंत्र संग्राम मानता येईल. याच काळात त्याच्या अंगच्या उपजत गुणांना व पराक्रमाला वाव मिळून दमाजी हे मराठ्यांच्या इतिहासातील एक मात्तब्बर सरदार म्हणून नावारूपाला आले. छत्रपती राजाराम महाराज जिंजी येथे असताना सरदार दमाजी यांस रूस्तूमराव हा किताब व सुपे व पाटस प्रांतांची जहागीर बहाल केली होती.
माहिती सौजन्य- श्री. संतोषराव पिंगळे
काही थोरात हे मराठा देखील आहेत!
थोरात हे गुहिलोत आहेत हे कशा वरून म्हणतात आपण…..!