इतिहासाचे साक्षीदार – दुर्लक्षित जटवाडा
इतिहास अभ्यासक म्हटले की तो कुठल्याही ठिकाणचा इतिहास जानण्यासाठी इच्छुक असतोच आणि एखाद्या जवळच्या ठिकाणाबद्दल कुणी काही सांगीतलं की मग तर विचारायलाचं नको. असचं काही दिवसांपुर्वी मित्राकडुन ऍकण्यात आलं की “जटवाडा” गावात काही पुरातन अवशेष आहेत,उत्कंठा शिगेला होती आणि मग 8 मे ला जाण्याचे ठरवले. जटवाडा हे गाव औरंगाबाद पासुन 8 ते 10 कि.मी. दुर आहे, जाताना मनात बरेच प्रश्न होते, आणि मग निघालो…..
बोलता बोलता हे 8-10 कि.मी. कसे गेले कळालेही नाही, जाताना औरंगाबादच्या लेण्यांचा डोंगर दिसत होता ते पहात पहात जटवाडा गावात पोहचलो. समोर दिसत होते ते जैन मंदीर पण तिथे मी थांबलो नाही आणखी पुढे गेलो, गावातुन बाहेर पडताना काही पडलेल्या खांबांचे अवशेष नजरेस पडले, हे अवषेश इथे घडलेल्या इतिहासाची साक्ष देत होते, डोंगराला लागुन असलेले हे गाव. वर तळपता सुर्य होता, भयंकर उन होते, कुठे सावलीही दिसतं नव्हती आणि अशा परिस्थितीत तिथुन 2 की.मी. वर असलेल्या जोगवाडा गावात मी पोहचलो.
30-40 घरांचे हे “जोगवाडा” गाव, गाव फ़िरत फ़िरत मी गावाच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो आता मात्र पुढे रस्ता नव्हता आणि अचानक ज्यासाठी इथवर आलो ते नजरेस पडले, हा होता “घोड्याचा भव्य असा तबेला ?”.आज लोक या वास्तूस घोड्याचा तबेला असल्याचे सांगतात. हा तबेला कुनी बनवला कधी बनवला याची काहीही माहीती स्थानिकांकडुन मिळाली नाही. पण आजची त्याची अवस्था मात्र दयनिय झालेली आहे, आणि सुरुवातीला दिसला तो म्हणजे या तबेल्याचा पडलेल्या अवस्थेत असलेला बुरुज, आज त्या बुरुजातुन अगदी पिंपळाचे झाड उगवलेले होते आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या सावलीत गुर-वासरं बांधलेली होती, पुढे दिसले त्या तबेल्याचे भव्य असे प्रवेशद्वार, द्वाराची कमान होती पण द्वार काही नव्हते, तबेल्यात आत शिरल्यानंतर पाहीले ते अगदीच दयनिय होते, प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजुला भिंतिवर जाण्यासाठी पायर्या होत्या व त्या पायर्यांच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत गुरांचा चारा भरुन ठेवलेला होता.
इतिहासाचे साक्षीदार – दुर्लक्षित जटवाडा
एकेकाळी रौनक असलेला हा तबेला आज अगदीच दयनिय अवस्थेत असुन, आज येथे फक्त तिन पडके बुरुज आणि एक प्रवेशद्वाराची कमान आपल्याला दिसते. त्या तबेल्याच्या आतल्या भागात राहत असलेल्या काही स्थांनिकांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगीतलेकी हा त्याकाळी घोड्यांचा तबेला होता, त्यांनी सांगीतले की आमचे पुर्वज येथे प्रथम राहायला आले तेव्हा हे गाव नव्हते, त्यांच्यानंतर येथे हळु हळु वस्ती वाढली आणी तेव्हा हा तबेला देखिल थोड्या सुस्थीतित होता परंतु कालांतराने तो पडला. या गावाच्या नावाबद्दल त्यांना विचारणा केली असता त्यांनी सागीतलेकी आमचे पुर्वज जेव्हा येथे आले तेव्हा येथे वस्ती नव्हती तर त्यांनी राखण करायला काही “जोगी” लोक ठेवले आणि त्या जोगी लोकांवरुन या गावाचे नाव “जोगवाडा” असे पडले. ही सर्व माहीती घेउन मी तेथुन बाहेर येउन कमान पाहत असतांना इथेही ती दुर्दैवी गोष्ट पहायला मिळाली कमानीवर मुलांनी लिहीलेली नावे, या उन मोठे दुर्दैव काय असेल ??
तेथुन मी बाहेर पडलो आणि आसपासच्या लोकांना विचारणा करायला लागलो तेवढ्यात बुरुजाच्या बाजुला मला दिसला एक दगडी तेल काढण्याचा घाणा, त्याबद्दलही तेथील लोकांना काही माहीती नव्हती.पण आज या तेलाच्या घाण्याची “कचरा कुंडी” होताना दिसतं होती, त्या घाण्यात कचरा पडलेला होता.
हे सर्व पाहुन या जोगवाड्यातुन मी आता बाहेर पडलो आणि परत निघालो जटवाड्याकडे, भयंकर उन्हात पुन्हा निघालो, रस्त्याच्या कडेला सावलीही दिसत नव्हती, हवा तर अजिबात नव्हती. आणि जटवाडा गावात पोहचलो, प्रथम मी गेलो तेथील जैन मंदिरात, मंदिर सुंदर होते, खालच्या मंदिरात दर्शन घेउन मी पायर्यांनी वर गेलो आणि वर पाहील्या प्राचीन जैन मुर्ती, तेथिल स्थानिकांना या बद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की अशा 21 जैन मुर्ति काही वर्षांपुर्वी येथे मिळाल्या होत्याआणि त्या सर्व मुर्ति आज या मंदिरात ठेवलेल्या आहेत,या जैन मंदिराच्या समोरचं 2 विष्णुच्या दगडी मुर्तिही दिसल्या, विचारल्यावरत्यांनी सांगितले की येथे जवळचं या मुर्ति मिळाल्या होत्या, मग ती जागा मी पहायला गेलो. ज्या ठीकाणी या मुर्ति मिळाल्या होत्या आज ती जागा दगडांनी बंद करण्यात आलेली आहे.
इतिहासाचे साक्षीदार – दुर्लक्षित जटवाडा
तिथल्या स्थानिकांनी सांगितले की काही वर्षांपुर्वी घराचा पाया बांधण्यासाठी आम्ही हे दगड काढत असताना आम्हाला एक भुयारी खोलीलागली व त्यातचं या 21 जैन मुर्ति सापडल्या,जशा येथे जैन मुर्ति मिळाल्या तसे एथे अजुन काय मिळते असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की इथे दगडाचे जाते, पाटे, रांजन आणि शिळा मोठ्या प्रमाणावर मिळतात, याचाचं अर्थ असा की येथे वस्ती होती पण काही कारणास्तव ते इथे राहीले नाहीत आणि दुसर्या ठीकाणी ते रहायला गेले आणि जाताना जड दगडी वस्तु सोबत नेल्या नाहीत आणि आज तेच सर्व आपल्याला इथल्या वस्तीची साक्ष देत आहेत,हे सर्व पाहुन मी भाराउन गेलो, गावात आणखी विचारणा केली असता त्यांनी तेथिल महादेव मंदीराबद्दल सांगीतले, आणि त्या मंदिरांच्या दिशेने मी निघालो, नदिच्या काठी ही दोन महादेव मंदिरे मला दिसली, त्या मंदिरात दर्शन घेतलेआणि मी तेथुन परत निघालो.
आज इथे मिळालेल्या मुर्ति, पुरातन जैन मंदिर, पडलेल्या वाड्याचे अवशेष, तो तेलाचा घाना आणि तो भव्य असा घोड्याचा तबेला हेआहेत इथे घडलेल्या “इतिहासाचे साक्षिदार”………