महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,779

गड कसे पहावे

By Discover Maharashtra Views: 2818 5 Min Read

गड कसे पहावे भाग १ –

हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मावळयांची साथ लाभली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गडकोट, गडकिल्ल्यांनी, गडदुर्गांनी स्वराज्य टिकून ठेवण्यासाठी छातीचे कोट पुढे केले होते म्हणून आम्हाला महाराष्ट्राला जाज्वल्य पुर्ण ईतिहास लाभला.भारतात इंग्रजांना शेवट पर्यंत तिखट प्रतिकार मराठ्यांनीच केला. मराठ्यांची ताकत गडांमध्ये आहे हे इंग्रजांनी ओळखले, १८१८ मराठे शाही संपुष्टात आल्यानंतर नंतर महाराष्ट्रातील अनेक किल्ले उध्वस्त तर केलेच गडावरील व्यवहार पद्धतीच बंद केली तसेच गडावर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. त्यामुळे आज अनेक गडकोट जिर्णस्थितीत आढळतात. तरी ते आमचे प्रेरणा स्थाने आहेत उर्जा स्रोत आहे त्यांचे जतन करणे,त्याची माहिती असणे हे आमचे आद्य कर्तव्य  आहे म्हणून हा गड कसे पहावे लेख प्रपंच.

गड भ्रमंती करणारे ईतिहास संशोधन, दुर्ग भटके, हौशी तर काही पिकनिक करणारे तसेच गड संवर्धन करण्यार्या अनेक सामाजिक संस्थाच्या  ही आहेत याच्या सोबत गडावर जाण्याचा अनेक जणांना योग आला असावा परंतु आपल्याला गडावर गेल्यावर काय पाहवे गड भ्रमंती कशा करावी हे अनेकांना माहीतच नसते चला तर मग गड कसा पहावा हे पाहुयात!

१ गडाचा माहिती गोळा करणे – ज्या किल्यावर जाणार आहात त्याची माहिती गोळा करा, भौगोलिक स्थिति गुगल मॅपच्या साह्याने सहज मिळते ,गडावर पोहचण्यासाठी वाहतूक व्यवस्था, किल्याचा ईतिहास, किल्ला कोणत्या राजवटीत बांधकाम झाले, गडावर जाण्यासाठी च्या वाटा ईत्यादी माहिती गडावर जाण्याअगोदर निदान आठ दिवस अगोदर जमा करावी मग पहा गडावर गेले की गड तुमच्याशी बोलु लागेल.

चला तर मग पाहुयात दुर्गभ्रमंती कशी करावी.

२. गडाचे प्रकार – गडाचे प्रकार कोणता आहे हे समजून घ्यावे गडाचे प्रमुख चार प्रकार पडतात

गिरीदुर्ग, जलदुर्ग, स्थलदुर्ग( भुईकोट किल्ला), वनदुर्ग.

३. घेरा –  गडाच्या पायथ्याशी असलेले परिसर व गावे म्हणजेच त्या गडाचा घेरा होय. आपणास गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावामध्ये ऐतिहासिक शिल्प, शिळा, गावामध्ये पाहायला  मिळत असते तसेच गावातील वाटाड्या किंवा गाईड सोबत घेतल्यास तो त्या गडाच्या अंगा खांद्यावर वाढला असल्याने गडाची अति रंजकता सोडली तर गडावरील अनेक स्थळाची चांगली माहीत छान मिळतेच.

४. मेट – गडाच्या पायथ्याशी असलेल्या परिघास मेट असे म्हणतात, गड काबीज करण्यासाठी शत्रू पक्षाकडून अनेक वेळा याच ठिकाणी गडाला वेढा टाकले जायचे. ईतिहासत  पन्हाळ्याचा वेढा सर्व परिचित आहेच.

५ महादरवाजा – गडाच्या प्रमुख दरवाजास महादरवाजा म्हटले जायचे. किल्ल्याच्या अंतरंगात प्रवेश देणारं द्वार, किल्ल्याचं प्रवेशद्वार शत्रूच्या हल्ल्याला तोंड द्यायला सक्षम पाहिजे, तसेच ते सुंदर आणि भारदस्तही हवे, जेणेकरून किल्ल्यात येणाऱ्या सामान्य माणसाला एकाच वेळी बुलंदपणाचं, अभेद्यपणाचं भारावून टाकलं पाहिजे  त्याच्यावर दडपणही आलं पाहिजे. किल्ल्याचे प्रवेशद्वार हा तटबंदी आणि बुरुजांमधला भाग असतो. तो नेहमी तटबंदी आणि बुरुजांच्या मध्येच असतो. त्यामुळे प्रत्यक्ष दरवाजासमोर पोहोचेपर्यंत दरवाजा दिसत नाही.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची रचना,  शत्रूपासून संरक्षित राहावा यासाठी वापरलेल्या क्लृप्त्या वापरल्या जातात त्या पहाण्यासासख्या असतात. या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गबांधणीत केलेला गोमुखी प्रवेशद्वाराचा प्रयोग ही एक अजोड रचना आहे. एकाच किल्यावर महादरवाजा व्यतिरिक्त उपदरवाजे ही असताना. शिवनेरी किल्यावर असे सात दरवाजे आहेत. महाराष्ट्रातील किल्ल्यांपुरता विचार केला तर शरभ, कमळ (फूल), गणपती, गंडभेरुंड, हत्ती इत्यादी द्वारशिल्पे प्रामुख्याने पाहायला मिळतात

दिंडी दरवाजा – महादरवाजालाच लहान दरवाजा असतो  एकावेळी एकच व्यक्ति आत किंवा बाहेर जाता येवू यास दिंडी दरवाजा अस म्हटलं जातं.

६ दिवड्या – अनेक किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला कमानीच्या आकाराच्या असलेल्या खोल्या पाहायला मिळतात. त्यांना देवडय़ा म्हणतात. किल्ल्याच्या दरवाजावर पहारा देणारे सैनिक या ठिकाणी बसत असत.

७ तटबंदी – तटबंदी म्हणजे गडाची घडीव दगडात बांधण्यात आलेली संरक्षीत भिंत . तटबंदी बांधताना आतल्या आणि बाहेरील बाजूच्या भिंती घडीव  दगड एकमेकांशी चुन्याने सांधलेले पाहायला मिळतात.

८ फांची – तटबंदीस जोडुनच  सैनिकांना गस्त घालण्यासाठी बांधण्यात आलेल्या जोड भितीस  फांजी असे म्हणतात. तटबंदीवर पहारेकऱ्यांना गस्त घालण्यासाठी या फांजीचा उपयोग होत असे. अनेक किल्यावर वर एकाच वेळी दोन ते तीन सैन्य एकाच वेळी चालता जाता येवू  ईतक्या मोठ्या फांज्या आहे. अशा फांची तोरणा, सज्जन गड, जंजिरा किल्यावर पहायला मिळतात.

९ जंग्या – या तटावरील छिद्रांनाच जंग्या म्हणतात.यांचा उपयोग युद्धकाळात धनुष बाण किंवा बंदुकीने आक्रमण केले जायचे

१० माची – गडाच्या आतील तटबंदी मधील सपाट भूभाग, मैदानी भागास माची असे म्हणतात. माचीवर शिबंदी (सैनिक) असायचे. राजगडावर संजीवनी माची, पद्मावती माची आणि सुवेळा माची अशी तीन माच्या आहेत.

११ सदर – गडावरील न्यायनिवाड्याची जागेस सदर असे म्हणतात.सदर म्हणजे किल्ल्यावरील कारभार करण्याची जागा. किल्ल्यावरील कागदोपत्री कामकाज जेथून चाले ते कार्यालय

अनेक गडांवर आपणास सदर चा चौथरा पाहवयास मिळेल. रायगडावर आजही नगारखाना जवळ हळू आवाजात बोलले तरी ते सदरे पर्यंत स्पष्टपणे ऐकू येते. ध्वनि प्रसरण तरंग उत्तम संशोधन ४५० वर्षापुर्वी ही अवगत होते आजही राजगडावर आपणास हा अद्भुत नजारा अनुभव घेवू शकता.

लेख – श्री. प्रदिप जालिंदर पाचपुते

Leave a Comment