हिंदुस्तान कि दो चीजो से हमे डर लगता है, एक यहाकी गरमी और दुसरे ये मरहट्टे !
पानिपत संग्रामातील महत्वाचे सेनानी आणि मोहरे
* हिंदुस्तान च्या संरक्षणाचा जो करार मोगलांशी झाला त्याची पायाभरणी १७३९ सालच्या नादीरशहा च्या आक्रमणावेळीच झाली, नादिर नंतर १७४७ साली अब्दालीने पुन्हा हल्ला केल्यावर मुहम्मद शाह याने यासंबंधी पुढाकार घेतला आणि शाहू छत्रपतींनी नानासाहेबांना दिल्लीस बोलणी करण्यास पाठवले.
* मोगल बादशहाचे वतीने हिंदुस्थानचा कारभार हातात घ्यायचे धोरण शाहूंनी मराठ्यांना दिले. नवे देऊळ बांधण्यात जेवढे पुण्य आहे तेवढेच पुण्य मोडकळीस आलेल्या देवळाचा जीर्णोद्धार करण्याने लाभते ही सूत्रे घेऊन शाहूंनी राजकारण केले. स्वतः मोगल बादशहा आपल्या सत्तेचे संरक्षण करण्यास असमर्थ होते. ही राजकीय पोकळी भरून काढण्याची नवी राजनीती शाहूमहाराजांनी अस्तित्वात आणली. तिची अंमलबजावणी करण्याचे काम पेशव्यांनी व मराठा सरदारांच्या नव्या फळीने राबविले. या प्रक्रियेतील पानिपत ही अटळ आपत्ती होती.
* पानिपत पूर्वी १७५७-१७५८ या काळात मराठ्यांनी सर्वोच्च कामगिरी करत लाहोर,पेशावर,अटक हि महत्वाची ठाणी जिंकत अब्दालीच्या सैन्याचा अनेक आघाड्यांवर पराभव केला. यावरही कडी करत मराठ्यांनी अफगाण सीमेवरचा जमरुड चा किल्लाही जिंकला आणि अफगाणिस्तानातल्या जलालाबाद वर छापे हि घातले.
* पानिपतच्या युद्धात
-> मराठ्यांतर्फे ४०,००० घोडदळ,हुजुरात,१५००० पायदळ ज्यात ८००० आधुनिक बंदुकधारी गारदी,१५००० पिंडारी,२०० तोफा…असे एकूण ७०,००० सैन्य (त्यांना मदतनीस,बाजारबुणगे १ लाखाहून जास्त होते )
-> अफगाण्यातर्फे ४२,००० घोडदळ,बाशगुल,३८००० पायदळ,१०,००० राखीव ,४,००० अब्दालीचे अंगरक्षक (त्यांना नसाक्ची म्हणत),५००० किझील्बाश (इराणी सैन्य),८० तोफा …एकूण १,००,००० सैन्य
-> रणसंग्रामामध्ये मराठ्यांचे ४०,००० तर ३०,००० अफगाणी सैन्य मृत्युमुखी पडले, बाजारबुणगे,मदतनिस,नालबंद,पागा सांभाळणारे,जनाना असे इतर लोकांची मोजदादच नाही ते लाखात असावेत.
* मराठ्यांनी पानिपत चे युध्द हरले पण हा पराभव छत्रपति शिवाजी महाराज, रणधुरंधर शंभूराजे, मुत्सद्दी शाहू छत्रपती, अजेय बाजीराव पेशवे यांच्या युद्धनीतीचाच होता. शिवरायांचे धोरण, शाहूंचे राजकारण , बाजीरावांची गती या गोष्टींचा अभाव या महासंग्रामात दिसला.
* युद्धातून निघून गेले असा आरोप होणार्या मल्हारराव होळकर यांनी पानिपत नंतर काही महिन्यातच १७६१ सालीच २५००० सैन्य घेऊन दुआबात असलेली अब्दालीची ठाणी जिंकली. यामुळे मराठे कमजोर झाले या भ्रमात असणारे आणि मराठ्यांचा उत्तरेतील भूभाग काबीज करू पाहणारे जाट, राजपूत हात चोळत राहिले.
* राजनीतीचा उत्कर्ष करताना महादजी शिंद्यांनी बरोबर १० वर्षांनी म्हणजे जानेवारी १७७१ साली दिल्ली जिंकली’.नजिबखान रोहिल्याच्या वारसदारांची पाळेमुळे खणून काढली. पातशहाची विटंबना करणाऱ्या गुलाम कादिरला हालहाल करून मारले.नजीबची कबर आणि पत्थरगड किल्ला तोफा लावून उडवून दिला.
* अब्दालीची स्थिती युध्द जिंकून हि जेमतेमच राहिली, लुट फार मिळाली नाही जी मिळाली ती कमी किमतीत विकावी लागली. सैन्याने बंड करत लढायला नकार दिला. अब्दाली २२ मार्च १७६१ ला परत गेला. पानिपत नंतर शिखांनी कडवा प्रतिकार केला त्यांनी ,पश्तून-बलोच टोळ्यांनी वगैरे मिळून अब्दालीचे मोठे साम्राज्य संपवले.
* पानिपत नंतर ४ महिन्यातच हिंदुस्तानात (उत्तर भारत) आणि दक्खनेत मिळून १ लाख फौज पुन्हा उभी राहिली.
* मराठ्यांनी रोहिलखंड बेचिराख केला. पातशाहीची अखत्यारी मिळवली. या पराक्रमामुळे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मराठ्यांचा भगवा काही दशके फडकला.
चित्र १ आणि २ मध्ये मराठा आणि अब्दाली गटातील प्रमुख लोकांची चित्र आहेत.
चित्र १ -(Left to right) Line 1 –
1. पानिपत युद्धात जखमी झालेले सेनापती सदाशिवराव भाऊ
2. बुराडी घाट लढाईत १७६० साली वीरमरण आलेले दत्ताजीराव शिंदे
3. पानिपत नंतरही मराठ्यांचा दबदबा उत्तरेत राखणारे मल्हारराव होळकर
Line 2 –
1.पानिपतवीर यशवंतराव पवार
2. शाहू छत्रपती आणि नानासाहेब पेशवा (अहमदिया कराराची पायाभरणी या दोघांनी १७४८ साली केली )
3. पानिपतवीर विश्वासराव पेशवा
Line 3 –
1. युद्धानंतर मराठ्यांना मदत करणारा सुरजमल जाट
2. मराठा तोफखान्याचा प्रमुख इब्राहिमखान गारदी
3. पानिपतवीर जनकोजी शिंदे- यांनी अब्दालीचा वजीर शाह वलीखानाचा नोहेंबर १७६० मध्ये धुव्वा उडवला होता.
चित्र २ – (Left to right) Line 1 –
1.भारतावर १७३९ साली स्वारी करणारा अब्दालीचा गुरु आणि इराणचा शाह नादीरशहा
2.अब्दालीचा मुलगा तैमुरशाह – मराठ्यांनी याला लाहोर मध्ये हरवले होते ( लाहोर सोडून पळाला )
3. नजीब खान – अब्दालीचा भारतातील प्रमुख हस्तक
Line 2
1. शाह वली उल्लाह – अब्दाली ला जिहादी प्रेरणा देणारा वहाबी धर्मगुरू
2. बादशाह अहमदशाह अब्दाली
3. शहा वलीखान- अब्दालीचा वजीर
Line 3 –
1. जहान खान – अब्दालीचा सेनापती
2. राजा माधोसिंग – मराठ्यांनी याच्यावर उपकार केले पण याचा कल अब्दालीकडे होता
3. अहमदशाह बंगश – दिल्लीवर स्वार्यांसाठी अब्दालीने याचा वापर केला
– जनकोजी शिंदे आणि दत्ताजीराव शिंदे यांचे चित्र Uday Mahurkar Ji यांचेकडून साभार
चित्र ३- मराठ्यांची सैन्य ताकद
चित्र ४- अफगाण्यांची ताकद
चित्र ५ – मराठ्यांच्या छावण्या
चित्र ६ – अब्दालीच्या छावण्या
चित्र ७ – मराठ्यांची उजवी फळी
चित्र ८ – स्वीवेल गन्स , उन्टांवर लादलेल्या बंदुका. अब्दालीच्या विजयात यांचा महत्वाचा वाटा होता
चित्र ९ – उंटस्वार