महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,55,666

जुन्नर तालुक्यात २५ ऐतिहासिक बारवा, ४ पुष्करणी व…

By Discover Maharashtra Views: 1444 3 Min Read

जुन्नर तालुक्यात कोठे पहाल २५ ऐतिहासिक बारवा, ४ पुष्करणी व २ भुमिगत पाणी पुरवठा टाक्या –

मित्रांनो जुन्नर तालुक्यातील आपल्या परिसरातील बारवांचा मी रमेश खरमाळे, माजी सैनिक सध्या शोध घेत आहे. जवळपास २५ बारवा व ४ पुष्करणींच्या सानिध्यात मी स्थानिकांच्या मदतीने पोहचलो असुन पैकी काही बारवांची ग्रामस्थांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबविण्यात पण यशस्वी झालो आहे. बहुतांशी या बारवा मंदिरा जवळ असल्याने त्या बारवा पुण्यश्रोताची महत्वाची ठिकाणे आहेत. परंतु काही ठिकाणी या बारवा गाडल्या गेल्यामुळे अक्षरशः पुण्यश्रोतच दफन केले गेले असल्याचे समजते. ते पुर्ववत करणं एक नक्कीच पुण्याच कार्य असेल. जुन्नर तालुक्यातील २५ ऐतिहासिक बारवा पर्यटकांनी पाहणं ही एक पर्यटनासाठी नक्कीच महत्वाची ठरणारी व रोजगाराची संधी निर्माण होणारी बाब आहे. जुन्नर तालुक्यात या बारवा जर संवर्धीत केल्या गेल्या तर जुन्नर तालुक्यातील बारवा हेरीटेज ऑकची संकल्पना नक्कीच जन्माला येऊ शकते. त्यामुळे जर आपल्या गावात जर अशा बारवा जर असतील तर नक्कीच खालील नंबरवर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता. आपला गाव आपला ऐतिहासिक वारसा जगासमोर आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे यासाठी आपण नक्कीच योगदान द्याल हीच सदिच्छा.

जुन्नर तालुक्यात आपण २५ बारव कोठे पहाल –

१)वाघाळे बारव – निरगुडे

२) किल्ले जीवधन पायथा बारव – घाटघर

३) आमडेकर बारव १ – घाटघर

४) आमडेकर बारव २ – घाटघर

५) किल्ले हडसर पायथा बारव – हडसर

६) आमडेकर विहीर – पाडळी

७) बारा बावडी १ – जुन्नर शहरात

८) बारा बावडी २ – जुन्नर शहरात

९) कुंदलबावडी – जुन्नर शहरात

१०) श्री दत्त बारव – कुसूर

११)शंभावली बारव – कुसुर

१२)खंडोबा बारव – धामणखेल

१३)ब्रम्हनाथ बारव – पारूंडे

१४)गावठाण बारव – गुंजाळवाडी

१५)सहकार नगर बारव – शिरोली बु!!

१६)गणेशनगर(गोसावी बाबा) बारव – येडगाव

१७)खानेवाडी बारव – येडगाव

१८)कुतळमळा बारव – हिवरे तर्फे नारायणगाव

१९)भोरवाडी बारव – भोरवाडी

२०)अतकरी मळा बारव – सुलतानपूर

२१)बेल्हे बारव (कच-यात गाडलेली) – बेल्हे

२२)आणे बारव – आणे

२३) रेडा समाधी बारव (गाडलेली)- आळे

२४)खामुंडी बारव – खामुंडी

२५)भवानी बारव – धोलवड

जुन्नर तालुक्यात आपण ४ पुष्करणी कोठे पहाल?

१) बेल्हे

२) किल्ले चावंड

३) धामणखेल खंडोबा डोंगर

४) किल्ले निमगिरी पायथा

२ भुमिगत पाणी पुरवठा टाक्या –

पंचलिंग मंदिर पाणी पुरवठा टाकी

Leave a Comment