मरहट्टी साम्राज्यातील ‘पट्टीजन/पाटील’ यांच्या शोधात भाग ६ –
छत्रपती राजाराम महाराज यांचे पुत्र छ शिवाजी महाराज यांच्यावतीने महाराणी ताराराणी यांनी इ.स.वी सन १७०६ साली लवटे मंडळींना सरंजाम (जहागिर) दिला. त्या सरंजामपत्रांत पूर्वी म्हणजे इ.स.वी 1703-1704 साली जो सरंजाम दिला तो पूर्वीप्रमाणे करार केला अशी नोंद मिळते.1703-1704 साली जो सरंजाम दिल्हा तो पूर्वी केव्हातरी करार केलेला असावा. सरंजामाचं दर दोन तीन वर्षांनी नूतनीकरण करून दिलं जाई. या काळात ज्या लवटे घराण्यातील पुरूषांच्या नावे हा सरंजाम दिला त्यांची नावे अशी..
1 रायाजी लवटे
2 भीकाजी लवटे
3 धुळोजी लवटे
व सरंजामात दिलेली गावे अशी..
1 मौजे कळंबोली व 2 मौजे पिराळे दोन्ही तालुका माळशिरस जि सोलापूर.
3 मौजे मोहुद ता भाळवणी
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील आजही पिरळे गावात लवटेची संख्या सर्वाधिक आहे, त्यामानाने कळंबोलीमध्ये काहीच घरे आहेत. तसेच, सांगोला तालुक्यातील महूद बु. मध्ये सुद्धा लवटेची संख्या सर्वाधिक आहे. भाळवणी हे गाव मंगळवेढे आणि पंढरपूर या दोन्ही तालुक्यात असून दोन्हीकडे लवटेचे काही घरे आहेत. माझ्या आत्तापर्यंतच्या वाचनात बहुतेक हाटकरांना नाडगौडा, गौडा, पाटील, नायक, पाळेगार, बरगी, राजे, सरदार अश्या पद्धतीचे पदे, लष्करी, प्रशासकीय सामर्थ्य मिळालेले आढळते आणि वतने हि सरंजाम पद्धतीची दिसतात, त्यांच्या वतन गावातील प्राचीन मंदिरे, वाडे, समाध्या, वीरगळी पाहिल्यावर निश्चित खात्री पटते कि हाटकर हे प्राचीन, मध्ययुगीन कालापासून त्या ठिकाणी वसाहत करून आहेत.
माहिती सौजन्य- संतोष पिंगळे सर
माहिती संकलन- प्रशांतराव लवटे पाटील.