महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,12,586

भारतात पहिली रेल्वे आनन्याचे स्वप्न पाहणारा मराठा

By Discover Maharashtra Views: 3953 4 Min Read

भारतात पहिली रेल्वे आनन्याचे स्वप्न पाहणारा मराठा आलीजाबहाद्दर शिंदे

18व्या शतकात अनेक मराठा सरदार मंडळी देशपातळीवर प्रसिद्ध झाली.त्यातील सर्वात महत्वाचे आणि मोठे घराणे म्हणजे शिंदे..
औरंगजेबाच्या कैदेत असताना थोरले छत्रपती शाहू महाराज यांच्या लग्नाचा प्रश्न उभा राहीला.तेव्हा औरंगजेबाने येसूबाई राणीसाहेबांना कळवले,की आमच्या फ़ौजेत अनेक मातब्बर मराठा सरदार घराणी आहेत,त्यापैकी तुम्ही एखादे स्थळ लग्नासाठी पसंद करू शकता.आणि येसुबाईंनी आपली सुन म्हणून कन्हेरखेडच्या शिंद्यांची मुलगी निवडली.

या शिंदे घराण्यातील एक मातब्बर नाव म्हणजे नेमाजी शिंदे.यांच्याकडे औरंगजेबाच्या मृत्युवेळी 15 हजारांची फ़ौज होती.1707 साली शाहू छत्रपती जेव्हा महाराष्ट्रात वापस येत होते,तेव्हा लामकानी येथे हेच नेमाजी आपल्या 15 हजारांच्या फौजेसह महाराजांना येऊन मिळाले.त्यानंतर परसोजी भोसले 10 हजार फौजेनिशी महाराजांना येऊन भेटले.
शाहू महाराजांच्या काळात एक बारागिर,शिलेदार पासून ते सरदारकी पर्यंत पोहोचलेल्या राणोजी शिंदे यांच्या कर्तुत्वाविषयी इतिहास अभिमानाने महती सांगतो.

माळवा भाग जिंकल्यानंतर शाहू छत्रपती यांनी त्या सव्वा कोटी महसूल भूभागाचे 3 भाग केले.त्यातील सर्वात मोठा भाग म्हणजे 65 लक्ष महसूल उत्पन्नाचा प्रदेश ह्या राणोजी शिंदेला दिला.1745 साली राणोजी शिन्द्यांचा मृत्यु झाला.त्यांना एकूण 5 मुले..
जयाप्पा,ज्योतिबा,दत्ताजी,तुकोजी आणि महादजी.
ह्यातले सर्वचजण ह्या स्वराज्यकामी खर्ची पडले.
इसवी सन 1743 मधेच ज्योतिबांचा मृत्यु झाला.दत्ताजी शिंदे म्हणजे मर्द लढवय्या..बचेंगे तो और भी लढ़ेंगे म्हणत त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली..महादजी शिंदे यांच्याविषयी इंग्रजांनीच कितीतरी चांगल्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत.
साऱ्या देशाची पाटिलकी असणाऱ्या महादजीबाबांना इंग्रज ‘पाटीलबाबा’ म्हणत असत.

इसवी सन 1735 पासून ते 1840 पर्यंत शिंद्यांनी आपली राजधानी ही उज्जैन येथे ठेवली होती आणि उपराजधानी ग्वाल्हेर..पुन्हा ती ग्वाल्हेरला हलवण्यात आली.
जेव्हा भारत स्वातंत्रतेच्या उंबरठ्यावर होता,त्यावेळेस भारतातील सर्वात प्रगत संस्थाने होती ग्वाल्हेर,इंदौर आणि बड़ोदा..

आणि ह्याच ग्वाल्हेर संस्थानाचे प्रशासक होते जीवाजीराव शिंदे.आजच्या नागपुरचा काही भाग,मध्य प्रदेश,थोडा झारखंड आणि उत्तर प्रदेशाचा मिळून जो भूभाग तयार होईल,त्या साऱ्या भुभागाचे प्रशासक जीवाजीराव होते.भारत स्वातंत्र झाल्यावर 10 वर्षे म्हणजे जवळ जवळ 1956 पर्यंत सारा मध्य भारत जीवाजीरावांच्याच अधिकाराखाली होता.आणि या भागात त्यांच्याच नावाचे नाणे चालत असे.

भारतात आजही स्थापत्यामधे सर्वात मोठी बांधकामे कुणाची असतील,तर ती मराठ्यांचीच..1000 एकर मधे बांधलेली लक्ष्मीविलास पैलेस बड़ोदा येथील वास्तू भारतातले सर्वात मोठे बांधकाम म्हणून ओळखले जाते..
ग्वाल्हेर येथे बांधण्यात आलेले 550 एकर मधले जय-विलास पैलेस म्हणजे मराठ्यांच्या बांधकामाचा श्रीमंत आणि उत्कृष्ठ नमूना..

या महालाचा दीवानखाना म्हणजे जगातल्या सर्वात Luxurious Hall पैकी एक आहे.Vatican City येथे असणाऱ्या Saint Basilica हॉलची हा दीवानखाना प्रतिकृती.
या दीवानखाण्यात 2 अतिविशाल झुंबर आहेत.एकेकाला जवळ जवळ 9,000 दिवे..ही झुंबरे ज्यावर लटकावली आहेत,त्या हुकांची ताकद पाहण्यासाठी एका हुकाला 3 असे सहा हत्ती टांगुन ठेवले होते.

याच महलात राहणाऱ्या,जनकोजीराव शिंदे दूसरे यांचे भारतात रेल्वे आनन्याचे स्वप्न होते.त्यांनी तसे एक शिष्ठमंडळही भारतात आणले होते.महालात असणाऱ्या जेवनाच्या टेबलवर त्यांनी एक चांदीची रेल्वे केली होती,जी जेवायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खान्याचे पदार्थ पोहोचवन्याचे काम करीत असे.(राजू चाचा या चित्रपटात अशी एक रेल्वे दाखवली आहे.)त्यांच्या लवकर झालेल्या मृत्युमुळे हे स्वप्न काहीसे अधूरे राहीले.आजही ही वाफेवर चालणारी रेल्वे आपल्याला महालात पाहन्यास मिळते.

शाहू छत्रपतींनी मोठ्या दूरदृष्टीने उत्तर भारतात नेमलेल्या ह्या मराठा सरदारांनी उत्तरेतले राजकारण आपल्या खांद्यावर पेलले..ते अगदी आजतागायत..आजही ज्योतिरादित्य शिंदे हे मध्य भारतातील एक ताकदवर राजकारणी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत.
साऱ्या भारतभर आपल्या पराक्रमाने दरारा बसवणाऱ्या ह्या मराठ्यांच्या ताकदीला सलाम..!!

(ऑगस्ट 2017 मधे कन्हेरखेड येथे मालोजीरावांनी केलेल्या सुंदर आणि माहितीपूर्ण भाषणाचा सारांश)

फोटो
1-राणोजी शिंदे
2-कन्हेरखेड येथील त्यांच्या वाड्याचे अवशेष
3-भारतात पहिली रेलवे आनन्याचे स्वप्न पाहणारे जनकोजी शिंदे दूसरे
4-भारतातल्या सर्वात मोठ्या भुभागाचे प्रशासक जीवाजीराव शिंदे आणि शहाजी छत्रपती महाराज (कोल्हापूर)
5-जय विलास महल आणि त्याचे अंतरंग




माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a Comment