शिवाजी महाराजांचे पायदळ व पायदळाची व्यवस्था !!
शिवाजी महाराजांच्या सैन्य दळात पायदळ, घोडदळ तर १६५७ नंतर नाविक दळ, गुप्तहेर खाते असे सैन्य दळ होते. हे सैन्यदळ मोगल, आदिलशाही, कुतुबशाही, सिद्धी यांच्या पेक्षा अतिशय सक्षम, चपळ असे कि चलदाईने कारवाई करण्यात तरबेज असे पायदळ शिवाजी महाराजांकडे होते. स्वराज्याची लष्कर उभारणी शिवाजी महाराजांनी प्रारंभी पायदळा पासुनच केली. स्वराज्याचे मुळचे पहिले स्वरुप हे एका जहागीरी सारखेच होते. डोंगर दऱ्या अडचणीचा भाग, नद्या, घनदाट जंगले, असे या भागाचे स्वरुप. या भागात संरक्षणासाठी म्हणा अथवा लढाईसाठी म्हणा उपयोगी पडणार ते सुटसुटीत पायदळ. हे पाहता महाराजांनी पायदळाची उभारणी केली. या पायदळातील सैनिकास पाईक, हषम, पदाती किंवा प्यादा असे संबोधले जाई. यायदळाची शस्त्रे म्हणजे ढाल-तरवार, भाला, गोफण, शिवकालीन कागदपत्रांत बंदुखी (म्हणजे तोड्याच्या छोट्या बंदुकी वापरणारे) इटेकरी, (म्हणजे बर्ची किंवा लहान भाला बापरणारे), पटाईत – म्हणजे (म्हणजे दांड-पट्टा वापरणारे) तिरंदाज (म्हणजे तीरकमठा वापरणारे), आडहत्यारी (म्हणजे जमदाढ, कट्यार, बिचवा, वाघनखे, खंजीर, गोफण यासारखी शस्त्रे वापरणारे) यांचेही उल्लेख आढळतात.(शिवाजी महाराजांचे पायदळ)
पायदळात पाइकाव्यतिरिक्त बांकाईत व ढालाईतही असत. बांकाईत म्हणजे कर्णा, तुतारी यासारखी रणवाद्ये वाजविणारा तर ढालाईत म्हणजे निशाण सांभाळणारा. पाइकाची वेषभूषा म्हणजे, डोक्याला बुरुणुसाची टोपी, कानापर्यंत अंगात गोधडीचे कुडते, कधी नुसतीच घोंगडी ओढलेली, खाली विजार वा गुडघ्यापर्यं लपेटून घेतलेले वस्त्र, कमरेला उपरणे, त्यात शस्त्रे अडकवलेली, पायताण समोरून झाकले व मागून मोकळे, अशा स्वरूपाची असे. पायदळात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या श्रेण्या असत. त्यांचा पगारही वेग वेगळा असे. अखेरच्या श्रेणीतील पाइकाला ‘पाच टक्क्याचा प्यादा’ असे म्हटले जाते. त्यांचा पगार मासिक दीड रुपयापासून पाच रुपयापर्यंत असावा. याशिवाय, युद्धात विशेष कामगिरी बजावल्यास त्याला बक्षीस दिले जाई, शिवाय लुटीचाही काही भाग मिळे. पदोन्नतीची संधीही असेच. अशा नऊ पाईकांवर एक नाईक, अशा पाच नाईकांवर एक हवालदार, दोन किंवा तीन हवालदारांबर एक जुमलेदार, दहा जुमलेदारांबर एक हजारी व सात हजाऱ्यांवर एक सरनोबत अशा अधिकाऱ्यांच्या श्रेण्या असत. याच श्रेणीला मोगलशाहीत हजारी जात व पगारी असा एक हजारी तसाच पंजहजारी, संप्तहजारी मनसबदार नेमले जात. त्यांच्या पदरच्या सैन्याच्या पगारासाठी काहि मुलूख लावुन दिला जात असे त्यातून त्या सैनिकांचा पगार करावा लागे. पण स्वराज्यात तसी रित नव्हती. स्वराज्यात प्रत्येक पायदळाच्या सैनिकाचा पगार हा सरकारातुन दिला जाई. त्याचे कोष्टक असे होते.
नाईकाला सामान्यतः १० होन, हवालदारास ५० होन, जुमलेदारास १०० होन, एक हजाऱ्यास ५०० होन तर सरनौबतास बहुधा १००० होन सालीना पगार असे या अधिकाऱ्यांचा हिशोबी व्यवहार पाहणारे ‘सबनीस’ नावाचे अधिकारी असत. जुमलेदाराच्या सबनिसास ४० होन तर हनाईकाला सामान्यतः १० होन, हवालदारास ५० होन, जुमलेदारास १०० होन, एक हजाऱ्यास ५०० होन तर सरनौबतास बहुधा १००० होन सालीना पगार असे या अधिकाऱ्यांचा हिशोबी व्यवहार पाहणारे ‘सबनीस’ नावाचे अधिकारी असत. जुमलेदाराच्या सबनिसास ४० होन तर हजाऱ्याच्या सबनिसास १०० ते १२५ होन मिळत. महाराजांनी जेव्हा पायदळ उभारले तेव्हा पायदळाची संख्या ५००० होती. ती क्रमाक्रमाने वाढत गेली. व १६८० पर्यंत १०५००० (एक लाख पाच हजार) पर्यंत पोहोचली.
पायदळाचा पहिला सरनौबत नूरबेग होता. पुढे ही जबाबदारी येसाजी कंकावर सोपविली गेली. हजाऱ्याच्या सबनिसास १०० ते १२५ होन सालिना मिळत. किल्ल्यावर चढाई करताना, किल्ला झुंझवताना, पायदळाचाच हुकमी उपयोग होते. जिंकलेल्या मुलखाची व्यवस्था लावण्यास व लुटिचे वेळेस मुख्य वापर होत असे. या साठी सक्षम व अतिशय चपळ लांबपल्ला मारणारे पायदळ असावे लागे. व शिवाजी महाराजांचे पायदळ हे त्या वेळच्या सर्व सत्तांमध्ये नामी होते. ज्याही ठिकाणी तळ पडे त्या ठिकाणी जादा सरजाम नसे. महाजांसाठी एक छोटा तंबु, व सरदारांसाठी मोठा एक तंबु व खाण्याचा दाणापाणी एवढाच काय तो रसजाम असे. या कारणे पायदळाचा पोशाख असा का होता याचे कारण लक्षात येते. सैन्याकडे जेवढे वजन कमी हालचाली तेवढ्याच दुप्पट गतिने करता येत. असे हे स्वराज्याचे पायदळ शिवाजी महाराजांनी उभारले होते.
संदर्भ:-
¤ मराठ्यांचा इतिहास खंड पहिला
¤ छत्रपती शिवाजी महाराज- वा.सि.बेंद्रे
¤ शककर्ते शिवराय- शिवकथाकार विजय देशमुख
संकलन:- दुर्गवेडा कृष्णा घाडगे