हिरडस मावळात सापडलेला पहिला शिलालेख –
शिरगाव,ता.भोर,जि.पुणे या ठिकाणी निरा नदीचे उगमस्थान म्हणजेच “निरबावी”या ठिकाणी अभ्यास दौरा केला. निरबावी या ठिकाणी जाण्यासाठी शिरगाव गावातून उजव्या बाजूला एक पायवाट जंगलात दिशेने जाते.त्या वाटेने चालत गेल्यावर एका टेकाड्यावर चढते.पूडे गेल्यावर वाटेत एक ओढा आडवा जातो,त्याच रस्त्याने वेडी वाकडी वळणे घेत पुडे गेल्यावर वाट एका खोलगट भागात उतरते आणि समोरच दिसते चिरेबंदी दगडामध्ये बांधलेले एक सुंदर कुंड हीच ती “निरबावी” निरा नदी याच कुंडातून उगम पावते.हिरडस मावळात सापडलेला पहिला शिलालेख येथेच आहे.
निरबावीत उतरण्यासाठी सुंदर चिरेबंदी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून निरबावीती प्रवेश करताना समोर निवळशंख पाणी नजरेस पडते.निरबावीच्या उजव्या बाजूला गोमुख असून त्यातून पाण्याचा प्रवाह सतत वाहात असतो. निरबावीत उतरल्यावर उजव्या बाजूला दगडावर निरबावी बांधकाम सुरवात केल्याचे वर्षे श्री शंकर 1110 (श के 1188) देवनागरी लिपीत कोरलेले आहे. त्याच बरोबर समोरील भिंतीवर एक शिलालेख कोरलेला आहे त्यावर
श्री श के 1111 सोस्य नाम संवत्सरे लीहले आहे.याखाली आजून एक तीसरी ओळ लीहली आहे.परंतू दगडाची झीज झाल्याने शिलालेखावरील तीसरी ओळ व्यवस्तीत वाचता आला नाही.
शिलालेखाच्या उजव्या बाजूला एक देवळी (भिंतीत सामान ठेवण्यासाठीची जागा) आहे त्या देवळीत कोनी तरी स्थानिक ग्रामस्थाने एक टाक ठेवला आहे (आर्पन केला आहे ) त्यावर सात महिला देवता कोरल्या आहेत (स्थानिक भाषेत सातसळी म्हनतात ) आसा सातसळीचा टाक या हिर्डस मावळात आमच्या पहाण्यात प्रथमच आलेला आहे.
निरबावीच्या समोर दगडावर एक शंभू महादेवाची पिंड आणि नंदी पाहायला मिळतो.काहि वर्षा पूर्वी चिखल व मातीचा वापर करून सदर जागेवर मंदिर बांधण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आलेला दिसतो. शंभू महादेवाची पिंड समोर एक तुटलेला नंदि, सतीशिळा,व एका देवतेची मूर्ती आहे.तसेच पिंडीच्या डाव्या बाजूस गणपती,व दोन महिला देवतांच्या मुर्ती आहे त्यातील एक उग्र तर एक सौम्य देवता आहे हे त्यांच्या हातातील शस्त्रावरून दिसत आहे.
शंभू महादेवाच्या पिंडीच्या पाठीमागील बाजूस या ठिकाणी नदीवरून येण्यासाठी दगडात खोदकाम करून काळात पायरया कोरण्यात आल्या आहे. तसेच निरबावी एका बाजूला एके काळी (ग्रामस्थांच्या म्हनण्या नुसार साधारण चाळीस वर्षांपूर्वी) या ठिकाणी पूजा करण्यासाठी राहानारया एका पूजारयाच्या शिरगाव मधील ग्रामस्थांनी बांधून दिलेल्या घराचा भग्न चौथरा पहावयास मिळतो.
दिपक दत्तात्रय घोरपडे