महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,27,713

इस्कॉन मंदिर (पुणे)

By Discover Maharashtra Views: 4190 1 Min Read

इस्कॉन मंदिर

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) ही एक वैष्णव संप्रदायाची धार्मिक संघटना आहे. याची स्थापना १९६६ साली, संस्थापकाचार्य ए.सी.भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद ह्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे केली.

या संस्थेची तत्त्वे ही हिंदु संस्कृतीतील धार्मिक ग्रंथ श्रीमद भागवतम् व भगवदगीता ह्यावर आधारित आहेत. या संस्थेचे भारतातील मुख्यालय पश्चिम बंगाल मधील एक गाव मायापूर येथे आहे. कृष्ण हेच परम ईश्वर आहेत किंवा स्वयम भगवान आहेत व तेच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहेत अशी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाची मान्यता आहे. भारतीय संस्कृती व वैदिक विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी हा पंथ काम करतो.

इस्कॉन न्यू वैदिक कल्चरल सेंटर (एनव्हीसीसी) सामान्यतः इस्कॉन पुणे मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदीर पुणे येथील कात्रज कोंढवा रोड वर आहे. २०१३ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले. या मंदिरा शेजारी बालाजी मंदिर आहे.

सुंदर, अदभूत, प्रसन्न अशा भक्तिमय वातावरणात आलेला प्रत्येक व्यक्ती ‘हरे कृष्ण हरे कृष्ण’ च्या भक्ती रसात केव्हा रममाण होतो हे त्याचेच त्याला कळत नाही.

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे

माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti

Leave a Comment