इतिहास –
काळाच्या गर्भात लपलेल्या अनेक ज्ञात अज्ञात गोष्टींना बोलके स्वरूप देणारा इतिहास हा नेहमीच मानवासाठी कौतुकाचा विषय राहिला आहे.
वर्तमानकाळ आणि भूतकाळ यामधला कधीच न संपणार संवाद म्हणजे इतिहास असे प्रसिद्ध इतिहासकार इ.एच.कार म्हणतात. शतकांपासून पृथ्वीवर मानवाने अनेक गोष्टी अनुभवल्या – काही सुखद तर काही दुःखद. या सगळ्या घटना इतिहासाच्या अफाट पेटाऱ्यात दडवून ठेवल्या आहेत! मनुष्य या पेटार्यात लपवलेल्या घटनांच्या नेहमी शोधात असतो. कधी कुठल्या प्राचीन वास्तूंमध्ये तर कधी ढासळलेल्या बुरुजांमध्ये, कधी जीर्ण झालेल्या पाना-पुस्तकांमध्ये तर कधी पुसट होत चाललेल्या शिलालेखांमध्ये, कधी वयोवृद्ध मंदिरांमध्ये तर कधी नामशेष झालेल्या महालांमध्ये, कधी पडक्या वाड्यांमध्ये तर कधी पडलेल्या गडकोटांमध्ये असा माणसाचा इतिहासावरचा अविरत शोध चालूच आहे.
मग त्या पेटाऱ्यातुन मिळवलेल्या माहितीवरून बऱ्याच गोष्टींचा उलघडा होतो. इतिहासाच्या नवनवीन घटना, स्थळे, व्यक्ती इत्यादींची माहिती मिळते. याच माहितीच्या आधारावर आपला भूतकाळ किती दैदीप्यमान होता याची प्रचीती आपल्याला होते!
रोज इतिहासातील अनेक गोष्टी बाहेर येत असतात, नवनवीन रहस्यांचा उलघडा होत असतो. मिळवलेल्या माहितीवरून तर्क-वितर्क लावत मनुष्य निष्कर्ष काढतो आणि त्याच निष्कर्षाला आपण “इतिहास” असं नाव दिलं आहे!
इतिहासातील घटनांवर अनेक मतभेद असतात. प्रत्येकाचे शोध आणि निष्कर्ष वेगवेगळे असतात. पण त्या सगळ्या मुद्द्यांना आपण पानांमध्ये कैद करून नवीन इतिहास शोधण्यासाठी कधीच न संपणाऱ्या पुढच्या प्रवासाला निघतो. याचं इतिहासाच्या सुवर्ण पानांमध्ये दडलेली माहिती आणि ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी “इतिहासाच्या पानातून” हा पेज आम्ही सुरू केला आहे.
इथे प्राचीन भारताच्या इतिहासापासून आधुनिक भारताच्या इतिहासावर सखोल अभ्यास करून त्यावर नवनवीन लेख, माहिती, व्हिडिओ इ या व्यासपीठाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
अनेक पुस्तके, पत्रव्यवहार, इंटरनेट वर उपलब्ध माहिती इ वर अभ्यास करून मगचं लेख लिहला जाणार आहे. तेंव्हा आपल्या इतिहासातून आपण काय शिकायला हवं, कुठल्या चुका सुधारायला हव्या यावर इथे मुक्त चर्चा आपण करणार आहोत. या चर्चेतून नवीन गोष्टी शिकणार आहोत, पण चर्चे व्यतिरिक्त इतर गोष्टींना मोकळीक दिली जाणार नाही. कुठल्याच प्रकारचा सामाजिक आणि ऐतिहासिक खोटेपणा आणि जातीधर्माबद्दल चा द्वेष या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. हा व्यासपीठ इतिहासासाठी आहे आणि इथे त्याव्यतिरिक्त इतर गोष्टींना वाव दिला जाणार नाही.
इतिहासाच्या या रोमांचकारक प्रवासात सगळ्यांच स्वागत आहे. खरा इतिहास तुमच्या समोर मांडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! आपण या उपक्रमाला नक्कीच सहकार्य कराल अशी आशा आहे.
https://www.facebook.com/Itihasacyapanatun1914/
इतिहासाच्या पानातून