महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,19,638

जैन मंदिर कार्ला, निलंगा

By Discover Maharashtra Views: 1295 2 Min Read

जैन मंदिर कार्ला, निलंगा –

निलंगा तालुक्यात कार्ला गावी जैन वस्ती नसली तरी येथे पूर्वमध्ययुगातील जैन मंदिर आहे. सध्या या मंदिरचे अंतराळ व गर्भगृह शिल्लक असून येथील तीन तिर्थंकरांच्या अत्यंत रेखीव भव्य स्थानक मूर्ती आहेत.जैन मंदिर कार्ला, निलंगा.

मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारावर द्वारपाल असून एक हात अभय मुद्रेत तर बाकी हातांत अंकुश, पाश, गदा अशी आयुधे आहेत. सोबत निधी व चामरधारिणी सेविका कोरल्या आहेत ललाट बिम्बावर आसनस्थ तिर्थंकर तर खाली उंबऱ्यावर कीर्तिमुख कोरलेले आहेत. या गर्भगृहातील मूर्ती सध्या समोरच्या दुसऱ्या नवीन मंदिरात ठेवल्या आहेत. एक मोठ्या अशा पिठावर तीन तिर्थंकर स्थानक म्हणजे उभे आहेत. त्यांच्या बाजूस चार स्तंभ कोरले आहेत तिर्थंकारांच्या पायाशी दोन्ही बाजूने चामरधारिणी आहेत. या तीन तिर्थंकारपैकी मध्यभागीच्या तिर्थंकारांच्या डोक्यावर नागफणा असूनते  पार्श्वनाथ भगवान आहेत,भगवान पार्श्वनाथ हे कायोत्सर्ग मुद्रेत असून त्यांच्या दोन्ही बाजूने दोन्ही स्थानक तीर्थंकरही त्याच मुद्रेत आहेत, तिघांच्या छातीवर श्रीवत्स अंकित केले आहे.

तिन्ही तीर्थंकारांच्या डोक्यावर छत्र असून छत्राच्या दोन्ही बाजूस मकर तोरण असून त्यात इंद्र, गंधर्व तर त्यावरील लघु मकर तोरणात कीर्तिमुख अंकित आहेत. वरील बाजूस दहा मालाधर गंधर्व, वादक कोरले आहेत. या मूर्तीच्या मोठ्या पिठावर शिलालेख कोरला असून त्यात पार्श्वनेंदू नावाच्या दिगांबर मुनी जे कि चित्रकुटान्वय क्रनुरागण आणि मेषा पाषाणगच्छा या शाखेचे होते. या मुनीच्या अनुयायी गंगापती नावाच्या समाजातील व्यक्तीने हे रत्नात्रय जिनालय बांधले.

✍️ कृष्णा गुडदे

Leave a Comment