महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,14,377

मराठ्यांचा इतिहास  लिहिणारे थोर इतिहासकार डफ ग्रँट…

By Discover Maharashtra Views: 4204 4 Min Read

मराठ्यांचा इतिहास  लिहिणारे थोर इतिहासकार डफ ग्रँट…

कॅप्टन जेम्स कनिंगहॅम डफ ग्रँट हे मराठ्यांचे इतिहासकार म्हणून ओळखले जात. मराठ्यांचे राज्य संपुष्टात आल्या नंतरच्या काळात सातारला ग्रँट डफने प्रशासकीय कामगिरी करत असताना, इंग्लंडमधील अस्सल कागदपत्रांचा धांडोळा घेऊन मराठ्यांचा लिहीलेला इतिहास वैशिष्ट्यपूर्ण आहे .

मराठ्यांचा इतिहास लिहिण्या मागची मूळ प्रेरणा, तो इतिहास लिहिताना ग्रँट डफला आलेल्या अडचणी ,साधन सामग्री गोळा करण्यासाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट आणि तरीही प्रशासकीय जबाबदारी सांभाळताना इतिहासकार म्हणून काम करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या.बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या फर्स्ट रेजिमेंटचे कॅप्टन गँट डफ हे भारतातील अनेक प्रख्यात प्रशासक इतिहासकारा पैकी एक होत. वयाच्या सोळाव्या वर्षी मराठी ,उर्दू आणि पर्शियन भाषा मध्ये प्रभुत्व मिळविल्यामुळे ग्रॅन्ड डफ सुप्रसिद्ध इतिहास लेखक म्हणून प्रसिद्धीस पावले. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराच्या विस्तारासाठी ते एक मौल्यवान स्तोत्र म्हणून ओळखले जात. त्यांच्या व्यापक कामामुळे कागदपत्रे आणि अभिलेख  संशोधनासाठी त्यांना हिंदू मंदिरातही प्रवेश मिळत होता. त्याचा परिणाम म्हणून ग्रँट डफने इतिहासाचा सखोल अभ्यास केला. अनेक दशकापर्यंत सर्वोत्कृष्ट इतिहासाचे सखोल व सर्वोत्तम संशोधनाचे काम त्यांनी केले. मराठ्यांच्या इतिहासावर लिहिणारे सुप्रसिद्ध इतिहासकार म्हणून ग्रॅंट डफचे नाव घेतले जाते.

सातारच्या महाराजांचे ज्या पद्धतीने  राज्य खालसा केले यासंबंधीची कृती त्यांना आवडली नाही .ग्रंट डफ पुढे मद्रासचे गव्हर्नर झाले. तेथे स्थायिक झाल्यावरही सातारचे छत्रपती प्रतापसिंह राजांशी प्रदीर्घकाळ त्यांचा पत्रव्यवहार चालू होता.बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री अथवा बॉम्बे ग्रेनेड इयर्स मध्ये त्यांना अधिकाराची जागा मिळाली .फर्स्ट एलफिस्टन यांनी ग्रँट डफ यांना  मुद्दाम पुण्यात बोलावून घेतले .१८१७ मधे झालेल्या खडकी येथील मराठ्यां बरोबरच्या युद्धात प्रसंगावधान दाखवून त्यांनी शौर्य गाजवले.त्यासुमारास त्यांचे चांगलेच नाव झाले. आणि त्यांना कॅप्टन हा किताब मिळाला .

सन.१८१८ मध्ये त्यांची एलफिस्टन यांनी  साताऱ्यास पोलिटिकल एजंट म्हणून नियुक्ती केली. साताऱ्यात १८१८ ते १८२२  चार वर्षे ते राहिले.  साताऱ्याची राजकीय व्यवस्था लावून प्रतापसिंहराजे यांना त्यांनी चांगलेच मार्गदर्शन केले. सन.१८२३ च्या जानेवारीमध्ये ते मायदेशी रजा घेऊन गेले ते परत हिंदुस्थानात आलेच नाहीत.१८२५ मध्ये त्यांनी कंपनीच्या नोकरीचा राजीनामा दिला .तत्पुर्वी १८२५ मध्ये जेन कॅथरिन या तरूणिशी त्यांनी  विवाह केला .आपल्या पत्नीची काही संपत्ती त्यांना मिळाली, म्हणून उर्वरित आयुष्य त्यानी आपली संपत्ती व शेती यांची देखभाल करण्यातच घालविण्याचे ठरवले.पुढे त्यांनी  सातारच्या  महाराजांच्या अनुमतीने ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेऊन मराठ्यांचा सुसंगत इतिहास लिहिण्याचे कार्य केले.

सातारचे महाराज तसेच अनेक संबंधित सरदार

सरदेशमुख, देशपांडे आणि आदिलशाही, निजामशाही येथील तवारिखा व मराठी बखरी तसेच पत्रे जमवून माहिती गोळा केली. यामध्ये त्यास बाळाजीपंत नातू यांचे फार साहाय्य झाले. हा सर्व इतिहास त्याने एल्फिन्स्टन, ब्रिग्झ, व्हॅन्स केनेडी, विल्यम अर्स्किन, बाळाजीपंत नातू यांना दाखविला व मसुदा तयार केला (१८२२).जॉन मरे पब्लिशर्स लि. कंपनीने या पुस्तकाचे ‘मोगल सत्तेचा ऱ्हास आणि ब्रिटीश सत्तेचा उदय’ असे नामकरण केल्यास छापू म्हणून कळविले. तेव्हा मला मराठ्यांचाच इतिहास केवळ सांगावयाचा आहे, असे बाणेदार उत्तर देऊन त्यांनी स्वखर्चाने लाँगमन्स लि. कंपनीकडून १८२६ मध्ये हिस्टरी ऑफ द मराठाज हा ग्रंथ छापून प्रसिद्ध केला*.या व्यवहारात त्यास २,००० पौंड खर्च आला. त्यांपैकी ३०० पौंड कसेबसे वसूल झाले*.

*१९२१ पर्यंत या ग्रंथाच्या सहा आवृत्या निघाल्या. १८२९ मध्ये कॅ. डेव्हिड केपेन व बाबा साने यांनी या ग्रंथाचे मराठ्यांची बखर या शीर्षकाने मराठीत भाषांतर केले.त्याच्याही सहा आवृत्या निघाल्या.त्याच्या ग्रंथावर प्रथम कुठेच समीक्षण आले नाही व टीकाही झाली नाही*

मात्र नंतरच्या मराठी इतिहासकारांनी त्याच्या हिस्टरी ऑफ द मराठाज या ग्रंथावर  टीका केली. तथापि मराठ्यांचा सुसंगत इतिहास लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न सर्वांनी मान्य केला.

आपली  सरकारी नोकरी सांभाळून  ते कार्यालयीन वेळेनंतर आठ ते दहा तास संशोधन व इतिहास लेखनाचे काम करत असत .

                    लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a Comment