महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,401

जानोजीराजे भोसले (प्रथम)

By Discover Maharashtra Views: 1600 3 Min Read

जानोजीराजे भोसले (प्रथम) –

नागपुर कर भोसले मुळ चे कोरेगाव तालुका सातारा मधील देऊर या गाव चे आहेत राजेरघुजी भोसले यांचे पुञ नागपुर,इ स १७५५ to १७७२ = राजेरघुजी याना ४ पुञ होते-मुधोजी, जानोजी, बिँबाजी आणि साबाजी. जानोजी व साबाजी हे धाकट्या राणीचे आणी मुधोजी व बिँबाजी हे मोठ्या राणीचे पुञ परंतू जानोजीराजे हे सर्व भावंडात मोठे असल्याने रघुजीराजे यांच्या म्रुत्युपुर्वीच “सेनासाहेब सुभा” हे पद व गादिवर बसण्याचा निर्णय दिला.परंतु जानोजीराजे भोसले व मुधोजीराजे यांच्यात गादिवरुन वैमनस्य आले त्यामुळे दरबारातील वडिलधार्या व मुत्सद्दी लोकांनी पुढाकार घेउन पेशव्याकडुन जानोजीराजेस “सेनासाहेब सुभा” ची वस्ञे देऊन गादिवर बसवले आणि मुधोजीराजेस “सेनाधुरंधर” हा किताब देऊन समेट घडवुन आणला.जानोजीराजे भोसले

रघुजीराजेनी बंगालवर स्वार्या करुन ओरिसा पर्यँत मुलुख काबीज केला त्यात जानोजीराजे यानी चांगला पराक्रम गाजवला.मराठ्यांतर्फे ओरिसा प्रांतावरील सुभेदार असलेल्या मीर हबीब यास अलवर्दिखानाने ञास दिल्यानंतर त्याचा बंदोबस्त जानोजीराजेनी केला व इ स १७५१ मध्ये भोसल्याना बलसोर बंदरापर्यँत सर्व कटक प्रांत देऊन तह केला,शिवाय बंगाल व बिहार यांच्या चौथाई बद्दल नवाबाने रघुजीराजेना दरसाल १२ लाख रु देण्याचे कबुल केले.

याप्रमाणे जानोजीराजेंच्या कर्तबगारीमुळे ओरिसाप्रांतावर नागपुरकर भोसल्यांचा अधिकार झाला.इ स १७६१ मधिल पानिपतच्या पराभवानंतर नानासाहेब पेशव्याचा २३ जुन १७६१ धक्क्याने पुण्यात म्रुत्यु झाला त्यावेळी जानोजीराजेनी बुंदेलखंडात जाऊन बंडाळ्या मोडुन मराठ्यांचा दरारा प्रस्थापीत केला, याचे श्रेय जानोजीराजेकडेच जाते. पानिपतचा पराभव व नानासाहेबाचा म्रुत्यु यामुळे निजामाने ६० हजार फौज घेऊन पुण्यावर चाल करण्यास निघाला त्यावेळी जानोजीराजेना मराठा संघराज्यातुन अलग करण्यासाठी दिवाण विठ्ठल सुंदर तर्फे सातार्याच्या गादिचे अमिष दाखवुन कटकारस्थान केले.पुढे हैदराबादचा निजाम अलिखानाने वर्हाडातिल प्रदेश जिँकण्यास सुरुवात केली.निजामअलीची व जानोजीराजेची गाठ बर्हाणपुर जवळ पडली निजामअलिने इब्राहिम खान गारदीच्या(हाच पुढे पानिपतच्या युद्धात मराठ्याकडुन लढला) तोफखान्याच्या मदतीने जानोजीराजेँचा इ स १७५७ मध्ये पराभव केला आणी एलिचपुर येथे तह झाला त्यानुसार वर्हाडातील उत्पन्नापैकी ४५% नागपुरकर भोसल्यानी तर 55% निजामाने घ्यावे असे ठरले.

राघोबादादा व माधवराव पेशवे यांच्या भांडणात जानोजीराजेनी राघोबादादाकडुन बाजु घेतल्यामुळे आणि पुण्यावर १७६३ साली केलेल्या स्वारीचा(यात जानोजी यांच्या रघुजीं कारंडे या सरदाराने मोठा पराक्रम केला होता.) वचपा म्हणून जानोजीराजेना धडा शिकवण्यासाठी माधवराव पेशव्याने इ स १७६८ मध्ये नागपुरवर स्वारी करुन शहराची धुळधाण करुन प्रचंड लुटमार केली.नंतर चंद्रपुरला वेढा दिला.परंतु जानोजीराजे बाहेर असल्याने नजरकैदेत असलेल्या राघोबादादाची सुटका करतील या भितीने वेढा उठवुन त्यांचा पाठलाग करुन तह करण्यास भाग पाडले.या तहास कनकपुरचा तह म्हणतात.

या तहानुसार जानोजीराजेकडुन पेशव्यानी मराठासंघावरील स्वत:चे सर्व अधिकार मान्य करुन घेतले.२४ एप्रिल इ स १७६९ रोजी मेहकर येथे जानोजीराजे व माधवराव पेशवे यांच्या भेटी झाल्या.याच भेटीच्या परतीच्या मार्गावर नळदुर्ग परिसरात जानोजी यांच्या खालावलेल्या प्रकृतीला प्लेगच्या काळात आजाराने येडोळा या गावी गाठले. १६ मे १७७२ साली त्यांच्या जेष्ठ बंधुनी याच गावी भडाग्नि दिला.

जानोजी भोसले (नागपुर) यांची समाधी, यडोळा, उस्मानाबाद.

– Rajenaresh Jadhavrao

Leave a Comment