महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,093

जत संस्थान | बखर संस्थानांची

Views: 3441
3 Min Read

जत संस्थान | बखर संस्थानांची –

जत संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील त्या वेळच्या मुंबई प्रांतातील एक मराठा संस्थान. क्षेत्रफळ २,५३१ चौ.किमी.  संस्थानचे वार्षिक उत्पन्न सु. ३ लाखांवर होते. यात जत व डफळापूर ही शहरे आणि ११७ खेडी समाविष्ट होती. डफळापूरचा पाटील सटवाजीराव चव्हाण-डफळे (१६६३–१७०१) याने १६८० च्या सुमारास ३,००० मोहरा खंडणीच्या बदल्यात आदिलशाहीकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळविली. आणि इ स १६८१ मध्ये  डफळे ह्या राजघराण्यातील पराक्रमी राजे सटवाजी यांना जतची जहागिरी मिळाली . त्याचा मुलगा बाबाजी यानेही जहागीर कायम ठेवली. आऊसाहेब डफळे (१७०१–५४) या कर्तबगार राणीने पेशव्यांची अधिसत्ता मान्य केली. पुढे पेशवाईच्या अस्तापर्यंत जत संस्थान पेशव्यांच्या अधिपत्याखाली होते दुसऱ्या बाजीरावाने काही काळ देशमुखी जप्त करून त्रिंबकजी डेंगळेकडे या संस्थानचा कारभार सोपविला होता.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात डफळापूरचा २५ चौ.किमी. प्रदेश राणीची खाजगी जहागीर समजला गेला. संस्थानाला दत्तकाची सनद १८९२ मध्ये मिळाली. त्यानुसार १९०७ मध्ये रामराव अप्पासाहेब या दत्तकपुत्राला अखत्यारी मिळाली. ब्रिटिशांना दरवर्षी ११,२४७ रु. खंडणी संस्थान देई. संस्थानिकाचे न्यायदानाचे अधिकार मर्यादित होते.    संस्थानिक  मराठा क्षत्रिय असून पहिल्या वर्गाचे सरदार होते. डफळे आडनावावरून डफळापूर नाव पडले. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थान त्या वेळच्या मुंबई राज्यात विलीन झाले (१९४७) व १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यात ते समाविष्ट झाले.

रामायण-महाभारत काळापासून ते अगदी पेशवाईकाळा पर्यन्त जतचे उल्लेख आढळतात. थोरलीवेस, डफळे सरकारांचा वाडा, राममंदिर, बंकेश्वर मंदिर,  अश्या अनेक वास्तू पुरातन काळाच्या आठवणी देत आजही तश्याच उभ्या आहेत.

जत संस्थानाचा त्या काळचा दरवाजा ही थोरली वेस म्हणुन  जतची ओळख आहे. असं सांगतात की जत हा पूर्वी रामायणातील दंडकारण्य तर  महाभारतातील एकचक्रा नागरी होती आणि येथील बंकेश्वराचा मंदिराचा संबंध बकासुराशी आहे अशीही आख्यायिका आहे. कालांतराने हे नाव जयंती नगर होते असेही सांगितले जाते. जतमध्ये सहाव्या शतक पासूनचे संदर्भ आढळून येतात. पुढे हा प्रदेश विजापूरच्या ताब्यात होता.

डफळे संस्थानाची धुरा अमृतराव (दुसरे), राजेरामराव आणि त्यानंतर श्री विजयसिंहराजे यांनी सांभाळली. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही श्री विजयसिंहराजे यांनी खासदार रूपाने जतची सत्ता सांभाळली. ते काही काळ भारतीय नौदलातही होते. (मराठी विश्वकोष)

जतचे पुरातन राममंदिर –

डफळे सरकारांचे मंदिर अशी ह्या मंदिराची ओळख. पुजारीही राजांनी नेमलेले. दरवर्षी खूप उत्साहात आणि खूप मोठ्या प्रमाणात रामनवमी साजरी व्हायची. हे घराण रामच भक्त असल्याने वाड्या जवळच श्रीराम मंदिर आहे. जहागिरीसाठी स्वतंत्र असे स्टँप पेपर ची व कोर्टफी ची परवानगी असल्याने जत संस्थान व डफळापूर इलाखा जत असे पेपर पाहावयास मिळतात. यांच्या स्टँप पेपरवर श्रीराम असे छापलेले दिसते.

संतोष मु चंदने, चिंचवड ,पुणे.

Leave a Comment