महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,08,938

जावळीच्या रानांत

Views: 4125
4 Min Read

“जावळीच्या रानांत….”

“आपल्या बुद्धिवैभवे व पराक्रमे कोणाची गणना न धरिता(करीता), कोणावरी चालून जाऊन तुंबळ युद्ध करून रणास आणिले, कोणावरी छापे घातले, कोणामध्ये परस्परे कलह लाऊन दिले, कोणाचे मित्रभेद केले, कोणाचे डेरीयात सिरोन मारामारी केली, कोणासी एकांगी करून पराभविले, कोणासी स्नेह केले, कोणाचे दर्शनास आपणहून गेले, कोणास आपले दर्शनास आणिले, कोणास परस्परे दगे करवले, जे कोणी इतर प्रयत्ने ना कळे त्यांचे देशात जबरदस्तीने स्थळे बांधून पराक्रमे करून आकळीले.”

खुद्द शिवाजीराजे व मावळे चाळीसहजार घोऊन रात्री चालोन तिसरे रोजी श्रीमहाबळेश्वरावरुन निशाणीचा घाट उतरुन जाऊलीस गेले.रघुनाथ बल्लाळ सबनविस व माणकोजी दहातोंडे सरनौबत त्या समागमें फौज देऊन रडतोंडीच्या घाटें तिकडून ते आले.जाऊलीस वेढा घातला.दोन प्रहर पावेतो भांडण झाले.गांव घेतला.बाजीराऊ आणि कृष्णाराऊ राजे मोरे पंधरा सोळा वर्षाची उमर होते.त्यांस स्रीयांदेखील कैद केले.मत्ता द्रव्य बहुत पुरातन राज्यभंग केला.चंद्रराऊ मोरे घेऊन पुण्यास आले. :-९१ कलमी बखर

थोडा सरंजाम केला.त्यांणी(मोरेंनी) अमानुष कृती केली.तस्मात त्या जागेचा लाभकाळ आमचा आहे.त्या आर्थी कोणताही आंदेशा न देऊन सर्वांचे एकदिलाने पुरंदराहून श्रीमहाबळेश्वरी येऊन श्रीसांबसदाशिवाचे दर्शन घेतले.ध्यान करीते झाले.

ऐसे ध्यान करुन त्याच घाटांनी खांसा उतरले.रघुनाथ बल्लाळ आत्रे(कोरडे)ह्यांजबराबर पांच सांत हजार मावळे व पांच चारशे स्वार देऊन,रडतोंडीचे घाटांनी यावे असे संकेताने एकसमायावच्छदें उभय सैन्य जावळीस सुर्योदयापूर्वी येऊन लागली. :-श्रीशिवदिग्विजय

शिवाजीराजांनी आपल्या सैन्यास रडतोंडीच्या (आश्रुमुखीच्या)घाटांवरुन जाण्यस सांगून आपण रात्री.शिवालयांत झोपले.सकाळी ससैन्यासहित निघाले.दुतांकडून शिवाजीराजे ससैन्य आगमन समजल्यावर चंद्ररावाचे सैन्य रडतोंडीच्या घाटाकडे गेले. :-शिवकाव्य

सांप्रत महाबळेश्वरच्या “एलफिंन्स्टन पॉईंट” या ठिकाणाहून शिवराय स्वत: चाळीस हजार सैन्य घेऊन खाली उतरले.या बाबतच्या या बखरीतील नोंदी आहे.आणखाही समकालीन साधनांत या नोंदी मिळतात.यात चाळीस हजार सैन्य या बाबत थोडीशी शंका वाटते.संख्या कमी जास्त असेलही…

पण,महाराज याच घाटाने खांसा उतरले हे नक्की.

आता म्हणाल तर काय घाट तर आहे कुणीही उतरेल.

नाही गडे हो…

जावळी म्हणचे जणू गरुडाची बसकण.वाघाची जाळी ती जावळी.अत्यंत घनदाट कड्या कपारी अन जंगलांनी भरलेला हा परिसर.जावळीस उतरण्यास आत्ता बरेच मार्ग आहेत.त्यावेळीहि आणखी असतील….

पण,या घाटाने उतरण्याची महाराजांची रणनिती वेगळी होती.

१६५६ सालाचा सुरुवातीचा कालखंड.जावळीचे “चंद्रराव” बिरुद धारण करणारे “मोरे” महाराजांच्याच कृपेने गादीवर बसले.महाराजांनाही वाटले.पुढे मागे स्वराज्यास हातभार लावतील.पण झाले उलटे.सात आठ वर्षाच्या कालखंडामध्ये स्थिर स्थावर झाल्यावर मोरे.महाराजांवरच उलटले.मोरे घराण्याच्या बखरीत एक पत्रव्यावहार आहे.तो खरा की खोटा माहित नाही.केवळ मोरे उलटले म्हणूनच महाराजांनी जावळी घेतली अस काही नाही.हे कारण तर होतेच.पण आणखीही एक महत्वाचे कारण होते.ते नंतर कधीतरी स्वतंत्र्य लेखात मांडेन.

आजही महाबळेश्वर एलफिंस्टन पॉईंट भागात गेलात.त्या घाटाचे मुळ नाव पांगुळा किंवा पांगळा घाट.बखरीत उल्लेख निसणीचा किंवा निशाणीचा घाट असे येतात.हा घाट सांप्रत जावळीवाडी गावाच्या अलीकडील दरे गावात उतरतो.आजही या घाटातून लोक ये जा करतात.एका वेळी एकच माणूस चालून जाईल इतकाच रस्ता आहे.आजूबाजूला तुटलेले कडे जंगल.आजमितीला इतके जंगल आहे.शिवकाळांत तर आणखी आणखी असेल.

तर महाराजांनी रणनिती खेळली काही सैन्य रडतोंडी घाटाने पाठवले.मोरेंना बातमी लागली.मोरेंनी आपले सैन्य रडतोंडी घाटाकडे पाठवले.त्याच वेळात महाराज या अत्यंत निभिड किचकट वाटेने.

पालखी किंवा घोड्याने नाही हं.स्वत:च्या पायांनी उतरले.ते ही कित्येक हजार सैन्य घेऊन.हे धाडस म्हणजे हातात भगवा झेंडा घेऊन सेल्फी काढण्याइतके व सोशल मिडीयावर मी कट्टर हिंदू बोंबलण्या ईतक सोप नव्हे बरं……

महाराजांनी ते स्वत: करुन दाखवल…..

महाराजांनी जावळी मारली…

पुढे येणार्या संकटांचा शिवभूपतींनी योग्य अंदाज घेतला.

योग्य नियोजन,रणनितीने हि लढाई मारली.

“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊलें..”

“ईतिहास हे एक पान आहे ते नेहमी फिरुनच वाचायचे असते.”

रायरेश्वरतेरायगडभटकंतीमोहिम

बारायगडपरिवार

-नवनाथ आहेर

Leave a Comment