महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,36,964

जयरामस्वामी वडगाव वाडा…

By Discover Maharashtra Views: 4496 2 Min Read

जयरामस्वामी वडगाव वाडा…

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणाऱ्या वडगाव गावात कृष्णभक्त जयरामस्वामी यांचा वाडा आहे. कराडपासून ३० कि.मी अंतरावरा असलेल्या पुसेसावळी जवळ असलेले सहाशे वर्षांची संत परंपरा व हुतात्म्यांच्या देशभक्तीने पावन झालेली ही वडगावची भूमी. सातारा-सांगलीच्या हद्दीवर वडगाव हे गाव नांदनी नदीकाठी वसले आहे. पूर्वी या गावचे नाव वटगाव म्हणजे “नेग्रोदग्राम” होते.स्वामी शांतिलिंगाप्पा यांनी शिष्य श्री कृष्णाप्पास्वामी यांना उपदेश केला की वटगाव या गावी जाऊन प्राचीन भवानी शंकर मंदिरात उपासना करावी. श्री कृष्णाप्पास्वामी यांनी शके १५०४ मध्ये भवानी शंकर मंदिराशेजारी मठाची निर्मिती करण्यास सुरुवात केली.

अहमदनगर जिल्ह्यातील कातराबाद मांडवगण येथील भिकाजी देशपांडे व कृष्णाबाई देशपांडेचे यांच्या घरी शके १५२१ म्हणजे इ.स. १५९९ ला गोकुळ अष्ठमीच्या दिवशी श्री जयराम स्वामी यांचा जन्म झाला. श्री जयराम स्वामी यांनी श्री आंबेजोगाई मातेची फार उपासना केली. तेव्हा श्री मातेच्या आशीर्वादाने व उपदेशाने ते पंढरपूरला गेले. पंढरपूरमध्ये तपश्यर्चा करत असताना त्यांची भक्ती व निष्ठा पाहून पांडुरंग प्रसन्न होऊन त्यांच्या बरोबर पश्चिमेला सुमारे शंभर किलोमीटर वटग्रामच्या माळावर आले. त्याठिकाणी पांडुरंग गुरू श्री कृष्णाप्पास्वामी व श्री जयराम स्वामी यांचा त्रिवेणी संगम झाला. आज त्या माळाला ‘विठोबाचे माळ’ म्हणून ओळखले जाते.श्री जयराम स्वामींच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ पंचायतन, संत तुकाराम महाराज व संत बहिणाबाई यांच्याबरोबर आध्यात्मिक सलोखा होता. श्री कृष्णाप्पास्वामी यांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर मठाची धुरा सांभाळून भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी वडग्राम संस्थानची धुरा सांभाळून आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारून आसाच वारसा पुढे चालू ठेवण्याच्या परंपरा निर्माण केली. स्वामींच्या भक्ती कार्यामुळे वाड्मयामुळे वडग्रामचे नाव ‘वडगाव जयराम स्वामी’ नावाने ओळखले जात आहे.

साभार सौरभजी कुलकर्णी

Leave a Comment