महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,48,928

झाकोबा मंदिर, पुणे

Views: 2730
3 Min Read

झाकोबा मंदिर, पुणे –

पुणे….वाडे, मंदिरे यांच शहर. पुणे हे एक वैशिष्टपूर्ण शहर आहे. मध्ययुगीन कालखंडात ब-हाणपूर, सुरत सारखी बाजारपेठ नव्हती की नगर, ओरंगाबाद सारख राजकीय महत्व न्हवत. पुणे अधी एक साधा कसबा  नंतर जहागिरीचे ठिकाण नंतर मोगली ठ‍ाणे  तर १८व्या शतकातील हिंदुस्थानच्या राजकीय घडामोडीचे केंद्र बनले असा पुण्याचा प्रवास होता होता ह्या शहराचा विकास झाला . येथे मोठे वाडे बांधले गेले .पेठा वसवल्या गेल्या. धार्मिक कार्यासाठी मंदिर बांधली गेली.(झाकोबा मंदिर)

कसबा गणपती ,नागेश्वर महादेव ,त्रिशूंड ,जोगेश्वरी, तळ्यातल गणपती असे अनेक मंदिर व त्यातील देवतांना प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. या सगळ्या देवता प्रतिष्ठित .यांची पुजा अर्चा, नेवैद्य ,आरती सगळ वेळेत. या प्रतिष्ठित दैवतांन प्रमाणेच दुसरे दैवत म्हणजे ग्रामदेवता किंवा अनगड देवाता किवा क्षेत्रपाल. पुण्यातील एक अपरिचित क्षेत्रपाल दैवता म्हणजे झाकोबा.  त्याचे मंदिर म्हणजे झाकोबा मंदिर.

झाकोबा हा शिवगणां पैकी भैरवाच एक रुप आहे. या देवतांच ठाण एखाद्या झाडाखाली ठरलेले असायच. तांदळारुपात किवा मूर्तीरुपात हेंदरी शेंदरी रंगात ह्या देवता असतात. शेतीच्या पिकाच रक्षण , घरामध्ये कुणाला बाहेरचा त्रास , भूतबाधा होउ नये साठी या देवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी मानपान दिला जाई. यांना तस गोड धोड र्व्यज. एखादा बकारा दिला जाई .नाहीच मिळाल तर कोंबड ही गोड मानून घेई.

पुण्यातील झाकोबा च ठाण पिंपळाच्या झाडाखाली आहे. दगडी चिरांच बांधकाम . दोन उभे खांब .वर  पडझड झालेला कळस. आत मध्ये घोड्यावर बसून शस्त्र धारण केलेला झोकोबा. मंदिराच बांधकाम पुरातन असून ते पाहचाच क्षणी लक्षात येते . या मंदिरांच्या चि-यांना पिंपळाच्या मुळ्यांनी घट्ट मिठीत घेतले आहे. चारही बाजूंनी तर गाभा-याच्या आत पर्यंत याने आपले हात पाय पसरले आहेत. या झाकोबाच ‍व पिंपळाच नात येवढ घट्ट आहे की त्यांने या मंदिराचे चिरे ढवळू दिले नाही.

मंदिराच्या बाहेर दोन पाच फुटाच्या वीराच्या स्मारकशिळा आसून यावर वीर कोरले आहे. एका शिळेवर चंद्र व सुर्य कोरले आहे. ‘यावत चंद्र दिवाकरो’ प्रमाणे या वीरांचे स्थान अधोरेखीरत करते.

मंदिर पाहता या झाकोबा ला पिंपळाने दिलेले अलिंगनाने या मंदिराची गूढता वाढवते. पिंपळाच झाड कमी पडल की काय त्यात अजून कडुनिंबाच झाडानेही या मंदिरावर अतिक्रमण केलेल दिसत. हनुमान जयंती ला याची यात्री ,उरुस चालू होतो. मान पान दिला जातो.

संतोष मुरलीधर चंदने. चिंचवड , पुणे

Leave a Comment