झंझाई माता | विंझाई माता –
पुरातन काळापासुन असलेले वास्तु ,मंदिरे , कडांच्या टोकावर असलेल्या देवता,लेणी ,टाक इतिहासाचा वारसा सांगणा-या ह्या वास्तु आपली वाट पाहात आहे. अशीच एक अपरिचित फारसा कुणाला ज्ञात नसलेली एक गुहा ( कपार) जी प्रचंड खोल दरीत , घनदाट झाडीत, अखंड वाहणारा धबधबा , कातळ कपारीत नवसाला पावणारी झंझाई माता / विंझाई माता चे स्थान आहे.
भुगाव पिरंगुट यांच्या मध्ये असलेल्या भुकुम गावातुन खाटपे वाडी.शेडगे वाडी,उभे वाडी तुन एक वाट पाय़ी खाली दरीत उतरते.ही वाट पठारा वरुन खाली अरुंद असुन सावकाश उतरावे.खालच्या खोल दरीच्या डोंगरात एका १५/५/१३ फूट कपारीत देवी चे स्थान आहे. तांदळा रुपात तीन र्मुत्या आहेत.देवी समोर दगडी दिवा असुन ब-याच घंटा बांधलेल्या आहेत.शिवकालीन असलेल्या या देवता उत्तरमुखी आहेत.एका बखरी मध्ये या स्थानाचा उल्लेख आलेला आहे असे समजले.
तुपे ( हडपसर) घराण्याची लोक हिचे उपासक आहेत. अशी कपारीत ठाण असलेली विंझाई माता चे एक नविन मंदिर ताम्हणी घाटात बांधले आहे. अशी ही नवसाला पावणारी माता व तेथील निसर्ग आपली वाट पाहात आहे. शांत असा परीसर असुन जंगली प्राणी दिसण्याची शक्यता असते.
टिप. येथे प्रचंड खोल दरी असुन सावकाश उतरावे. गावतुन नीट माहीती घेउन वाट उतरावी. सपाटी पासुन खाली दरित उतरावे लागत असल्यने वाट सापडणे जरा आवघड आहे पण कठिण ही नाही.सपाटी पासुन खाली दरित उतरावे लागत असल्यने वाट सापडणे जरा आवघड आहे पण कठिण ही नाही.
संतोष चंदने ,चिंचवड ,पुणे.