महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,244

महाराणी अहिल्यादेवींची न्यायव्यवस्था

Views: 3646
2 Min Read

महाराणी अहिल्यादेवींची न्यायव्यवस्था…

मराठ्यांचा इतिहास सातासमुद्रापार गेला आणि आठवणीत राहिला याची अनेक कारणे आहेत पण मला वयक्तिक जे महत्वाचे कारण वाटते ते म्हणजे “मराठ्यांचे राज्य हे नेहमी रयतेला डोळयासमोर उभे करून चालले” रयतेला न्याय मिळणे यावर शिवरायांनी स्वराज्याची पायाभरणी केली जी पुढे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे चालवले..

याचीच पुरावृत्ती झाली ती “महाराणी अहिल्यादेवी” यांच्या काळात “प्रजेच्या हितासाठीच राज्याची निर्मिती आहे राजा आणि प्रजेचा संबंध म्हणजे आई-पुत्राच्या संबंधाप्रमाने असतो” असे महाराणी अहिल्यादेवी सांगत आणि वागत सुख-शांतीचे, बंधुभावाचे, न्याय प्रिय राज्य निर्माण करणे हेच त्यांचे उद्धिष्ट होते यासाठी सर्वात महत्वाचे अंग असते ते म्हणजे “न्यायव्यवस्था”.. महाराणींच्या इतिहासात अशी बरीच उदाहरणे आहेत ज्यातून त्यांची न्यायव्यवस्था दिसुन येते..

एक वेळेस मल्हारबांनी घोडे खरेदी करण्यासाठी महादजी थिटे केंदूरकर यांच्याकडून कर्ज घेतले होते मल्हारबांच्या मृत्यूनंतर थिटे यांचा नातलग राणोजी थिटे सर्व कागदपुरावे घेऊन महाराणींकडे आले ताबडतोब सर्व कागदपत्रांची तपासणी करून सर्व कर्जाची रक्कम परत करण्यात आली..

१ ऑक्टोबर १७९२ साली महाराणींनी भारमलदादाला एक पत्र लिहून कळवले होते की परगना थालनेर मौज बाघाडिय्या जाखोजी जगतापवर आरोप लावून चारशे रुपये वसूल करून सरकारी खजिन्यात भरवण्यात आले आहेत प्रत्यक्ष तपासणी केली असता जाखोजी जगताप हे निर्दोष आहेत तरी आपण ताबडतोब त्याची रक्कम परत करावी..

सामान्य जनतेला वेळेवर न्याय मिळावा म्हणून राज्यात न्यायालयाची स्थापना केली प्रत्येक गावाला पंचायतीची स्थापना करून न्यायदान देणारे अधिकारी नेमण्यात आले महाराणींच्या मार्गदर्शनाखाली न्यायालय व न्यायदानावर कठोर नियंत्रण ठेवण्यात आले होते ज्यांना योग्य न्याय मिळाला नाही त्यांना प्रत्यक्ष महाराणी अहिल्यादेवींकडे अर्ज करून न्याय मागता येत होता..

महाराणी अहिल्यादेवींच्या न्यायदानाच्या बाबतीत कवी मोरोपंत म्हणतात..,

देवी अहिल्याबाई | झालीस जगतत्रयात तू धन्य |

न न्याय-धर्म निरता | अन्या कलीमाजी ऐकिली कन्या ||

संदर्भ : महाराणी अहिल्याबाई होळकर

लेखक : गोविंदराम शूरनर

Leave a Comment