महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,82,285

कालपुरूष | आमची ओळख आम्हाला द्या

By Discover Maharashtra Views: 1289 3 Min Read

कालपुरूष | आमची ओळख आम्हाला द्या –

छत्तीसगड जिल्ह्यातील ताला या ठिकाणी आढळणारी एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती जिला शिवाची मूर्ती किंवा पशुपतिनाथ मूर्ती किंवा सर्वभूतवहित्र मूर्ती म्हणून ओळखले जाते. मूर्ती शास्त्राच्या दृष्टीकोनातून ही कालपुरूष एकमेव अशी मूर्ती आहे .अशा प्रकारची दुसरी मूर्ती कुठेच आढळून आलेली नाही. पशु,पक्षी ,मनुष्यांच्या आकृती पासून हि अद्भुत मूर्ती निर्माण केलेली आहे. कलाकाराच्या कल्पकतेला कोणत्याही प्रकारच्या सीमा नसतात हे या मूर्तीवरून स्पष्ट होते.

डोक्यावर पगडी बांधावी तसा सर्पाचा मुकुट मूर्तीच्या मस्तकावर आहे. नाकाच्या ठिकाणी विंचवाची आकृती साकारून तेच नाक भासविले आहे. भुवया बेडकांच्या पायाच्या आकाराप्रमाणे आहे. नेत्र गोलाकार आंड्याप्रमाणे आहेत. दोन्ही कान मयूराकृती आहेत. हनुवटीवर खेकडा अंकित केलेला आहे. मिश्यांच्या ठिकाणी दोन्ही बाजूस दोन मासे दाखविले आहेत. खांद्याच्या ठिकाणी दोन्हीकडे मगरीचे मुख्य दर्शविले आहे.दोन्हि हात हत्तीच्या सोंडेच्या आकाराचे आहेत. हाताची बोटे ही सापाच्या मुखाप्रमाणे. आहेत पोट व पाय यांना जोडणारा भाग हा कासवाच्या आकाराचा आहे. वक्षस्थळी दोन मनुष्याकृती आहेत. पोटावर एक गोलाकार मनुष्याचे मूक असून ते कुंभाचे प्रतीक असावे. जांगघेवर विद्याधरांच्या आकृती आहेत. गुडघ्यावर दोन्ही बाजूस सिंहाचे मूख आहे. दोन्हि पाय हत्तीच्या पाया समान आहेत.

दोन्ही खांद्यावर दोन्ही बाजूस साप दाखवलेले आहेत. मूर्ती च्या उजव्या बाजूस पायाजवळ नाग दाखविलेला आहे. अशा प्रकारे या मूर्तीवर विविध पशू, पक्षी, प्राणी ,मनुष्य यांचे अंकन करून ही मूर्ती तयार केलेली आहे. जलचर ,भूचर, उभयचर ,खेचर अशा विविध प्राण्यांच्या संमिश्र स्वरूपाचे हे शिल्प आहे. निसर्गातील जीवजंतू यांना एकत्रित करून मनुष्याकृती दाखवून शिल्पकाराला काय सूचित करावयाचे असावे ?अशा मूर्तींचा मूर्ती शास्त्राच्या ग्रंथात कोठेही उल्लेख आढळून येत नाही .मग या मूर्तीस शिव किंवा पशुपती किंवा सर्वभूतवहीत्र  कसे संबोधायचे?

एकंदरीत बारकाईने या मूर्तीचा विचार केल्यास एक बाब प्रकर्षाने जाणवते .ती अशी की, ही कालपुरुषाची मुर्ती आहे. कारण निसर्गातील सर्वच प्राण्यांचा समावेश करून या मूर्तीची निर्मिती केलेली आहे. ही मूर्ती मंदिरात नसून मंदिराच्या बाहेर द्वारपालाच्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे ही देवता पशुपती,शिव, सर्वभूतवहित्र असणे कठीणच आहे. त्यामुळे ही मूर्ती काल पुरुषांची आहे. या मूर्तीस कालपुरुष संबोधने अधिक उचित होईल .त्याच बरोबर भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार ज्या बारा राशी आहेत, त्या बारा राशींच्या प्रतीकांचे अंकन ह्यामध्ये केलेले दिसून येते. उदाहरणार्थ मेष राशीचा मेंढा ,मीन राशीचा मासा ,कर्क राशीचा खेकडा, मकर राशीची मगर, सिंह राशीचा सिंह इत्यादी. या सर्व बाबींचा चिकित्सकपणे विचार केल्यास ही मूर्ती कालपुरूषाचीच आहे हे स्पष्ट होते.

टिपः फोटोसह कालपूरूषाची आकृती देत आहे.जेणेकरून संकल्पना अधिकच स्पष्ट होईल.

कालपुरूष कालपुरूष

 

 

 

 

 

 

 

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a comment