किल्ले करमाळा –
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्याच्या गावी एक मजबूत भुईकोट किल्ला आहे. करमाळा गाव भिगवणवरून ६० कि.मी. व टेंभुर्णीवरून ४० कि.मी अंतरावर आहे. करमाळा गाव हे भुईकोटात वसले आहे. भुईकोटाचे बुरूज, तटबंदी, भव्य प्रवेशद्वार शिल्लक आहे. भुईकोटाच्या प्रवेशद्वाराजवळच मंदिराबाहेर सतीशिळा आहे. किल्ल्यातील खोलेश्वर प्राचीन मंदिर एकदम अप्रतिम आहे.
करमाळा भुईकोटाचे बांधकाम रावरंभा निंबाळकर व त्यांचे पुत्र जानोजीराव यांनी इ.स. १७२७ – १७३० या कालावधीत केले. रावरंभा नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी सखुबाई महादजी निंबाळकर यांचे नातू होते. करमाळा हे नाव सुफीसंत करमे मौला यांच्या नावावरून पडले आहे. करमाळा गावात कमलाभवानी देवस्थान प्रेक्षणीय आहे.
टीम – पुढची मोहीम
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल