कर्नाळा किल्ला | Karnala Fort
मुंबईपासून बासष्ट किलोमीटरवर व पनवेलपासून तेरा किलोमीटरवर अंतरावर रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावालगत असलेला कर्नाळा किल्ला त्याच्या उंच अंगठ्यासारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतो. कर्नाळ्याची उंची समुद्र सपाटीपासून दीड हजार फूट आहे. प्राचीन काळी पनवेल व बोर घाटातून मुंबई व चौल बंदराकडे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचा उपयोग होत असे. चौल हे ठिकाण अलिबागच्या पुढे रेवदंडा जवळ मुरूडच्या वाटेवर आहे. तिथून येणारा माल कर्नाळयावरून त्या काळच्या पुणे, ठाणे येथील बाजारपेठेत पोहचवला जायचा.कर्नाळा हा डोंगरी किल्ला असुन समुद्रसपाटीपासून ४७० मीटर म्हणजे जवळजवळ १५०० फूट या किल्ल्याची उंची आहे.
डोंगरावर एक वरचा व एक खालचा असे दोन भाग असून वरच्या किल्ल्यांत सुमारें १२५ फूट उंचीचा पांडूचा बुरूज नांवाचा सुळका आहे. कर्नाळ्याच्या पायथ्याचजवळचे अभयारण्य हे संरक्षित प्रदेश म्हणून राखले गेल्याने किल्ल्याच्या पायथ्याशी चहूबाजूंना दाट राखीव जंगल आहे. तेथे दीडशेहून अधिक प्रजातींचे पक्षी आढळतात. किल्यादा वर जाण्याेसाठी तिकीट काढावे लागते. वाट चांगली प्रशस्त आहे. तेथून किल्ल्यावर पोचण्यास अडीच तास लागतात. वाटेत पक्षी संग्रहालय आहे. तेथून वाट सरळ गडावर चढते. किल्ल्यावर जाण्याची वाट सरळसोट उभी चढण असल्याने पटकन थकवा येतो.जेथून ही वाट गडावर चढते तो डोंगर आणि कर्नाळ्याचा डोंगर एका छोटय़ा धारेने जोडला आहे.
किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या खाली छोटे पठार आहे. येथेच गडाच्या अधिष्ठान देवीचे म्हणजेच कर्णाई मातेचे छोटे मंदिर लागते. देवीची मूर्ती काळ्या दगडात घडवलेली आहे. येथे लोखंडी शिडी चढावी लागते. गडाची माची आग्नेळय बाजूने उत्तेरेकडे पसरली आहे. कर्नाळा किल्ल्याचा माथा फारच लहान असुन तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे किल्ल्यावर पश्चिमेकडचे प्रवेशव्दार ढासळलेल्या अवस्थेत असुन त्यावच्याहवर शरभाचे आणि सिंहाचे शिल्पथ आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोर भवानी मातेचे मंदिर आहे. समोरच मोठा वाडा पूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे. वाड्याच्या समोर शंकराची पिंड आहे. समोर अंगावर येणारा पन्ना्स मीटर उंचीचा उत्तुंग सुळका आहे. सुळका चढण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र येणे आवश्यक आहे. सुळक्या्वर मधमाशांची पोळी दृष्टीतस पडतात. त्याीतील मध काढण्याककरता परिसरातील ठाकरांनी सुळक्याळच्याा दगडात पाय-या खोदलेल्याप आहेत.
सुळक्याच्या पायथ्याशी खोदलेल्या पाण्याच्या टाक्या आणि धान्य साठवण्याची तळघरे, तसेच आजूबाजूला किल्ल्याचे अवशेष दिसून येतात. ती सुळक्याचच्याय दगडात खोदलेली असून ती बाराव्याय शतकातील असावीत असा अंदाज आहे. सुळक्याच्या समोर असलेली तटबंदी अजून बरीच तग धरून आहे. सुळक्याच्या मागे गेल्यास एक छोटा डोंगर काहीसा खाली डोंगरधारेने मुख्य किल्ल्यास जोडला आहे. किल्ल्यावरील बांधकाम ब-यापैकी शाबूत असले तरी संवर्धनाची त्यास गरज आहे. गडाच्या माथ्यावर फिरताना अजून २ दरवाजे लागतात. किल्ल्या ची जडणघडण पाहता तो प्रामुख्यासने सभोवतालच्याे प्रदेशावर टेहळणी करण्यालसाठी वापरण्यालत येत असावा.
घाट आणि कोकण यामधील प्राचीन घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्यावर तीन दिशांना तीन बुरूज असमांतर ठिकाणी बांधलेले आहेत. किल्यावर वर फारसी आणि मराठी भाषेतील शिलालेख आढळतात. फारसी शिलालेखात ‘सय्यद नुरुद्दीन मुहम्मवद खान, हिजरी ११४६ (इ.स. १७३५) असे लिहिले आहे. तर मराठी शिलालेखावर ‘शके १५९२ संवत्सजर आषाढ शुद्ध १४ मालुजी गंभीरराव ठाणदार कर्नाळा घेतला’ असे वाक्य लिहिलेले आढळते. या व्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे काही नाही. किल्याभा च्याढ माथ्या४वरून पश्चिमेकडे मुंबईचे सुंदर दृश्या दिसते. पश्चिमेकडे माणिकगड आणि त्याहच्याढमागे पहुडलेली सह्याद्रीची रांग दिसते. उत्तरेकडे सांकशीचा किल्लाड तर वायव्येाकडे माथेरान पाहता येते. गड फिरण्यास साधारण एक तास लागतो.
कर्नाळा हा किल्ला प्राचीन कालखंडापासून प्रसिध्द आहे. किल्ल्यामध्ये असणाऱ्या पाण्यातच्या टाक्यांवरून तो सातवाहनकालीन असावा असे वाटते; मात्र त्याचा जुना उल्लेख यादवकाळात आढळतो. कर्नाळावर देवगिरी यादवांचे १२४८ ते १३१८ पर्यंत राज्य होते, किल्ल्याचे बांधकाम कोणी केले याचा पुरावा दिला नसला तरी देवगिरी यादवांनीच कर्नाळा बांधला असावा. पुढे सन १३१८ ते १३४७ मध्ये किल्लाव निजामशाहीच्याा अधिपत्याबखाली होता. तेव्हा कर्नाळा उत्तर कोंकण म्हणजेच ठाणे व रायगड ह्यांचे मुख्यालय होते. निजामशाहीकडून कर्नाळाचा ताबा गुजरातच्या फौजेने पोर्तुगीजांच्या साहाय्याने मिळवला. पण परत निजाम चालून आला असता गुजराती शासकाने कर्नाळा पोर्तुगीजांना बहाल केला, वसईच्या कॅप्टनने निजामाच्या सैन्याचा वेढा मोडून काढून स्वतःचा अंमल स्थापन केला आणि किल्ल्याच्या संरक्षणार्थ ३०० युरोपियन सैनिक तैनात केले. पुढे पोर्तुगीज व निजाम यांच्या मध्ये झालेल्या मैत्रीच्या तहात वार्षिक १७५० पौंड ह्या ठराविक खंडणीच्या रकमेवर पोर्तुगीजांनी हा किल्ला निजामशहाकाडे सोपविला. एवढा उहापोह पाहिल्या नंतर त्या काळात कर्नाळा किल्ल्याचे महत्व लक्षात येते.
निजामशहा कडून मग हा किल्ला मुघलांकडे होता पण ह्या बद्दल सविस्तर माहिती मिळत नाही पण छत्रपती शिवरायांनी इ.स. १६५७ मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला. त्यानंतर पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात आलेल्याद तेवीस किल्ल्यांमध्ये कर्नाळा किल्ल्याचा समावेश होता. महाराजांच्या सैन्याने सन १६७० मध्ये पनवेलजवळच्या रांगांपासून मराठ्यांनी गडाला वेढा घालायला सुरूवात केली.मातीचे व चिखलाचे अडसर तयार करून ते पुढे सरकले व तटापर्यंत पोहोचले. एकदा तटाला लागल्यावर मग माळा लावून मराठा सैन्य आत शिरले व कर्नाळा किल्ला पुन्हा सर केला आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कल्याण प्रांत काबीज केला.
मोगलांनी पुढे संभाजी महाराजांच्या काळात किल्ला पुन्हा मोगली अंमलाखाली आणला. त्यानंतर १७४० ला किल्ल्या वर पेशव्यांचे नियंत्रण आले. तेव्हा अनंतराव फडके यांना तिथे किल्लेदार म्हणून नेमण्यायत आले. अनंतराव फडके म्हणजे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा होय. १८०३ मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाच्या वतीने गडाचा ताबा घेतला व १८१८ मध्ये जनरल प्रॉथरने कर्नाळा ताब्या त घेतला. त्यांवेळेस कर्नाळ्यावर असलेल्या मोजक्या मावळ्यांनी ब्रिटिशांच्या हजाराच्या सैन्याशी तीन दिवस झुंज दिली होती. ह्याच कर्नाळाच्या बेलाग सुळक्याने तरूण वासुदेव ह्यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली आणि ह्या आद्य क्रांतीकाराला एडनच्या तुरूगाची भिंत पण थोपवू नाही. दुर्गमहर्षी गी.नी.दांडेकर यांच्या जैत रे जैत या कादंबरीला कर्नाळा किल्ल्याची पार्श्वभूमी लाभली आहे आणि याच परिसरात ‘जैत रे जैत’ या मराठी सिनेमाचे शूटिंग झालेले आहे.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.