कास पठार | भटकंती
कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारण २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे.
कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे.
कास पठाराच्या दक्षिणेला कास तलाव आहे. कास तलावाच्या भोवताली घनदाट जंगल आहे. ते सज्जनगड किल्ला आणि कण्हेर धरण यांच्यामध्ये आहे. कास तलावाच्या दक्षिणेला ३० किमी अंतरावर कोयना प्रकल्प आहे.
सज्जनगडापासून १३ किमी अंतरावर ठोसेघरचा धबधबा आहे.सह्याद्रीच्या डोंगर रांगाप्रमाणे ठोसेघरला देखील धबधब्यांच्या रांगा आहेत. त्यातील एका धबधब्याची उंची साधारणपणे २०० मीटर आहे. पावसाळ्यात पर्यटकांची इथे खूप गर्दी असते.
माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti