महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,55,061

काशीविश्वेश्वर मंदिर, पळशी, ता. पारनेर

By Discover Maharashtra Views: 1376 2 Min Read

काशीविश्वेश्वर मंदिर, पळशी, ता. पारनेर –

अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातपळशी या गावी होळकरांचे दिवाण रामाजी यादव कांबळे – पळशीकर यांचा भुईकोट किल्ला आहे. पळशी गाव हे भुईकोटातच वसले असल्यामुळे चहुबाजूंनी तटबंदीने वेढलेले हे गाव पाहणेच मुळी एक सुंदर आनंदयोग आहे. हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव-कांबळे पळशीकर यांचे. त्यांच्या मुलाने म्हणजेच आनंदराव पळशीकर याने पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे त्यांना हे गाव इनाम मिळालं. मग पळशीकरांनी येथे भुईकोट, विठ्ठल मंदिर, काशीविश्वेश्वर मंदिर व वाडा यांची उभारणी केली.(काशीविश्वेश्वर मंदिर पळशी)

किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यांनतर गावाच्या मुख्य चौकात काशीविश्वेश्वराचे एक मंदिर आहे. या मंदिराशेजारीच नागेश्वराचे एक छोटेखानी मंदिर देखील आहे. नागेश्वर मंदिरात नागशिल्पं व विष्णू-लक्ष्मी ची एक स्थानक मूर्ती आपल्याला दिसून येते. काशीविश्वेश्वर मंदिराचे दगडी काम उल्लेखनीय असून सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. स्तंभ विरहित असलेल्या मंदिराच्या सभामंडपात दोन देवकोष्ठके असून एकात भैरव तर दुसऱ्यात गणेश मूर्ती आहे. मंदिराच्या भिंतीतील खिडक्याही आकर्षक मांडणीच्या आहेत. गाभाऱ्यात सुरेख शिवपिंड आहे. मंदिराच्या मागील भिंतीवर मारुतीचे शिल्पं कोरलेले आहे. मंदिरासमोर एक भग्न वीरगळ देखील आपल्याला पहायला मिळते. कधीकाळी पळशीच्या वैभवाची साक्ष असणारे हे मंदिर आज मात्र अतिक्रमणाच्या विळख्यात हरवत चालले आहे.मंदिराच्या मागील भिंतीवर मारुतीचे शिल्पं कोरलेले आहे. मंदिरासमोर एक भग्न वीरगळ देखील आपल्याला पहायला मिळते. कधीकाळी पळशीच्या वैभवाची साक्ष असणारे हे मंदिर आज मात्र अतिक्रमणाच्या विळख्यात हरवत चालले आहे.

Rohan Gadekar

1 Comment