महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,959

कट्यार | नरसंहक | असिपुत्रिका

Views: 1364
2 Min Read

कट्यार | नरसंहक | असिपुत्रिका –

तलवार, कट्यार या सारखी शस्त्रे काळजीपूर्वक हाताळावीत. शस्त्राच्या आधाराने वैभव व विजय मिळतो. शस्त्र हा धर्माचा आधार आहे.अर्धमाने शस्त्र व विजय मिळवणे चूकीचे आहे.

रक्षांगानि गजा्न रक्ष रक्ष वाजिघनानि च ।
मम देहं सदा रक्ष कट्टारक नमोस्तु ते ।।

अर्थात…. हे कट्यारी माझ्या अवयवांचे रक्षण कर, हत्तीचे रक्षण कर , अन्नरुपी धनाचे रक्षण कर. माझ्या देहाचे नेहमी रक्षण कर.  तुला नमस्कार असो.

कट्य‍ार हे कायम कमरेच्य‍ा शेल्यात अडकवले शस्त्र . हातघाईच्या लढाईत महत्वाच शस्त्र. कट्यारीचे अनेक प्रकार आहेत. उत्तरेकडच्या व दक्षिणेच्या  कट्यारीत बराच फरक पाहायला मिळतो. अखंड व कोठेही जोड नसलेल्या कट्यारी पहायला मिळतात तर मुठ, नख व पात असे जोडकाम कट्यारी ही असतात. कधी कधी अशा कट्यारींना तुटलेल्या तलवारीचे पात जोडलेले दिसतात. पुढे धारदार टोक असलेली दुधारी कट्यार मुठी कडे रुंद होत  जाते. कट्यारींचा उपयोग चिलखत फाडण्यासाठी खास होत असे. ज्या कट्यारीचा पुढचा मणी जेवढा मजबूत तेवढी कट्यार मजबूत .

शिवपुर्वकाळातील विजयनगर कट्यारी मुठीच्या वरच्या बाजूला ‌बोटांना संरक्षण मिळावे म्हणून वर पत्र्याचे कवच असते. या कट्यारी दिसायला साध्या असतात पण तंजावरला या १८व्या शतकानंतर या कट्यारींवर कोरीवकाम व सोन्या चांदीच काम केलेल दिसत.

कट्यारी हे एकमेकांना मानाने भेट दिल्या जायच्या. लहान मुले व स्त्रियाही कट्यारी जवळ बाळगीत असत. आनेक लग्नकार्यात नवरदेवच्या हातात ह्या कट्यारी  आपल अस्तित्व टिकवून आहे. अनेक दक्षिणेकडील मंदिरांच्या शिल्पांवर माणसांजवळ कट्यारी कोरलेल्या दिसतात.

The katar is of Rajput origin but its use was widespread. Rajput and mughal miniature painting of the period bear testimony to this fact. the tanjore Armoury once had a superb collection of katars, but since its dismanting in tha late period.

संतोष चंदने,  चिंचवड.

Leave a Comment