महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,196

काठापुर वाडा

By Discover Maharashtra Views: 1449 3 Min Read

काठापुर वाडा –

मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी  होळकर शाहीने कंबर कसली होती.त्यावेळी होळकर लष्कर हे एक बलाढ्य लष्कर म्हणून ओळखले जात होते.मराठा साम्राज्य अखंड हिंदुस्थानात विस्तार  करण्यात होळकर घराण्याचे मुळ पुरूष मराठा राज्य विस्तारक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा प्रचंड दरारा व दहशत होती. याच होळकरांच्या अंमलाखाली महाराष्ट्रात अनेक सरदार घराण्यांनी रणमैदान गाजवले.महाराष्ट्रातच नाही तर पानिपतच्या युद्धात देखील तेवढेच महत्त्वाचे ठरलेले घराणे म्हणजेच राजे वाघ घराणे होय .या घराण्यातील कर्तृत्ववान व महापराक्रमी घराण्याचा चपळ सरदार म्हणून संताजी वाघ यांच्या घराण्याकडे पाहिले जाते.काठापुर वाडा.

राजे वाघ यांचे मुळ घराणे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे  या घराण्याचे मुळ पुरुष  म्हणजे  इतिहासातील प्रसिद्ध योद्धे महाबलाढ्य अशा होळकरांच्या लष्कराचे सेनापती होळकरांच्या चपळ घोडदळ व  कडवट अश्या सेनेचे नेतृत्व करणारे प्रसिद्ध  म्हणून  ज्याचे नाव पुढे येते ते सेनापती संताजीराजे वाघ संताजी वाघ यांचा पराक्रम व कर्तुत्व  पाहुन होळकरांनी त्यांना महितपुर उतरण बेटमा या प्रदेशाची जहागीर दिली होती .महितपुर या जहागीरीच्या प्रदेशात  संताजी वाघ यांनी प्रसिध्द अशी तालाकुंजी बारव बांधली तसेच होळकरांनी महितपुचा किल्ला देखील त्यांना इनाम म्हणून दिला होता.ह्या किल्याची बांधणी होळकरांनी केली होता.संताजीना प्रजा राजे म्हणुनच ओळखत असे पुढे वाघच राजेवाघ झाले.

ज्यावेळी मराठा व अब्दाली यांच्यात पानिपतच युद्ध झालं तेव्हा या युद्धात संताजी राजे वाघ सुद्धा  होते.या युध्दाच्या वेळी मल्हारबांच्या आदेशाने भाऊच्या मदतीला संताजीराजे गेले होते.संताजीराजे वाघ हे शेवटच्या मराठा पथकाचे सरदार होते..भाऊंना पानिपतच्या युद्धातुन सुखरूप बाहेर काढण्यासाठी संताजीराजे यांना खास पाठवले  होते.पण काळाच्या मनात वेगळेच होते दुदैवाने त्यात त्यांना यश आले नाही .या युद्धात ५५पेक्षा जास्त जखमा घेऊन संताजी राजे धारातीर्थी पडले..विशेष म्हणजे संताजीराजे यांचे प्रेत भाऊच्या जवळच आढळले .संताजीचे प्रेत पाहुन अब्दालाही गहिरवला होता .पनिपतचे जे सांकेतिक भाषेतील पत्र होते त्यात २ मोती २८ मोहरा गळल्या त्यातील एक मोहर म्हणजे संताजीराजे वाघ . या पनिपतच्या बलिदानानंतर मल्हारबांनी त्यांच्या मुलीचा म्हणजेच प्रिताबाई वाघ यांचा विवाह त्यांचे नातु मालेराव होळकर यांच्या सोबत लावुन दिला.त्यानंतर राजेवाघ व होळकर  घराण्याचे  संबंध सुरु झाले.

त्याच्या नंतर वाघ घराण्याला होळकरांनी पेशव्यांकडुन मौजे काठापुर बुद्रुक अवसारे प्रांत जुन्नरची जहागीरी मिळवुन दिली तसेच पेशवे च्या दरबारात ४८०रु चे मंदिल पोशाख देऊन सन्मान दिला.

होळकरांनी पुढे जाऊन वाघ घराण्यातील सरदार तुळसाजी वाघ यांना २६६८६७ रु  तर सरदार मधवराव वाघ यांना २९६१६ रु असा वार्षिक उत्पादन असलेला प्रदेश देऊ केला. मल्हारबांनंतर तुकोजीच्या नेतृत्वाखाली टिपु  सुलतानवर च्या स्वारीत पण सरदार वाघ घराणे होते. ती मोहिमेत यशस्वी पार पाडली म्हणून पेशव्यांनी  वाघ चवघरण्यातील सदस्याचा सोन्याचे कडे देऊन दरबारात सत्कार केला होता.तसेच खरड्याच्या लढाईत पण वाघ घराण्याची कामगिरी मोलाची ठरली होती.आज पण मध्यप्रदेशात वाघ घराण्याला राजेवाघ म्हणूनच ओळखले जाते.त्याचे सध्याचे वंशज बेटमा या जहागीरीच्या प्रदेशा मध्ये राहत आहे.याच मध्येप्रदेशातील महितपुरचा किल्ल्या बरोबर महाराष्ट्रातील काठापुर या ठिकाणी वाघ घरण्याचा भव्यदिव्य असा वाडा व वाघ घराण्यातील समाध्या पण दुर्लक्षित आहेत.जर या वैभवाकडे आणखी दुर्लक्ष केले तर काळाच्या ओघात ते सारे वैभव नष्ट होईल.

Nitin Kemse

Leave a Comment