महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,67,763

खांदेरीचा रणसंग्राम भाग १०

By Discover Maharashtra Views: 3750 4 Min Read

खांदेरीचा रणसंग्राम भाग १०

खांदेरीचा रणसंग्राम भाग १० – मराठे मुंबईवर हल्ला करणार हि बातमी ऐकून इंग्रज अस्वस्थ झालेले होते. सोबतच मुंबईत युद्धाला तोंड द्यायचे झाल्यास आवश्यक असलेले सैन्य हि नव्हते. त्यामुळे मुंबईकरांचा दोन्ही बाजूने त्रास वाढत चालला होता अशातच मुंबईकर केजवीन ला लिहितात.

२२ ऑक्टोबर ला मुंबईकर केजवीन ला लिहितात :

मुंबईवर चढाई करून येण्याकरिता बरेचसे सैन्य शहाबादला येऊन राहिले आहे. मुंबई बेटाचा बंदोबस्त करावयाचा तर तुम्ही २ शिबाड पाठवावी असा आमचा विचार आहे. परंतु ते शक्य नसल्यास प्रसंग पडताच आम्ही बेटावर तोफ डागण्यास हुकूम देऊ. त्यावेळी मात्र त्या पाहताच किंवा ऐकताच तुम्ही मदतीची आवश्यकता समजून सर्व गलबत घेऊन बेटाकडे यावं.

मुंबईत बंदुकीच्या दारूची ५३२ पिंपे होती. त्यापैकी ३०० पिंपे विकून टाकावी आणि विक्रीतून जी रक्कम मिळेल ती सुरतेला पाठवायची सूचना कंपनीने दिली होती. पण शिवाजी महाराजांनी बेटावर हल्ला करण्याची केलेली तयारी हे बघता तो निर्णय स्थगित करण्यात आला.

Wee can’t spare any Shibarrs , but rather shall want more boates for the prevention of recruits to the Island. Last night wee laid Waite with our boates with all the care we could contrive with safety to the fleete, yet last night , in the darke, they went into the Island with twelve galvetts. Our endeavours to prevent reliefe shall not be wanting. But to promise there shall be none wee cannot, therefore leave it to your considerations. Our Manchuas fought them an houre and report to me they killed them severall men ; they had a great many foote and horse there. Night coming on they were forced to leave the boate behind them.
There came from the southward yesterday 37 boates, that is Galvetts, and went into Nagoun river.

रिवेंज चा कॅप्टन मुंबईला लिहितो, ‘आपल्या पत्राप्रमाणे आम्ही शिबाड देऊ शकत नाही. परंतु आम्हालाच काही लहान होड्या मिळाल्या तर हव्या आहेत. आम्ही इतकी काळजी घेऊनही गेल्या रात्री १२ गलबते मराठे बेटावर घेऊन. गेले. एक होडी परत जाताना दिसली तिचा लगेच एका मचव्याने पाठलाग करून किनाऱ्यापर्यंत जाऊन तेथे चकमक करून शत्रूचे बरेच लोक मारले. काल दक्षिणेकडून ३७ गलबते किंवा होड्या येऊन नायगावच्या नदीत शिरल्या.’

इकडे सुरतकरहि या खांदेरी प्रकरणावरून मुंबईकरांना सतत दोष देत होते. खांदेरी साठी मर्यादेपेक्षा जास्त खर्च होत होता. आणि हे इंग्रजांना फक्त नुकसानकारकच वाटत होते. सुरतकर हे युद्ध किती दिवसात संपेल याबद्दल आपला अंदाज काय अशी विचारणा सतत मुंबईकर इंग्रजांकडे करत होते.

खांदेरी बेटावर मराठ्यांच्या ज्या होड्या गेल्या होत्या त्यांना रिव्हेंज चा कॅप्टन माघारी जाऊ देत नव्हता. रात्रीचा प्रयत्न ही मराठ्यांनी करून पाहिला पण त्यांनी मराठ्यांच्या होड्यांना जाऊ दिले नाही. तिकडे सुरतेला झालेल्या सभेत इंग्रज म्हणतात, ‘आमचे थोडेच लोक जरी जखमी होत असले तरी आमचे अल्प मनुष्यबळ लक्षात घेता आम्ही फार वेळ शिवाजी महाराजांशी टक्कर देऊ शकू असे वाटत नाही. शिवाय चिडून जाऊन शिवाजीने मुंबई बेटावरच सैन्य उतरवले तर आम्हाला स्वतःचे संरक्षण करता येईल कि नाही याची शंकाच आहे. पाऊस चालू होताच आमची गलबत माघारी बोलवावी लागतील. यासर्वांचा विचार करता मुंबईकरांनी सामोपचाराने बोलणी करण्याचा विचार करावा. परंतु यातही जर अडचण असेल तर वसईच्या पौर्तुगिज कॅप्टन जनरल कडे मदतीची विनंती करावी. जर येही शक्य नाही झाले तर सुरतेहुन लवकरच सिद्धीचे आरमार निघणार आहे. त्याचा उपयोग करून घेता येईल का याचा विचार करावा. त्याला पुढे करून आपण माघार घ्यावी याचा फायदा आपल्यालाच होईल आणि कंपनी चा खर्च हि वाचेल.’

क्रमशः – खांदेरीचा रणसंग्राम भाग १०

संदर्भग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English Records
छत्रपती शिवाजी महाराज ( उत्तरार्ध )

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

Leave a Comment