महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,67,789

खांदेरीचा रणसंग्राम भाग ११

By Discover Maharashtra Views: 3734 5 Min Read

खांदेरीचा रणसंग्राम भाग ११

खांदेरीचा रणसंग्राम भाग ११ – खांदेरी च प्रकरण इंग्रजांना वाटत होते तितके सोपे नव्हते. मराठ्यांची खांदेरीवर होणारी वाहतूक रोखण्यासाठी दिवसरात्र इंग्रजांचे प्रयत्न सुरु होते. बऱ्याच वेळा मराठ्यांच्या चपळ होड्यांना पकडण्यासाठी सापळा रचण्याची तयारी कॅप्टन केजवीन ने केलीहि पण त्यात त्याला हवे तसे यश मिळत नव्हतेच. सोबतच नागावच्या खाडीची नाकेबंदी करून खांदेरीचा पुरवठा थांबवणे शक्य नव्हते हे केजवीन ला कळून चुकले होते. मराठे किनाऱ्यावरील इतर ठिकाणाहून खांदेरीला कुमक आणि रसद पाठवत होतेच.

२५ ऑक्टोबर ला मुंबईकरांचे कॅप्टन केजवीनला पत्र येते त्यात ते लिहितात…

Which surprise you must always be carefull of , although according to newes we have from our spies, wee have noe reason to beleive the enemies fleete will ever come against ours, for they were soundly banged, lost aboute 600 men and now are useing their ideavours to get men on board their Vessells to fly for Rajapore for their security. Wee are not willing they should leave Naugaum River, because according to the accountt we have of it it’s a fitt place to doe sudden execution on them without any danger , aboute which we shall consult. In the mean have an eye to Naugaun Rivers mouth, that if they should goe out they may not goe without sallute from your Gunns.
Wee have newes just now brought us that in Naugaun River is 9 groabs laden with rice fallen downe neere the rivers mouth ; without them lyes 12 groabs but ill manned to guard them for fear of our fleete, and that there is not in the river besides them aboute 7 or 8 galvetts; ..

आपण नेहमी सावध असणे आवश्यक आहे. आपल्यावर शत्रुकडून हल्ला होण्याची शक्यता आहे असे आम्हाला आमच्या हेरांकडून समजले आहे. परंतु शत्रू असे धाडस करील असे सध्या तरी वाटत नाही. कारण त्यांना परवा चांगलाच धक्का बसला आहे. शत्रूने त्यांची ६०० माणसे गमावली आहेत. आणि आता ते आपले लोक सुरक्षितेकरिता राजापुरास पाठवण्याच्या विचारात आहेत. त्यांनी आता नागावची खाडी सोडावी हे आपल्या सोईचे नाही. स्वतःला धोक्यात घातल्याशिवाय शत्रूवर कारवाई करण्यास ती जागा फारच सोईची आहे. तुम्ही शत्रूला नागाव मधुन बाहेर पडू देऊ नका. नागाववर लक्ष द्या मराठे बाहेर जाऊ लागलेच तर तुम्ही तोफांची सलामी दिल्याशिवाय त्यांना सोडू नका.
आम्हाला अशी बातमी मिळाली आहे की तांदळाने भरलेल्या ९ गुराबा नागाव नदीच्या मुखाशी उभ्या आहेत. त्याशिवाय १२ अजुन गुराबा आहे ज्यावर काही प्रमाणात लोक आहेत. आणि नदीत ७ ते ८ गॅल्व्हट्स हि आहेत.

दिवसेंदिवस खांदेरीचा व्याप इंग्रजांची डोकेदुखी वाढवत होता. इकडे मराठ्यांचे खांदेरीवरील बांधकाम काही थांबले नाही. शिवाजी महाराजांनी खांदेरीवर विशेष लक्ष दिले होते. कारण खांदेरी जर हातात आल तर मुंबईवर लक्ष ठेवणे अधिक सोयीचे होणार होते. याच भीतीपोटी इंग्रज खांदेरी घेण्याचा हट्ट धरून बसले होते. शिवाजी महाराजांनी या परदेशीय लोकांचे धोरण अचूक ओळखले होते. हे व्यापाराच्या उद्देशाने जरी आले असले तरी इथल्या जमिनीवर हक्क गाजवण्याची त्यांची इच्छाशक्ती महाराज जाणुन होते.

खांदेरीचा लढा मराठ्यांसाठी महत्वाचा होताच. सोबतच मराठ्यांच्या आरमाराची ताकद हि शत्रूला दाखवून देण्यास हि लढाई उपयुक्त ठरली. मराठ्यांच्या जहाजांना नाव ठेवणारे इंग्रज नंतर नंतर मराठ्यांना घाबरून होते हे नाकारता येत नाही. मराठा नौदलाची वेगवान लढाई आणि अचूक रणनीती हि मराठ्यांना विजयाकडे घेऊन जाण्यास जास्त महत्वाची ठरत होती. इंग्रज सभोवतालच्या उथळ पाण्यात द्रुत हालचाली करण्यास असमर्थ ठरत होते. इंग्रजांचा तोफखाना मराठ्यांच्या तुलनेत श्रेष्ठ होता. तरीही आता सुरतेत कसंही करून तह होण्यासाठी मुंबईवर दबाव वाढत होता. आणि मुंबईत इंग्रजांना खांदेरी वरून कसंही करून मराठ्यांना हाकलवून लावायचे होते. कारण मुंबईत टिकायचे असेल तर समोर खांदेरी वरचे मराठे त्यांना कधीही डोकेदुखी ठरले असते. त्यामुळेच वारंवार आपण शत्रूच्या नुकसानीचे मोठे मोठे आकडे ते सुरतेला पाठवत होते. त्यावर विश्वास किती ठेवावा हा मोठाच प्रश्न. तरी सुरतेत आता हे प्रकरण न वाढवता त्यावर तोडगा काढावा ह्यावर एकमत होत होतं.

क्रमशः – खांदेरीचा रणसंग्राम भाग ११

संदर्भग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English Records
छत्रपती शिवाजी महाराज ( उत्तरार्ध )

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

Leave a Comment