महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,45,573

खांदेरीचा रणसंग्राम भाग १८

By Discover Maharashtra Views: 3819 4 Min Read

खांदेरीचा रणसंग्राम भाग १८

खांदेरीचा रणसंग्राम भाग १८ – RTCHARD KeigWIN TO mumbai, 22nd November 1679.
Last night there came a boate into the Island and escapt us all; the great manchuachased and fired twice at her, but going in with the land lostsight of her.

२१ नोव्हेंबरला बेटावर सफेद झेंडा उभारून किनाऱ्यावरील लोकांना सांकेतिक खून करण्यात आली होती. चौलला असलेल्या मराठी सैन्यानेसुद्धा ते निशाण बघितलं. त्या पांढऱ्या निशाणाला सिद्दी व इंग्रज जरी शरणागती समजत असले तरी त्याचा जो अर्थ मराठ्यांना लागायचा तो लागला. आणि सर्वांना चुकवत रात्री किनाऱ्यावरून खांदेरीवर एक मचवा पाठवण्यात आला. इंग्रजांनी त्याचे मचवे पाठवत पाठलाग केला काही तोफा सुद्धा डागल्या पण त्याचा उपयोग झाला नाही. तो मचवा निसटून जाण्यात यशस्वी झाला. सिद्दी न थांबता बेटावर तोफा डागत होता खरा पण त्याचा उपयोग शून्य होता. त्यांनी कोणतेही नुकसान मराठ्यांना झालं नाही. इंग्रज बेटावर तोफा डागत नाही ह्याचा सिद्दीला आश्चर्य वाटे. सिद्दी पेक्षा इंग्रज बेटाच्या जवळ नांगर टाकून होते. पण मराठे व इंग्रजात असे द्वंद्व होत नव्हते. केंग्विन ने सिद्दीला अश्या तोफेचा मारा करून खांदेरीवरची किती लोक मारलीत असे विचारले त्यात सिद्दीचे उत्तर शून्य असे होते.

महाराज तहाची बोलणी कधीही सुरू करतील अशी मुंबईकडे आशा होती. तोवर सिद्दीला मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याविषयी केंग्विनला सांगण्यात आले. सिद्दीला भेटण्यास कोणी गेलेलंच तरी कोणीतरी एकानेच जावे. दौलतखानाच्या सेवेत असलेल्या एका सैनिकाला पकडण्यात सिद्दीला यश आले होते. आणि मराठ्यांच्या हालचालींची बरीच माहिती त्याला ह्याकडून भेटली होती. त्या व्यक्तीने काही सैनिकांसह खांदेरी बेट काबीज करता येऊ शकत असे म्हंटले होते आणि ह्याबद्दल शिक्षा होईल ह्या भीतीने पळ काढला होता. दौलतखानाने तांदूळ, लोणी, तेल, पाणी व बाकी साहित्याने भरलेल्या ८ बोटी नागावच्या खाडीत उभ्या ठेवल्या आहेत. त्या खांदेरीवर पोहचण्यासाठी दौलतखानाने युद्धनीती बनवली होती. तो आरमारासकट बाहेर येऊन शत्रूच्या आरमाराचे लक्ष वेधून घेईल. त्याचा फायदा ह्या बोटींना होऊन त्या बेटावर पोहचतील. सिद्दीने त्यावर शक्कल लढवत आपण ह्या बोटींना जाऊ देऊ, आणि ह्या बोटींचा पाठलाग करण्याचा बहाण्याने बेटावर उतरून बेट ताब्यात घेऊ असे केंग्विनला कळवले.

बेटावर असलेल्या परिस्थिती चीही त्या व्यक्तीने काही कल्पना दिली. बेटावर चार विहिरी आहेत. पण त्यांनी आता तळ गाठला आहे. पाणी भरण्यासाठी हाताची ओंजळ करावी लागत होती. तसेच बेटावर ६ खंडी दारू, १००० तोफगोळे, १२ मोठ्या तोफा, ५६० शिपाई, २०० बंदूक व ३०० तलवार वाले होते. तांदूळ व मीठ सोडले तर खाण्यास बेटावर काहीच नव्हते. अश्या अवस्थेत बेटावरील लोकांमध्येच बेटावरील लोकांमध्ये बंड होईल असे केंग्विन ला वाटतं होते. पण तहाची बोलणी होण्याआधी सिद्दीने ह्यात आघाडी मारल्यास बेट त्याचा ताब्यात जाईल. त्यासाठी तो सुरतेवरून मदत येण्याची वाट बघत होता. २६ नोव्हेंबरला एक गलबत त्याला येऊन मिळाले सुद्धा होते. त्यामुळे सिद्दी सर्व बळकावून बसण्याची केंग्विनला भीती होती. म्हणून जे काही करायचं ते लवकरच करावं म्हणून तो मुंबईला विनवणी करत होता. आपणच आघाडी घेऊन ह्या प्रकरणाचा निकाल लावला असा तो विचार करत होता.

RTCHARD KeigWIN TO mumbai, 26th November 1679.
That they had hut 6 Gandy ofpowder and 1000 balls, except what they found in our groab andshibarr ; that they have 12 great gunns ; they have 560 men, twohundred fire armes and 300 sword men.

आता सिद्दीने बेत व किनारा ह्याचा मधल्या भागात काही स्वतंत्र हालचाल सुरू केली होती. त्याचा इंग्रजांनाही पत्ता नव्हता. तो किव्हा त्याचा नौकेदार इंग्रज आरमाराकडे फिरवले नव्हते. पण ह्याही काळात बेटावर काम अवितरत सुरू होते. त्यात कसलाच खंड नव्हता पडला.

आता घडामोडी वेग घेत जात होत्या. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न तिन्ही पक्ष करत होते. इंग्रज सिद्दी बेट बळकावेल म्हणून चिंतेत होते. सिद्दीला मराठ्यांना बेटावरून कसेही करून हकलावुन लावायचे होते. पण मराठे मात्र सगळ्यांकडे दुर्लक्ष करून बेटावर किल्ला बांधायचे काम करतच जात होते.

क्रमशः – खांदेरीचा रणसंग्राम भाग १८

संदर्भ ग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English record

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

Leave a Comment