महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,078

खांदेरीचा रणसंग्राम भाग १९

By Discover Maharashtra Views: 3813 5 Min Read

खांदेरीचा रणसंग्राम भाग १९

खांदेरीचा रणसंग्राम भाग १९ – एव्हाना इंग्रज व मराठ्यांमध्ये तहाची बोलणी सुरू झालेली. १७ नोव्हेंबरला पेशव्यांकडून मुंबईला पत्र आले होते. इंग्रजांनी त्याच दिवशी त्या पत्राला उत्तर लिहून पाठवले. त्यात त्यांनी सिद्दी वारंवार खांदेरीवर करत असलेल्या माऱ्याची बातमी दिली. आणि ह्याने जर खांदेरीवर ताबा घेतल्यास तुमच्या देशावर हालअपेष्टा ओढावतील. ह्या नुकसानीपासून वाचायचे असेल तर आपण (पेशव्याने) आदेश देऊन खांदेरी बेट आपल्या ताब्यात देण्यास सांगावे. जर राजांना हा बेत नाही आवडला तर सिद्दी निघून गेल्यावर आपण तिथून सैन्य काढून घेऊ व ते बेट पूर्वीप्रमाणे निर्जन राहील. पेशव्यांकडून सकारात्मक प्रतिसाद येईल ह्या आशेवर मुंबईत इंग्रज होते. म्हणून २३ नोव्हेंबरला आलेले बंगाल मर्चट हे जहाज मुंबईत थांबवून घेतलं. पण इंग्रजांचा अपेक्षाभंग झाला.

पेशव्यांनी खांदेरी सोडण्यास साफ नकार दिला होता. त्यांनी पुन्हा पेशव्यांना पत्र लिहलच. सोबत महाराजांनाही पत्र लिहुन पाठवलं. नाकेबंदी सुरू ठेवण्याकरता पैशाची गरज होती तशी मागणी मुंबईकडून सुरतेत करण्यात आली होती. खांदेरी प्रकरणामुळे नेहमीपेक्षा ५००० झेराफिन्स (त्यावेळी सुरतेत वापरलं जाणारं चलन) जास्त खर्च होत होते. तितकं मुंबई बेटाचे उत्पन्न सुद्धा नव्हते. त्यामुळे युद्धविराम झाला तर हा खर्च तरी वाचेल हा त्याचा प्रयत्न होता.

इंग्रज बेटावर तोफांचा मारा करत नाहीत वा त्याला मराठी मुलुख उध्वस्त करू देत नाहीत म्हणून सिद्दीला राग होता. पण स्वतः इंग्रजांनी हल्ले केले की सिद्दीला तसे करायला सांगितले तरीही नुकसान आपलंच असेल हे इंग्रज जाणून होते. कारण मराठ्यांचा मुलखातून गरजेच्या वस्तू इंग्रजांना मिळत आल्या होत्या. आता केलेली चूक त्यांना भविष्यात महाग पडू शकली होती. शत्रू समर्थ असल्याची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्यामुळे त्यांना आता दोनच मार्ग दिसत होते एक तर शिवाजी महाराजांशी तहाची यशस्वी बोलणी करणे.

किव्हा दुसरे मराठ्यांना हुसकायला सिद्दीची पूर्ण मदत घेणे. त्यातही पहिला पर्याय इंग्रजांना जास्त योग्य वाटत होतो. त्यात ते झालेल्या खर्चाची मागणी करू शकत होते. त्याविषयी अधिक माहिती येणाऱ्या भागांमध्ये दिली जाईलच. पण तह होईपर्यंत काहीही करणे इंग्रज आरमाराला शक्य नव्हते. म्हणून इथे आळसात पडून राहून शत्रूकडून हसे करून घेण्यापेक्षा आरमार मागे बोलावून घेण्याची संमती मुंबईकडून सुरतेकडे मागितली जात होती.

ह्या सगळ्या प्रकरणावर निर्णय अधिक निश्चित करण्याकरता म्हणून कॅप्टन जॉन गोल्डबरो आणि कॅप्टन जॉन डॅनिएल यांना बोलवून घेतले. त्याना ह्या प्रकरणात इंग्रजांची परिस्थिती व त्यांच्यावर असलेली बंधने ह्याची माहिती देण्यात आली. त्यावर त्यांनीही आपण आपली माणसे धोक्यात घालणं योग्य नसल्याचे म्हंटले. आणि इतक्या पुढे आल्यावर लगेच माघार घेणे सुद्धा शक्य नव्हते. वाटाघाटीतुन काहीच निष्पन्न झालेच नाही तर मात्र काही कारणाने ह्यातून अंग काढून घेऊन सिद्दीला खांदेरीसाठी भांडत बसू द्यावे इथवर सुरतेत विचार केला गेला.

सिद्दी आता त्याचा कुटील डाव खेळू लागला. त्याने आता किनारपट्टी जवळील गावांची जाळपोळ व तिथल्या लोकांना बंदी करायला सुरुवात केली. केंग्विनला सिद्दीच्या जहाजावर असे काही कैदी असल्याचे दिसले. त्याने त्याची चौकशी केली असता ते नागावच्या परिसरातील आहेत ते कळलं. ही घटना ३ डिसेंबर ला घडली. त्याच वेळी सिद्दीने केंग्विन ला आपण आपली ७०० माणसे तयार ठेवल्याचे सांगितले.

सिद्दी आल्यापासून नाकेबंदी तोडणं अवघड झालेलं. नागावच्या खाडीत बोटी उभ्या होत्या. पण त्या खांदेरी नेयच्या कश्या हा प्रश्न होता. त्यावर दर वेळी मराठे काहींना काही उपाय शोधत. ह्या वेळी ही एक धाडसी प्रयत्न मराठ्यांच्या बाजूने झाला. नागावच्या खाडीतून बोटी निघाल्या. सिद्दी व इंग्रज दोघांचे मचवे खांदेरीचा आजूबाजूस फेरफटका मारत. मराठ्यांनाच्या गुप्तहेर खात्याने कमालीचं काम केलं होतं. आणि सिद्दी आणि इंग्रज ह्या दोघांची पूर्ण माहिती मराठ्यांकडे आधीपासून होती. दोन मचवे नागावातून बाहेर पडले. काही मावळे आणि एखादा सरदार असेल बोटींवर. पण वेष त्यांनी साधारण कोळ्यांचा केला असावा. त्यावर बरंच गरजेचं समान लादलं होत. ह्यावेळी जहाज लपवत न नेता त्यांनी जवळ सिद्दीच्या ताफ्याचा दिशेने घेतलं. आणि एकाएकी त्यांनी आपली मचवे त्यांचा जहाजांना चिटकवले.

सिद्दीच्या हसमांनी आवाज दिला. चौकशी करायची म्हणून कोण कुठले विचारणा झाली. त्यावर कोळ्यांच्या वेशातल्या सरदाराने पुढे येऊन आपण इंग्रज कप्तानाच्या हाताखाली असल्याचं सांगितलं. इतकंच नाही एका जहाजचं नाव, जहाजाच्या कप्तानाचे अगदी पायलेटच देखील नाव वैगरे त्यानी बिनचूक सांगितलं. माहिती योग्य आहे म्हंटल्यावर त्या दोन्ही जहाजांना थांबवण्यात अर्थ नव्हता. त्या दोन्ही जहाजांना सिद्दीने सोडून दिल. तिथून निघाल्यावर दोन्ही मचवे निघाले ते थांबले सरळ खांदेरीचा धक्क्यावर. अगदी सिद्दीच्या हातावर तुरी देण्यात आली होती. आणि सिद्दीकडूनच ही गोष्ट केंग्विन ला कळाली.

RICHARD KeIGWIN TO Mumbai
( EXTRACT ) 3 dec,1679
Two boates made their escape from the Island, coming up with the Siddy’s galvetts, which haild them; the Sevagy boates aid ‘they belonged to such a ahipp, naming the ships name, Captain and Pilots, by which stratagem they gott leave to passe.

धन्य तो राजा आणि धन्य ते त्याचे वीर…….

क्रमशः

स्वराज्याचे वैभव

संदर्भ ग्रंथ : शिव छत्रपतींचे आरमार
English record

खांदेरीचा रणसंग्राम भाग १८

खांदेरीचा रणसंग्राम, पूर्वार्ध

Leave a Comment