महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,661

खांदेरीचा रणसंग्राम भाग २०

Views: 3808
4 Min Read

खांदेरीचा रणसंग्राम भाग २०

खांदेरीचा रणसंग्राम भाग २० – Siddi to Capt. Kegwin
all peoples ey[e]s were upon us, the French, Dutch and Portugueze and the Moors(muslim) upon him, and to quitt or lye long before this place it would be a shame to us.

सिद्दी कॅप्टन केंग्विन ला.
सर्व लोकांचे लक्ष आपल्याकडे आहे. फ़्रेंच, डच आणि पोर्तुगीज यांचे इंग्रजांकडे आणि मुसलमानांच आमच्याकडे. जर ही जागा आपण सोडली किंव्हा इथे जास्त वेळ पडून राहिलो तर ती आपल्यासाठी शरमेची गोष्ट असेल.

शिवाजी महाराजांनी लिहलेले एक पत्र मुंबईला दौलतखानाने पाठवले होते. सोबतीला दौलतखानाने त्याचे सुद्धा पत्र पाठवले होते. शिवाजी महाराजांचे पत्र सौजन्यपूर्ण पूर्ण होते. पण खांदेरीवर दुर्ग उभारण्याचे कार्य हे सुरूच राहील हे इंग्रजांना बजावले होते. तर दौलतखानाने सिद्दी करत असलेल्या जळपोळीला इंग्रजांचा पाठिंबा असल्याचा आरोप केला होता. इंग्रजांनी सुद्धा हा वाद लवकरच मिटवा म्हणून दोघांनाही पत्र लिहून पाठवली.

त्यातच सुरतेत अजून एक चिंतेचा विषय निर्माण झाला. शिवाजी महाराज सुरतेवर पुन्हा स्वारी करणार अश्या प्रकारची हवा उठू लागली होती. धरणगाव, चोपडा ही गाव मराठ्यांनी लुटल्याची बातमी होती. मराठ्यांचा जोरदार तडाका ह्या भागाला बसला होता. दैवाने इंग्रजांची बखर वाचली. पण त्यांची परिस्थिती बिकट होती. तिथले मोघल फौजदार परागंदा झाले होते. खांदेरी प्रकरणामुळे आधीच शिवाजी महाराज आपल्यावर रागावले असणार त्यात हल्ला झालाच तर खांदेरीच्या घडामोडी मुळे पुरसे सेन्य देखील पदरी नाही. त्यामुळे पुरेसे पाहरे व हेर यांची तजवीज इंग्रज करून होते.

काहीच शक्य नसेल तर तिथून पळून जाण्याची तजवीज सुद्धा झाली होती. पण मराठी फौज सुरतेत न घुसता बुऱ्हाणपूराच्या दिशेने गेल्या. इथे मुंबईला पत्र पाठवून हे बेट आपण स्वतःसाठी घेत नसून हे बेट मराठ्यांच्या हातात न जावे हीच आपली इच्छा आहे हे सिद्दी सांगत होता. पण इंग्रज महाराजांच्या पत्राची वाट बघत होते.

Wee have certaine newes from Naugaune that Dowlett Ckaune is fitting his fieete to put to sea, but whither he intends cannot learne ;

इथं नागावच्या खाडीत दौलतखानाच्या तयारी सुरू होती. तो नक्की मुंबईवर हल्ला करेल की नाकेबंदी पथकावर पडेल ह्याचा अंदाज मुंबईतील इंग्रजांना येत नव्हता. दोन ते तीन दिवस बाहेर राहूंन रात्रीच्या वेळेस माहीम किव्हा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी येण्याचा त्याचा बेत आहे पण हे खरे वाटत नाही अस केंग्विन कळवतो. तरी नाकेबंदी पथकापैकी हंटर व एक मचवा नागावच्या खाडीत पहारा देण्याकरता पाठवावे व सकाळी मराठ्यांचे आरमार खाडीत आहे हे बघून नाकेबंदी पथकास सामील व्हावे. व मराठ्यांचे आरमार बाहेर येत असल्याचे दिसतात इशारतीच्या तोफा उडव्याव्यात आणि त्यांच्या आरमारास नष्ट करावे. जर तिथून निसटून तो मुंबईला आलाच तर खून दिल्याबरोबर सर्वांनी येउन त्याचे आरमार बुडवावे.

ह्यात सर्वांनी ह्याचा अर्थ कदाचित सिद्दीला सुद्धा घेऊन यावे हाही असावा.पहिल्या झालेल्या दोन्ही चकमकीत इंग्रजांना मार खावा लागला होता. त्यात पकडले गेलेले इंग्रज सागरगडावर कैदी म्हणून ठेवले गेले होते. आणि त्यांना सोडवून आणायचे म्हणजे मराठ्यांच्याकडील लोक आपल्या ताब्यात असावी असं इंग्रजांना वाटत होतं. तसाच त्यांचा प्रयत्न ही होता. अजूनपर्यंत मराठ्यांना कैद करण्यात इंग्रजांना यश मिळालं नव्हतं. १० डिसेंबर च्या पत्रात अजून एक गोष्ट इंग्रजांनीच अधोरेखित केली. मुंबईतून केंग्विन ला लिहून पाठवले आहे की दर दोन तीन दिवसांनी नाकेबंदी तोडून मराठी जहाज खांदेरीला रसद पुरवतात ही बाब सिद्दीला ही सांगा.

आता ह्या प्रकरणात इंग्रज, सिद्दी व मराठे बरेच पुठे आले होते. आता घडणाऱ्या घडामोडी वर इतर राज्यकर्ते लक्ष ठेवून होते. ही घटनाच मुळी विलक्षण होती. त्यांचे कर्ताझ(व्यापारी जहाजाना घ्यावा लागणारा परवाना जो पोर्तुगीज व इंग्रज देत) घेऊन समुद्रात प्रवेश करावा लागे अश्या दर्यावर्दी सत्तेशी इथली एतद्देशीय सत्ता यशस्वी झुंज देत होती. नाकेबंदी सुद्धा मराठ्यांची जहाजे थांबवू शकत नव्हती. सभासद बोलतो की राजांनी दर्याला पालन घातला. खांदेरी प्रकरणाने मराठ्यांनी समुद्रावर स्वतःचा एकाधिकार उभं करायला आरंभ केला होता.

क्रमशः – खांदेरीचा रणसंग्राम भाग २०

संदर्भ ग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English record

स्वराज्याचे वैभव

खांदेरीचा रणसंग्राम भाग १९

खांदेरीचा रणसंग्राम, पूर्वार्ध

Leave a Comment