महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,686

खांदेरीचा रणसंग्राम भाग २१

Views: 3760
3 Min Read

खांदेरीचा रणसंग्राम भाग २१…

मराठ्यांचा खांदेरीचा रसद पुरवठा सुरूच आहे ह्याबद्दल मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरने कॅप्टन केंग्विनजवळ नाराजी व्यक्त केली होती. नंतर कॅप्टन केंग्विनच्या विनंतीवरून मुंबई कौन्सिलने त्याला सेवेतून मुक्त केले त्याबदली कॅप्टन अँडट्न हा नाकेबंदी पथकाचा प्रमुख झाला.(खांदेरीचा रणसंग्राम भाग २१)

१६ डिसेंबरचा दिवस उजाडला. दुपारी दोनच्या सुमारास मराठी आरमाराची १६ गलबते खाडीच्या तोंडाशी आली. सिद्दीकडून इंग्लिश पथकाने त्याच्या जहाजाबरोबर जाण्याची विनंती केली. पण हा गोतावळा निम्म्यावर जाताच मराठ्यांची गलबते माघारी फिरली. कदाचित नुसता अंदाज घेण्यासाठी मराठी आरमार आलं असावं. मराठी जहाज मागे फिरलीत हे बघून सिद्दी व इंग्रजही आपल्या जागेवर आले. खांदेरी व सिद्दी ह्यांच्यात तोफांचा द्वंद्व पाहिल्याप्रमाणे सुरूच होते. त्याचा परिणाम काहीच नव्हता. पण खांदेरीवर तटबंदीच्या कामावर २०० माणसे झटून काम करत होती. त्यासाठीच बरेच परिश्रम ते घेत असल्याचे अँडट्नने मुंबईला कळवले. ३० डिसेंबरला मराठयानी बेटावरून पुष्कळ तोफांचा मारा केला. अगदी इंग्लिश आरमारावरही गोळे बरसले. त्यात एका शिबाडाची डोलकाठी तुटली आणि इंग्रजांच्या सेवेतील एक कोळी ठार झाला.

आता ह्या सगळ्याच प्रकाराने इंगज अगदीच नरमून गेले होते. पुढील पत्र हे त्याचं द्योतक होय. म्हणून पुढील पत्र इंग्रजांनी लिहलेले जसेच्या तसे देत आहोत.

MUMBAI TO SURAT (Extract)
Dated 22 Dec.1679
“for Hendry Kendry holds out to admiration,and now in few days the northerly monsoon will blow hard,that our small vessells will not ride abroad with security, soe that our large expenoes on that affaire is like to be to little purpose”

“आम्ही इतक्या वेळा व तपशीलवार आमचे म्हणणे मांडले आहे की आता पुन्हा आमचे मत ऐकवण्याची तुम्हाला तसदी देणे अनावश्यक वाटते.शिवाजीशी शक्य तितक्या सन्मानाचा व फायदेशीर तह शक्य तितक्या लवकर करण्याबाबत तुमच्या आज्ञेचे पालन आम्ही करू. खांदेरी आश्चर्यकारकपणे टिकाव धरून आहे. आता थोड्याच दिवसात उत्तरेकडील वारे जोराने वाहू लागतील आणि आमच्या लहान नौका सुमद्रावर सुरक्षित पणे राहू शकणार नाही. आणि या प्रकरणी आमचा जो खर्च झाला तो निष्फळच जाणार असे दिसते. शिवाजी व अंमलदार यांच्याशी आम्ही तहाची बोलणी सुरू ठेवली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवाजीचे पत्र आले. चौलचा सुभेदार तहाची बोलणी करण्यासाठी नेमला आहे त्याचेही पत्र आले. ह्याचा निकाल लागला व खर्च कमी व्हावा ह्यासाठी त्वरेने इसम पाठवला आहे. मुंबई बेटाच्या प्रत्येक रस्त्यावर कडक पाहरे ठेवण्यात आले आहेत. परुंतु ह्या भानगडीत खांदेरी शिवाजींच्याच हाती राहणार असे दिसते. ह्या प्रकरणी शक्य ते आम्ही सर्व करूच”.

जसे सुरतेला कळवले गेले तसेच घडले. कॅप्टन मिंचीनने कळवल्याप्रमाणे २ जानेवारीला उत्तरेकडच्या वारा सुरू झाल्याने इंग्रजांचा छोट्या नौका गडबडू लागला आणि त्यांना उंदेरीचा आश्रयाला ठेवावे लागले. आता मराठ्यांनी थळच्या किनाऱ्यावर मोठ्या तोफा आणून ठेवल्या होत्या. त्यावरून त्यांनी इंग्रजांवर मारेगिरी सुरू केली. पुढे दोन दिवस सिद्दी व मराठे ह्यांच्यात तोफांच द्वंद्व सुरूच होत.

मराठ्यांनी इंग्रजांना आपली तहाची कलमे कळवावी अशी सूचना पाठवली. त्याप्रमाणे इंग्रजांनी कलमे ठरवून ती राम शेणवी बरोबर सुभेदाराकडे पाठवावी असे ठरले.

क्रमशः – खांदेरीचा रणसंग्राम भाग २१

✍️ स्वराज्याचे वैभव

संदर्भ ग्रंथ : शिव छत्रपतींचे आरमार
English record.
फोटो साभार : internet

खांदेरीचा रणसंग्राम भाग २0

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment