महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,952

खांदेरीचा रणसंग्राम भाग ४

By Discover Maharashtra Views: 3795 5 Min Read

खांदेरीचा रणसंग्राम भाग ४

खांदेरीचा रणसंग्राम भाग ४ – मिचिन बेटाजवळ जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. पण तो मराठी तोफांच्या माऱ्यात येताच बेटावरील तोफा धडधडू लागत. त्याला मागे जाण्यास भाग पडत.

कॅप्टन मिन्चीन त्याच्या २० सप्टेंबर च्या पत्रात मुंबईकरांना लिहितो

I have kept from the time I sent the Shibarr in with the wounded men close in with the Island within call in one quarter lesse five fathom of water. I likewise sent the Shibarr with foure files of men in her to lye close in with the Bay, But they fired several Gunns at them and would not lett her lye within command of their Gunns. I likewise fired one upon them which made them leave of, and I ordered Serjant Giles if he see them offer to carry the Shibarr away to use his utmost enddeaver to hinder them, and if he could possible to retake her againe , and further ordered him not to lett any boate come off the Maine .

This morning I expected to see him without gun shott of the Island close with the Maine , to hinder boats from coming of to of their men in revenge of the blood of our countrymen , we receive more damage then we can doe harme. They have been very hard employed in their works night and day ever since. However if your worship doe approve of it, after the new moone is over , I will place myselfe in the same place where I rid before , which is on the south east of the island , abrest of their main Brest work. The Serjants in the Shibarrs behave themselves very civily and keep their men In good order.

मी स्वतः अगदी त्या बेटाजवळ राहिलो आहे. दुसरे राहिलेले शिबाड खांदेरीच्या आखाताच्या बाजुला रवाना केले आहे. त्याचप्रमाणे मी एक शिबाड चार फाइल्ससह पाठविले आहे आणि त्या खाडीजवळ नाकेबंदी केली आहे. पण ती लोक सतत तोफांचा भडीमार करत आहेत त्यामुळे सतत माघार घ्यावी लागत आहे. मी एकदा बेटावर मारा केला तेव्हा त्यांच्या तोफा बंद पाडल्या आणि आमचे शिबाड घेऊन जाण्यास शक्य तो अडथळा निर्माण करण्याकरता व किनार्याच्या होड्या थांबवण्याकरता मी सार्जंट जाईल्सला नेमले आहे. परंतु त्याच्या गफलतीमुळे आज सकाळी त्यांच्या किनाऱ्यावरून दोन होड्या येऊन परत गेल्या. मी त्याचवेळी इशारा करूनही त्याने काहीच केलं नाही. आमचे शिबाडही आता त्यांनी किनाऱ्यावर ओढून त्याची डोलकाठी वैगरे सर्व काही काढून घेतले आहे. हवा थोडी खराब असल्यामुळे मी थोडा दूर सरकलो आहे.

हे सर्व सुरु असतानाच मराठा फौजा हि काही शांत बसल्या नाहीत. अधून मधून इंग्रजांशी छोट्या प्रमाणात लढाई होत होतीच. पण मराठ्यांच्या बोटी लहान आहे जलद असल्यामुळे इंग्रजांना त्यांचा प्रतिकार करणे काही त्रासदायक झाले होते. सुरु केलेल्या या मोहिमेवर इंग्रज मोठ्याप्रमानावावर खर्च करत होते. याचा उद्देश एकच शिवाजी राजांनी जर या ठिकाणी किल्ला बांधला तर मुंबईतल्या आपल्या वखारीवर आणि साम्रज्यावर याचा परिणाम होईल. शिवाजी यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना त्रास देण्यास सुरवात करील.

याच वेळी सुरत काउन्सिल नेहि मुंबईला पत्र पाठवले त्यात ते सांगतात शिवाजीच्या मुलुखात असणाऱ्या कारवार आणि राजापूर येथील वखारी बंद करून आपल्या माणसांना आणण्याची सोय करावी पण याच काळात मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्धाची सुरवात झाली होती त्यामुळे त्यांना याची अमलबजावणी करणे काही जमले नाही.

मराठे आणि इंग्रज यांच्यात युद्धाची झालेली सुरवात हि खांदेरी वरील बांधकामात अडथळा जरी आणत असली तर बांधकामाचे काम हे काही थांबलेले नव्हते. रोज मराठ्यांच्या लहान बोटी किनाऱ्यावरून खांदेरीवर यायच्या आणि परत जायच्या इंग्रजांना या लहान बोटींचा पाठलाग करणे त्रासदायक होत होतेच त्यामुळे या मोहिमेला प्रचंड विलंब होत असल्याची जाणीव इंग्रज अधिकाऱ्यांना होत होती.

त्याच काळात २२ सप्टेंबर ला दिलेल्या पत्रात तो म्हणतो आतापर्यंत त्याच्यापैकी कोणीही हाती न लागल्यामुळे आमच्या कैद्यांची हालचाल काहीच समजली नाहीये. आज एक होडी हातात गेलेली निसटली. खांदेरीवरील लोकांना आमच्या हातून काही इजा होण्याचा संभव दिसत नाही. कारण आम्ही जवळ येताच ते खडकात दिसेनासे होतात. केवळ त्यांच्या भिंती पाडून त्यांची माणसं मारता येणार नाही. यामुळे उलट आमचेच नुकसान सतत होत आहे. रात्रंदिवस झटून ते काम करीत आहेत . आपला आदेश आल्यास कृष्णपक्ष संपल्यावर पूर्वी प्रमाणेच मी त्यांच्या तटाजवळ रहातो.

आता शिवाशिविचा खेळ सुरू झाला होता. नाकेबंदी करणाऱ्या नौका रसद पुरवायला येणाऱ्या शिबाडावर लक्ष ठेवून होत्या. त्याला चकवून निघून जाण्याचा यज्ञ मराठी नौका करत होत्या. झटापट वाढत जात होती.

क्रमशः खांदेरीचा रणसंग्राम

संदर्भग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English Records

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

खांदेरीचा रणसंग्राम भाग 3

खांदेरीचा रणसंग्राम भाग 5

Leave a Comment